Pune MP Murlidhar Mohol Heath Update: पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रकृतीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात महत्त्वाची शस्त्रक्रिया पार पडली आहे. २९ वर्षांपूर्वी कुस्तीच्या मैदानात झालेली दुखापत पुन्हा उद्भवल्याने ही शस्त्रक्रिया पार पडली. या शस्त्रक्रियेनंतर आता पुढील एक महिना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. याबाबत खासदार मोहोळ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे.
काय म्हणाले मुरलीधर मोहोळ?
"क्षमस्व… पण एक महिन्याची सक्तीची विश्रांती ! २९ वर्षांपूर्वी... कोल्हापूर येथे कुस्ती खेळताना झालेली दुखापत, या दुखापतीमुळेच कुस्ती कायमची सुटली... इतकी वर्षे दुर्लक्ष केलं पण आता २९ वर्षांनंतर हळूहळू तो त्रास वाढू लागला, शेवटी डॅाक्टरांनी ह्या शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसल्याचे सांगितलं. त्यामुळे किमान एक महिन्याकरता ही विश्रांती, असं खासदार मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे.
क्षमस्व… पण एक महिन्याची सक्तीची विश्रांती !
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) March 14, 2026
२९ वर्षांपूर्वी... कोल्हापूर येथे कुस्ती खेळताना झालेली दुखापत, या दुखापतीमुळेच कुस्ती कायमची सुटली... इतकी वर्षे दुर्लक्ष केलं पण आता २९ वर्षांनंतर हळूहळू तो त्रास वाढू लागला, शेवटी डॅाक्टरांनी ह्या शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसल्याचे… pic.twitter.com/VX7a6VAMDR
तसेच "खरंतर संसदेचं अधिवेशन सुरू असतानाही शस्त्रक्रिया करावी लागली. अधिवेशन, कामानिमित्त देशभरातील प्रवास, माझ्या पुणे लोकसभा मतदारसंघातील नागरिकांशी संपर्क तसेच इतर कामे… आणि शिवाय यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा… या सगळ्याचं काय? दुखापतीच्या त्रासापेक्षा या सगळ्याचा त्रास जास्त होतोय. पण मला माहितीये तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वादच्या जोरावर मी लवकरच बरा होऊन महिन्याभरातच पुन्हा तुम्हा सर्वांच्या सेवेत हजर होईन, पहिल्यापेक्षा जास्त जोमाने," असा विश्वासही मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला आहे.
VIDEO: कुत्र्यासारखा भुंकतोय, चालतोय... तरुणाची झालीय 'अशी' भयावह अवस्था; व्हिडिओ पाहून हादरुन जाल
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world