Ac Tips In Summer: AC दिवसभरात किती तास सुरू ठेवावा? कोणत्या टेम्परेचरवर येईल सर्वात कमी वीज बिल? वाचा सविस्तर

AC Tips: उन्हाळ्यात एसी कसा वापरावा? जेणेकरून वीज बिल कमी येईल, जाणून घ्या सोप्या टिप्स

जाहिरात
Read Time: 3 mins
AC Tips : सलग किती तास AC सुरू ठेवावा?
Canva

AC Tips: उन्हाळा ऋतू सुरू होताच घराघरांमध्ये एअर कंडिशनरचा (AC) वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यंदा तर मार्च महिना सुरू होताच प्रचंड उष्णता जाणवू लागली आहे आणि लोकांनी ACचा वापर करायलाही सुरुवात केली आहे. येत्या काही महिन्यांत तापमान आणखी वाढेल, त्यामुळे ACचा वापरही वाढेल. पण वीज बिलामुळे खिसा कापला जाईल. तसेच जास्त वेळ ACच्या संपर्कात राहिल्यास आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. विजेचे बिल जास्त येऊ नये आणि आरोग्यास नुकसान होऊ नये, यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? याबाबत काही खास टिप्स जाणून घेऊया... 

सलग किती तास एसी वापरावा? | AC Tips In Summer 

सलग काही तास एसीचा वापर करणं योग्य मानले जात नाही. साधारणपणे सहा ते आठ तास AC वापरणं योग्य ठरू शकते. यापेक्षा जास्त वेळ एसी सुरू ठेवल्यास मशीनच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. तसेच शरीर आणि त्वचेवरही याचा परिणाम होऊ शकतो. उत्तम पर्याय म्हणजे जेव्हा खोली व्यवस्थित थंड होईल, तेव्हा काही वेळ AC बंद करावा.

जास्त वेळ ACमध्ये राहण्याचे तोटे

'इंटरनॅशनल जर्नल ऑफ ओबेसिटी'च्या एका अहवालानुसार, जास्त वेळ AC मध्ये राहिल्याने शरीरातील कॅलरीज् कमी बर्न होतात. जेव्हा आपण थंड हवेत वावरत, तेव्हा शरीराला तापमान संतुलित ठेवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागत नाही. यामुळे कॅलरी बर्न होण्याची प्रक्रिया मंदावते आणि लठ्ठपणा वाढू शकतो. त्यामुळे दिवसभर AC मध्ये राहण्याची सवय टाळली पाहिजे.

(नक्की वाचा: Kidney Failure: तुमची किडनी नीट काम करत नाहीय, हे तुम्हाला कसं कळेल? किडनी खराब होण्याची सुरुवातीची लक्षण काय आहेत?)

Photo Credit: Canva

AC चे तापमान किती असावे?

जर तुम्हाला AC मुळे कमी वीज वापरली जावी असे वाटत असेल, तर तापमान 24 ते 26 अंश सेल्सिअस दरम्यान ठेवावे. जर AC 24 अंश डिग्री सेल्सिअसवर सेट केला, तर विजेच्या वापरात सुमारे 6 टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. 16 अंश डिग्री सेल्सिअसवर एसी सुरू ठेवण्याच्या तुलनेत 24 अंशांवर ACचा वापर केल्यास जवळपास 48 टक्क्यांपर्यंत विजेची बचत होऊ शकते. याशिवाय वीज बिल कमी करण्यासाठी तुम्ही AC 'ऑटो मोड'वरही ठेवू शकता.

Advertisement

(नक्की वाचा: What Not To Eat With Alcohol : दारूसोबत चुकूनही या गोष्टींचे करू नका सेवन, अन्यथा होतील हे गंभीर परिणाम)

वीज खर्चाचा अंदाज

तुमच्या खोलीत 1.5 टनाचा AC असेल, तर तो तासाला साधारण 2.25 युनिट वीज वापरतो. या हिशोबाने रोज आठ तास AC सुरू ठेवल्यास एका दिवसात सुमारे 18 युनिट वीज खर्च होऊ शकते. म्हणजेच पूर्ण महिन्याचा विचार केला तर हा खर्च खूप वाढू शकतो. त्यामुळे योग्य तापमान आणि वेळेची काळजी घेणे गरजेचे आहे. अशा प्रकारे जर ACचा वापर समजूतदारपणे केला तर तुम्ही केवळ विजेचे बिलच कमी करू शकणार नाही, तर आरोग्याचे होणारे नुकसान देखील टाळले जाऊ शकते. त्यामुळे ACचा वापर करताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

Advertisement