Health News: काही लोकांना ड्रिंकसोबत काही-न्-काही खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायला आवडतो. पण जीभेचे चोचले पुरवण्याच्या नादात आरोग्यावर याचा उलट परिणाम होऊ शकतो. समजा तुम्ही चॉकलेट डेझर्टसोबत रेड वाइन पित असाल तर काहींना थोड्याच वेळात पोट फुगणे, अपचन आणि अॅसिडिटीचा त्रास होऊ लागतो. तज्ज्ञांच्या मते कॅफिनयुक्त पेय, बीन्स किंवा ब्रेडचे दारूसोबत सेवन केलं तर शरीराची पचनप्रक्रिया मंदावते. शरीराची पोषक तत्त्व शोषण घेण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो, गॅस किंवा ब्लोटिंग यासारख्या समस्याही उद्भवू शकतात. थोडक्यात सांगायचे झाले तर केवळ चवीचा प्रश्न नसून यामुळे आपल्या शरीरावरही दुष्परिणाम होतात. वेळीच ही सवय न बदलल्यास तुमचे पोट आणि मूड दोन्ही बिघडू शकतात. दारूसोबत कोणत्या पाच गोष्टींचे सेवन करू नये, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...
1. ब्रेड आणि बीअर
बीअर आणि ब्रेड या दोन्हीमध्ये यीस्ट (Yeast) असते. हे दोन्ही एकत्र घेतल्याने पोटात गॅस होणे आणि ब्लोटिंगची समस्या वाढू शकते. यामुळे पचनसंस्थेवर अतिरिक्त ताण येतो, ज्यामुळे अस्वस्थता जाणवते. जर तुम्ही बीअर पित असाल तर त्यासोबत ग्रिल्ड भाज्या, सॅलड किंवा लीन प्रोटीनचे सेवन करणं फायद्याचे ठरेल.
2. चॉकलेट आणि दारू
डार्क चॉकलेटमध्ये कॅफिनसह पोटात जळजळ निर्माण करणारे काही घटक असतात. दारूसोबत चॉकलेट खाल्ल्याने गॅस, ॲसिडिटी किंवा 'ॲसिड रिफ्लक्स'चा त्रास वाढू शकतो. जर तुम्हाला चॉकलेट खायचेच असेल तर ते कमी प्रमाणात खा किंवा दोन्हीमध्ये वेळेचे अंतर ठेवा.
(नक्की वाचा: Tulsi Benefits: चेहऱ्यावरील पिंपल्स होतील पटकन दूर,फक्त डाएटमध्ये या इवल्याशा पानांचा करा समावेश)
3. कडधान्ये, डाळी आणि दारूकडधान्ये आणि डाळींमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, पण ते पचण्यास वेळ लागतो. दारूसोबत या पदार्थांचे सेवन केल्यास शरीराची पचनक्रिया अधिक मंदावते, ज्यामुळे पोट फुगणे आणि पोटात गॅस होण्याचा त्रास वाढतो. डाळींच्या जड स्वरुपातील जेवणासोबत मद्यपान टाळणे हितकारक आहे.
4. कॅफिनयुक्त पेय आणि दारूकॉफी किंवा एनर्जी ड्रिंक दारूमध्ये मिक्स करून पिणे शरीरासाठी घातक ठरू शकते.
(नक्की वाचा: Jeera Watar Benefits: जिऱ्याचे पाणी कसे आणि कधी प्यावे? शरीरात कोणते बदल होतील? तज्ज्ञांनी दिली मोठी माहिती)
5. खार पदार्थ आणि दारू
चिप्स, फ्राइज किंवा खारट सुकामेवा खाल्ल्यास तहान वाढते, ज्यामुळे तुम्ही अधिक प्रमाणात दारू पिता. जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्यास शरीर डिहायड्रेट (पाणी कमी होणे) होते आणि यामुळे हँगओव्हरची समस्या अधिक गंभीर होऊ शकते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world