जाहिरात

Ac cooling Guide: एसी सुरू असूनही खोली 'भट्टी'सारखी तापतेय? 'या' सोप्या ट्रि्क्स वापरा

आपण तापमान कमी करतो मात्र तरीही थंड हवा काही मिळत नाही याउलट विजेचे बील वाढत जाते.

Ac cooling Guide:  एसी सुरू असूनही खोली 'भट्टी'सारखी तापतेय? 'या' सोप्या ट्रि्क्स वापरा

How To Fix AC Cooling:  उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून उकाड्याने सर्वजण हैराण झाले आहेत. या असह्य उकाड्यापासून गारवा शोधण्यासाठी सर्वजण घरामधील एसीवर अवलंबून असतात. मात्र अनेकदा तासनतास एसी चालवूनही खोली थंड होत नाही. आपण तापमान कमी करतो मात्र तरीही थंड हवा काही मिळत नाही याउलट विजेचे बील वाढत जाते. तुम्हीही या प्रोब्लॅमने त्रस्त असाल तर काळजी करु नका. खाली दिलेल्या सोप्या पद्धती वापरुन एसीमधून थंड हवा घेऊ शकता. 

Stale Dough Side Effects: सावधान! फ्रिजमध्ये ठेवलेल्या पिठाची पोळी खाताय? पोषणतत्त्व नाही, पोटात हे विष जातंय

एसीमधून थंड हवा येण्यासाठी काय करावे? 

१. एसी फिल्टर्स - एसीमधील एअर फिल्टर्स हवा स्वच्छ करतात. जर जास्त धूळ साचली, तर हवा खोलीत जाऊ शकत नाही. त्यामुळे आठवड्यातून एकदा एसीचे वरचे पॅनल उघडा, फिल्टर काढा आणि स्वच्छ पाण्याने धुवा. तो सुकल्यावर पुन्हा जागेवर लावा. तुम्हाला फरक जाणवेल.

२. लिकेज - एसी चालू करूनही खोली थंड होत नसेल, तर थंड हवा बाहेर जात असण्याची शक्यता आहे. दारे किंवा खिडक्यांखालच्या फटींमधून थंड हवा बाहेर जाते, ज्यामुळे बाहेरची गरम हवा आत येते. त्यामुळे दाराखालच्या फटी डोअर सील किंवा जुन्या कापडाने भरा.

३. सीलिंग फॅन - लोकांना अनेकदा वाटते की एसी चालू असेल सिलिंग फॅन तर तो बंद करावा. पण सत्य हे आहे की पंखा चालू ठेवल्याने थंड हवा खोलीभर लवकर पसरण्यास मदत होते. पंखा कमी किंवा मध्यम गतीने चालवा. यामुळे खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात एकसारखे थंड होईल आणि एसीला कमी काम करावे लागेल.

४. तापमान - अनेक लोकांना वाटते की रिमोट १६ डिग्रीवर सेट केल्याने खोली लवकर थंड होते. हे खरे नाही. १६ डिग्रीवर चालवल्याने कंप्रेसरवरील भार वाढतो आणि जास्त वीज वापरली जाते. त्यामुळे एसी २४ ते २६ डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान चालवा. हे मानवी शरीरासाठी सर्वात आरामदायक तापमान आहे आणि ते संसर्ग पसरण्यापासून रोखण्यास मदत करते. तसेच एसीवरील प्रेशरही कमी होतो. 

Maharashtra Day 2026: 106 हुतात्मे अन् अथांग संघर्ष! मुंबईसाठी मराठी माणसाने दिल्लीला कसं झुकवलं? वाचा सविस्तर

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com