- ज्योतिषी श्रीकेतन कुलकर्णी
Adhik Maas 2026: अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम महिन्यात दानधर्माला हिंदू संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. या पवित्र महिन्यात ब्राह्मणाला किंवा जावयाला 33 अनारसे दान करण्याची जुनी परंपरा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पाळली जाते. या दानामागे केवळ धार्मिक श्रद्धा नसून त्यामागे एक विशेष शास्त्र आणि रहस्य दडलेले आहे. तांदूळ गूळ आणि तूप या सात्त्विक पदार्थांपासून बनवलेला अनारसा दान केल्याने घरात सुख समृद्धी नांदते अशी भावना आहे. या परंपरेमागचे नेमके धार्मिक महत्त्व आणि सांस्कृतिक रहस्याबाबत ज्योतिषी श्रीकेतन कुलकर्णी यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया...
जावयाला 33 अनारसे देण्याची परंपरा
अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास. हा महिना भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय मानला जातो. या महिन्यात केलेले दान, जप, व्रत, उपवास आणि सेवा यांना अनेक पटींनी पुण्य मिळते असे धर्मशास्त्र सांगते. विशेषतः या महिन्यात ब्राह्मणाला, जावयाला किंवा लेकी-जावयाला 33 अनारसे दान देण्याची परंपरा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रचलित आहे.
पण 33 अनारसेच का?
अनारसाच का द्यायचा?
यामागचे शास्त्र काय आहे? तर
यामागे अत्यंत सुंदर धार्मिक आणि सांस्कृतिक अर्थ आहे.
33 या संख्येचे महत्त्व काय? | What is the Significance of the Number 33 In Adhik Maas?
हिंदू धर्मात 33 कोटी देवता असा उल्लेख आढळतो. येथे कोटी म्हणजे फक्त करोड नसून प्रकार किंवा विभाग असा देखील अर्थ होतो.
हे 33 देव म्हणजे
- 12 आदित्य
- 11 रुद्र
- 8 वसु
- 2 अश्विनी कुमार
असे मिळून 33 देवतांचे स्वरूप मानले जाते.
म्हणून 33 अनारसे दान करणे म्हणजे समस्त देवतांना अर्पण केल्याचे पुण्य मिळते अशी श्रद्धा आहे.
(नक्की वाचा : Adhik Maas Anarsa Recipe: अधिक मासात 33 अनारसे दानाचे महत्त्व! घरच्या घरी तयार करा खुसखुशीत अन् जाळीदार अनारसे)
अनारसेच का दान करतात? | Why Only Anarsa is Donated In Adhik Maas?अनारसा हा पदार्थ
- तांदूळ
- गूळ
- तूप
या साहित्यांपासून अनारसे तयार केले जातात. हे तीन पदार्थ सात्त्विक, पवित्र आणि शुभ मानले जातात.
- तांदूळ समृद्धीचे प्रतीक
- गूळ गोडवा आणि प्रेमाचे प्रतिक
- तूप पवित्रता आणि देवतांना प्रिय म्हणून अनारसा हा मंगल प्रसाद मानला जातो.
अधिक मासात गोड पदार्थ दान केल्याने कोणते लाभ मिळतात? | What are the Benefits of Donating Sweet Food in Adhik Maas?
घरात सुख-शांती, वैवाहिक सौख्य, धनधान्य वाढ, पितृ आणि देवतांची कृपा मिळते अशी श्रद्धा आहे.
(नक्की वाचा: Adhik Maas 2026: अधिक मासात दीपदान का करावे? 9 प्रमुख तिथीसह 33 संख्येचं महत्त्व, वाचा वेदमूर्तींची माहिती)
जावयाला अनारसे का देतात? | Why are Anarsas Given to the Son-in-Law In Adhik Maas?
- भारतीय संस्कृतीत जावई म्हणजे विष्णूचे रूप मानले जाते.
- लेकी-जावयाचा सन्मान केल्याने लक्ष्मी-नारायण प्रसन्न होतात असे मानले जाते.
- अधिक मासात जावयाला 33 अनारसे, वस्त्र, दक्षिणा, फळे तांदूळ किंवा शिधा देऊन आदर केला जातो.
- यामुळे मुलीच्या संसारात सुख राहते, घरात लक्ष्मी स्थिर राहते, नातेसंबंधात प्रेम वाढते अशी धार्मिक भावना आहे.
ब्राह्मणाला दान का देतात? | Why is Donation Given to Brahmins?
ब्राह्मणाला विष्णूचे प्रतिनिधी मानले जाते.
अधिक मासात ब्राह्मणाला भोजन, दक्षिणा आणि 33 अनारसे दिल्यास
- भगवान विष्णू प्रसन्न होतात
- पितृदोष कमी होतो
- पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात
- कुटुंबातील अडथळे दूर होतात असे धर्मग्रंथांमध्ये सांगितले आहे.
अधिक मासातील संदेश | Message of Adhik Maas
- दान हे फक्त वस्तू देणे नसते
- तर प्रेम, आदर, कृतज्ञता आणि संस्कार देणे असते.
- 33 अनारसांचे दान म्हणजे देवतांप्रती भक्ती, नात्यांप्रती प्रेम, संस्कृतीप्रती आदर यांचे सुंदर प्रतीक आहे.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world