धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे, हे आपण सर्वांनीच अनेकदा ऐकले आहे. मात्र, प्रत्यक्षात 50 वर्षे दररोज सिगारेट ओढल्यामुळे आपल्या शरीराची, विशेषतः फुफ्फुसांची काय अवस्था होते, याचे जिवंत उदाहरण एका डॉक्टरने जगासमोर मांडले आहे. फ्लोरिडा येथील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ आणि स्पोर्ट्स मेडिसिन तज्ज्ञ डॉ. डेव्हिड अब्बासी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवरून 4 जानेवारी रोजी एक व्हिडिओ शेअर केला असून, हा व्हिडिओ सध्या जगभरात व्हायरल होत आहे.
50 वर्ष धूम्रपान केल्यास काय होईल?
डॉ. अब्बासी यांनी आपल्या व्हिडिओमध्ये 50 वर्षांच्या सततच्या धूम्रपानानंतर छाती आणि फुफ्फुसांमध्ये होणाऱ्या बदलांवर प्रकाश टाकला आहे. त्यांच्या मते, धूम्रपानामुळे होणारे नुकसान सुरुवातीच्या काळात अदृश्य वाटू शकते, परंतु जैविक दृष्ट्या हे नुकसान 'प्रोग्रेसिव्ह' आणि अनेकदा कधीही भरून न येणारे असते. जेव्हा एखादी व्यक्ती दशकानुदशके दररोज तंबाखूचे सेवन करते, तेव्हा शरीराच्या अंतर्गत रचनेत अनेक बदल होतात.
- तीव्र जळजळ : तंबाखूच्या धुरामुळे फुफ्फुसांच्या उतींमध्ये सतत जळजळ होत राहते.
- फुफ्फुसांची लवचिकता कमी होणे: फुफ्फुसांची नैसर्गिक लवचिकता नष्ट होते, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो.
- ऑक्सिजनची कमतरता: फुफ्फुसांमधील ऑक्सिजन एक्सचेंजची प्रक्रिया मंदावते.
- उतींचा नाश: निरोगी फुफ्फुसांच्या उती हळूहळू नष्ट होऊन तिथे निकामी उती तयार होतात.
(नक्की वाचा- Holiday on 15 January: 15 जानेवारीला राज्यात सुट्टी जाहीर; कुठे आणि कुणाला मिळणार लाभ?)
गंभीर आजारांचा धोका
डॉ. अब्बासी यांनी स्पष्ट केले की, हे दीर्घकालीन नुकसान केवळ फुफ्फुसांपुरते मर्यादित राहत नाही. यामुळे अनेक जीवघेण्या आजारांचा धोका कित्येक पटीने वाढतो. यामध्ये प्रामुख्याने फुफ्फुसाचा कर्करोग आणि हृदयविकारांचा समावेश होतो. वयोमानानुसार शरीराची झीज होतेच, पण धूम्रपानामुळे ही प्रक्रिया अधिक वेगवान होते आणि व्यक्तीची 'क्वालिटी ऑफ लाईफ' म्हणजेच जीवनशैलीचा दर्जा खालावतो.
(नक्की वाचा- Badlapur News: बदलापुरात रात्रीच्या वेळी भयंकर घडतंय, धडकी भरवणारा VIDEO आला समोर)
डॉक्टर म्हणतात, "लक्षणे कदाचित हळूहळू विकसित होतील, परंतु मूळ नुकसान\ खूप लवकर सुरू होते. धूम्रपान हे गंभीर आजार आणि अकाली मृत्यूच्या सर्वात प्रतिबंधात्मक कारणांपैकी एक आहे." म्हणजेच, जर वेळेत धूम्रपान सोडले, तर हे धोके टाळता येऊ शकतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world