AI Side Effects: धोक्याची घंटा! AI मुळे तरुणांमध्ये एकटेपणा वाढतोय

नवीन अहवालानुसार, जेमिनी आणि चॅटजीपीटी सारखे चॅटबॉट्स आता अधिक जलद आणि स्मार्ट झाले आहेत. यामुळे तरुणांना त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी या साधनांवर जास्त अवलंबून राहावं लागत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • AI का इस्तेमाल युवाओं में भावनात्मक साथी के रूप में आ रहा सामने
  • युवाओं में अकेलापन बढ़ने की चिंता
  • युवा AI के रूप में देख रहे अकेलेपन का साथी
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

एका बाजूला आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मुळे जीवन अधिक सोपे झाले असले तरी, दुसऱ्या बाजूला याचे काही नकारात्मक परिणाम देखील समोर येऊ लागले आहेत. एका नवीन अभ्यासानुसार, तरुण युजर्स आता एआयला केवळ कामासंबधितच नाही तर जीवनाशी आणि भावनांशी संबंधित प्रत्येक प्रकारचे प्रश्न विचारत आहेत. यामुळे त्यांना एआय  नवीन भावनिक साथीदार म्हणून दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते, ही चांगली गोष्ट नाही कारण यामुळे तरुणांमध्ये एकटेपणा मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

नवीन अहवालानुसार, जेमिनी आणि चॅटजीपीटी सारखे चॅटबॉट्स आता अधिक जलद आणि स्मार्ट झाले आहेत. यामुळे तरुणांना त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी या साधनांवर जास्त अवलंबून राहावं लागत आहे.

युवा युजर्स आता एआयचा वापर त्यांच्या खासगी आयुष्यातील गुंतागुंत सोडवण्यासाठी करत आहेत. ते एआयला त्यांच्या भावनांशी जोडलेले प्रश्न विचारत आहेत आणि त्याला भावनिक साथीदार म्हणून पाहू लागले आहेत. सध्याचे तरुण एआयचा उपयोग अशा मित्रासारखा करत आहेत, जो त्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे देतो.

(नक्की वाचा- WhatsApp वापरणाऱ्यांनो सावधान! नेहमीची सवय आयुष्य उद्ध्वस्त करू शकते)

39% तरुण 'सपोर्ट'साठी एआयवर अवलंबून

यूके युथ चॅरिटीने (UK Youth Charity) 'लेटेस्ट जेनरेशन आयसोलेशन रिपोर्ट 2025' नावाचा एक अहवाल जारी केला आहे. 5000 लोकांच्या सर्वेक्षणावर आधारित या अहवालात 11 ते 18 वर्षांच्यातरुणांना समाविष्ट केले होते.

Advertisement

अहवालानुसार, जवळपास 39% म्हणजेच पाचपैकी दोन तरुणांमध्ये हा ट्रेंड दिसून आला आहे की, ते त्यांच्या प्रत्येक प्रकारच्या आधारासाठी आता एआयचा वापर करत आहेत. यामध्ये शिक्षण किंवा ऑनलाइन कामाव्यतिरिक्त सल्ला देखील समाविष्ट आहे.

(नक्की वाचा- Viral VIDEO: फोनवरचं बोलणं ऐकून Uber ड्रायवरने गाडी थांबवली अन्... तरुणीच्या आयुष्यभर लक्षात राहील असा क्षण)

एकटेपणामुळे चॅटबॉट्सचा आधार

हा अभ्यास तरुणांमधील एकटेपणाची पातळी किती वाढली आहे, हे दाखवणारा एक चिंताजनक पैलू आहे. सर्वेक्षणातील 11%  तरुणांनी सांगितले की त्यांनी मित्राच्या रूपात एआयची मदत मागितली, तर 12% तरुणांनी केवळ बोलण्यासाठी चॅटबॉटचा वापर केला.

Advertisement

अर्ध्याहून अधिक एआय युजर्सनी सांगितले की, ते तणाव किंवा दैनंदिन समस्यां संबंधित कोणत्याही प्रकारच्या सल्ल्यासाठी एआयवर अवलंबून असतात. एक तृतीयांश तरुण एकटेपणाचे शिकार असल्याचे आढळले आहे. मित्र बनवण्यात येणाऱ्या अडचणी, एकाकी असल्याची भावना ही यामागची कारणे असू शकतात.

एआयवरील ही वाढती अवलंबिता आगामी काळात नवीन पिढीला अधिक एकटेपणाकडे ढकलू शकते, असा गंभीर इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

Topics mentioned in this article