Adhik Maas 2026: अधिक मास हा भगवान विष्णूच्या आराधनेचा अतिशय पवित्र काळ मानला जातो. वैभव जोशी गुरुजी यांनी सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, या मंगलमयी महिन्यात आपल्या लाडक्या आईची ओटी भरण्याला विशेष धार्मिक महत्त्व आहे. आई ही सृष्टीची जननी आणि साक्षात मातृशक्तीचे रूप असल्याने, तिची ओटी भरल्याने घरात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि संततीसौख्य नांदते. जीवनातील सर्व अडचणी दूर होऊन कुटुंबात सकारात्मक ऊर्जा टिकावी, यासाठी अधिक मासात हळद-कुंकू, वस्त्र, नारळ आणि फळे देऊन कृतज्ञतेने आईचा हा सन्मान केला जातो. वैभव जोशी गुरुजी यांनी दिलेली सविस्तर माहिती जाणून घेऊया...
(नक्की वाचा: अधिक मासात जावयाला 33 अनारसे दान का करतात? लेकीच्या संसारात काय बदलतं? ज्योतिषी कुलकर्णींनी सांगितलेले शास्त्र)
अधिक मास विशेष: आईची ओटी का भरावी?
अधिक मास हा भगवान विष्णूच्या कृपेचा महिना मानला जातो. या महिन्यात आईची ओटी भरल्याने घरात सुख, समृद्धी, आरोग्य, संततीसौख्य आणि मंगलमय वातावरण नांदते.
- मातृशक्तीचा सन्मान: आई ही सर्व सृष्टीची जननी आहे, तिचा सन्मान केल्याने कृपा लाभते.
- घरातील सुख-समृद्धी: ओटी भरल्याने घरात सकारात्मक ऊर्जा आणि ऐश्वर्य वाढते.
- आरोग्य आणि दीर्घायुष्य: कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी लाभदायक.
- संततीसौख्य: संततीप्राप्तीची इच्छा पूर्ण होते आणि मुलांच्या सुखासाठी उत्तम.
- अडचणी दूर होतात: नकारात्मक शक्ती आणि दोष दूर होऊन जीवनात शांती नांदते.
(नक्की वाचा: अधिक मास म्हणजे काय? काय करावे, काय टाळावे? 33 आकड्याचे विशेष महत्त्व, वाचा ज्योतिषी कुलकर्णींनी दिलेली माहिती)
ओटीमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा आणि का समावेश करावा?
- हळद-कुंकू: सौभाग्य आणि मंगल कार्याचे प्रतीक
- फुले: सौंदर्य, आनंद आणि पवित्रतेचे प्रतीक
- नारळ: समृद्धी आणि पूर्णतेचे प्रतीक
- फळे (केळी, सफरचंद इ.): आरोग्य, विकास आणि समाधानाचे प्रतीक
- दक्षिणा/वस्त्र: आदर आणि कृतज्ञतेचे प्रतीक
- ओटीतील अक्षता: अखंड सौभाग्य आणि शांतीचे प्रतीक
- पान-तांबूल: मंगल प्रसंगाचे परिपूर्णतेचे प्रतीक
- सुपारी,बांगड्या: सौभाग्य आणि दीर्घायुष्याचे प्रतीक
- गोडधोड /मिष्ठान्न: जीवनात गोडवा आणि आनंद टिकून राहावा म्हणून गोडधोड पदार्थ दिले जातात.
वैभव जोशी गुरुजींनी शेअर केलेली पोस्ट वाचा
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)