जाहिरात

वाढती कंबर, यमराजाचा नंबर! महिलांचा नवा छुपा शत्रू, कमरेच्या वाढत्या घेराबाबत संशोधनातील 'ही' धक्कादायक माहिती

Abdominal Obesity Risks: नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेनुसार भारतातील महिलांच्या आरोग्याबाबत अतिशय गंभीर आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

वाढती कंबर, यमराजाचा नंबर! महिलांचा नवा छुपा शत्रू, कमरेच्या वाढत्या घेराबाबत संशोधनातील 'ही' धक्कादायक माहिती
"Abdominal Obesity Risks: महिलांचा नवा छुपा शत्रू"
Canva
  • भारतातील महिलांमध्ये पोटावरील चरबी वाढत असून यामुळे छुप्या लठ्ठपणाचा धोका गंभीर होतोय
  • 15-34 वर्षांच्या मुली आणि महिलांमध्ये चरबीचे प्रमाण वाढल्याने आरोग्याला मोठा धोका निर्माण होत आहे
  • 80 सेंटीमीटरपेक्षा जास्त कंबरेचा घेर असल्यास हृदयविकार, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासारखे आजार होण्याचा धोका
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Abdominal Obesity Risks: भारतातील महिलांमध्ये छुप्या लठ्ठपणाची समस्या एका अत्यंत गंभीर वळणावर येऊन पोहोचली आहे. अनेकदा वजनाचा काटा सामान्य दाखवत असला,तरी शरीराच्या आत आणि पोटावर जमा होणारी चरबी आरोग्यासाठी सायलेंट किलर ठरत आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेच्या ताज्या आकडेवारीवरून तज्ज्ञांनी हा धोक्याचा इशारा दिला आहे. हा आजार केवळ वाढत्या वयापुरता मर्यादित नसून तरुण मुलींमध्येही वेगाने पसरत आहे. त्यामुळे आता केवळ वजन मोजण्याऐवजी कंबरेचा घेर मोजणे आणि आपल्या जीवनशैलीत तातडीने बदल करणे काळाची गरज बनले आहे.

अ‍ॅबडोमिनल ओबेसिटीचा धोका | Abdominal Obesity Risks

भारतीय महिलांमध्ये सध्या एका बाजूला 'अ‍ॅबडोमिनल ओबेसिटी' म्हणजेच पोटावरील चरबी मोजणे वैज्ञानिक व्याख्यांमध्ये अडकले असताना दुसऱ्या बाजूला याचे नुकसान छुप्या लठ्ठपणाच्या स्वरूपात वेगाने वाढत असल्याचे समोर आले आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेच्या (एनएफएचएस) ताज्या आकडेवारीचा संशोधक प्रियांशू शर्मा आणि ममता चौहान यांनी अभ्यास केला. त्यातून ही चिंताजनक माहिती समोर आली असून महिलांमधील लठ्ठपणा आणि मधुमेहाचा धोका कमालीचा वाढला आहे.

15 ते 34 वर्षे वयोगटातील तरुण मुली आणि महिलांमध्ये लठ्ठपणाची समस्या सर्वाधिक वाढली आहे. वजन वरवर सामान्य दिसत असले तरी त्यांच्या शरीरातील अंतर्गत चरबीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे त्यांचे शरीर आतून कमकुवत होत आहे. 35 वर्षांनंतर याचे वाईट परिणाम अधिक दिसू लागतात. 80 सेंटीमीटरपेक्षा जास्त कंबरेचा घेर असल्यास हृदयविकार, डायबिटिज आणि हाय बीपी (रक्तदाब) यासारख्या गंभीर आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.

आकडेवारी काय सांगते?| What Statistics Reveal?

  • 39.9 टक्के: महिला केवळ कंबरेच्या घेरानुसार लठ्ठपणाच्या व्याख्येत येतात
  • 56.6 टक्के: महिलांच्या पोटावर 'हिप-वेस्ट' गुणोत्तरानुसार अतिरिक्त चरबी असल्याचे आढळले
भारतात 10 पैकी 6 महिला पोटावर चरबी वाढण्याच्या शिकार | 6 Out Of 10 Women In India Suffer From Abdominal Obesity)

भारतात लठ्ठपणाची समस्या खूप जास्त वाढत चालली आहे. ही समस्या सर्वात जास्त महिलांमध्ये पाहायला मिळते. बरं असं नाही की, वय जास्त झाल्यावरच ही समस्या होते. कमी वयातही अनेक महिला - तरूणी लठ्ठपणाच्या शिकार होताहेत. एका रिपोर्टनुसार, भारतात 30 ते 49 वयोगटातील प्रत्येक 10 पैकी 5 ते 6 महिलांना पोटावर चरबी वाढण्याची समस्या आहे. डायबिटीस अ‍ॅण्ड मेटाबॉलिक सिंड्रोम जर्नलमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, भारतीय पुरूषांच्या तुलनेत महिला अ‍ॅब्डोमिनल ओबेसिटी म्हणजे पोटावर चरबी वाढण्याच्या समस्येच्या शिकार आहेत. स्थिती इतकी गंभीर आहे की, 30ते 49 वयोगटातील 10 पैकी साधारण 6 महिलांना ही समस्या आहे. महिलांमध्ये 80 सेमी आणि पुरूषांसाठी 94 सेमीपेक्षा अधिक कंबरेचा घेर या धोक्याच्या श्रेणीत येतो.

काय सांगतो रीसर्च? 

सामान्यपणे आपण लठ्ठपणा हा बॉडी मास इंडेक्सने मोजतो पण हा रीसर्च सांगतो की, BMI शरीराची मूळ स्थिती लपवू शकतो. कारण एशियन इंडियन्समध्ये बॉडी फॅट जास्त असतो. अनेकदा वजन सामान्य असूनही पोटावर जमा चरबी अंतर्गत अवयवांसाठी घातक ठरते. त्यामुळे कंबरेची घेर मोजणे योग्य ठरेल. रीसर्चनुसार हा ट्रेंड टीनएजर्स आणि तरूणींमध्ये वेगाने वाढत आहे. अर्बन लाइफस्टाइल, जास्त कमाई आणि नॉन-व्हेज डाएट याचं मोठं कारण आहे.

काय आहेत लठ्ठपणाची कारणं? | What Are The Causes Of Obesity?

रीसर्चनुसार वाढतं वय, शहरांमध्ये राहणं आणि जास्त नॉन-व्हेज खाणं या गोष्टींमुळे महिलांच्या पोटावरील चरबी वाढत आहे. लिव्हर पँक्रियासच्या आसपास फॅट मेटाबॉलिक रिस्क वाढतो. रीसर्चमधून इशारा देण्यात आलाय की, याने टाइप - 2 डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर, किडनीसंबंधी आजार आणि ब्रेस्ट कॅन्सरचा धोका अनेक पटीने वाढतो.

लठ्ठपणा कसा कमी कराल? | How To Reduce Obesity? 
एक्सपर्ट सांगतात की वजन वाढलं असेल तर रूटीन चेकअप करा. पौष्टिक आहार घ्या, नियमित व्यायाम याने लठ्ठपणाची ही समस्या कंट्रोल केली जाऊ शकते. आता सामान्य लठ्ठपणावर नाही तर अ‍ॅब्डॉमिनलवर लक्ष देण्याची गरज आहे. ही समस्या ग्रामीण भागातही वाढू लागली आहे. शहरात याचं प्रमाण अधिक आहे. एक्सपर्ट सांगतात की, वजन चेक करण्यासोबतच आपल्या कंबरेच घेर चेक करणं देखील महत्त्वाचं आहे.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com