जाहिरात

WhatsApp वापरणाऱ्यांनो सावधान! नेहमीची सवय आयुष्य उद्ध्वस्त करू शकते

Cyber Fraud: साइबर अपराधी इन दिनों लोगों को डिजिटल वेडिंग कार्ड के नाम पर '.apk' एक्सटेंशन वाली फाइल (एंड्रॉइड पैकेज किट) भेज रहे हैं. कोई व्यक्ति इस संदिग्ध फाइल को इनविटेशन ऐप समझकर डाउनलोड और इंस्टॉल करता है, उसके खाते से पैसे खाली हो जाते हैं.

WhatsApp वापरणाऱ्यांनो सावधान! नेहमीची सवय आयुष्य उद्ध्वस्त करू शकते
APK File Scam in Wedding Season: शादी के सीजन में एक अलग तरह का फ्रॉड चल रहा है. इससे बचने के लिए पुलिस ने कुछ सलाह जारी की है.
  • साइबर ठग शादी के डिजिटल इनविटेशन कार्ड के नाम पर .apk फाइल भेजकर लोगों के बैंक खाते खाली कर रहे हैं
  • इस फ्रॉड में .apk फाइल डाउनलोड करते ही मोबाइल पर रिमोट एक्सेस ऐप इंस्टॉल हो जाती है जिसे ठग कंट्रोल करते हैं
  • पुलिस ने केवल प्ले स्टोर से ऐप डाउनलोड करने और संदिग्ध लिंक या फाइल को क्लिक या डाउनलोड न करने की सलाह दी है
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

सध्या देशभरात लग्नसमारंभाचा काळ सुरू आहे. याच आनंदाच्या वातावरणात जर तुमच्या फोनवर अनोळखी नंबरवरून किंवा कोणत्याही संदिग्ध स्रोताकडून डिजिटल आमंत्रण पत्रिका आली, तर सावध राहण्याची गरज आहे. कारण सायबर ठगांनी आता नागरिकांना लुटण्यासाठी लग्नपत्रिकेला आपले नवे हत्यार बनवले आहे. अशा आलेला मेसेच क्लिक करून ओपन करण्याची सवय तुम्हाला महागात पडू शकते. यामुळे तुमच्या मोबाईलमधील डेटाचा वापर केल्याने आयुष्यही उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे.

धोकादायक 'APK' फाईलचा वापर

सायबर गुन्हेगार सध्या लोकांना डिजिटल वेडिंग कार्ड किंवा इनविटेशन ॲपच्या नावाखाली '.apk' एक्सटेंशन असलेली फाईल पाठवत आहेत. APK हे अँड्रॉइड ॲप्स इन्स्टॉल करण्यासाठी वापरले जाणारे फाईल फॉर्मेट आहे.

(नक्की वाचा- Viral VIDEO: फोनवरचं बोलणं ऐकून Uber ड्रायवरने गाडी थांबवली अन्... तरुणीच्या आयुष्यभर लक्षात राहील असा क्षण)

कसा होतो फ्रॉड?

जो व्यक्ती या संदिग्ध फाईलला लग्नाचे आमंत्रण समजून डाउनलोड आणि इन्स्टॉल करतो. त्याच क्षणी ठगांना त्याच्या फोनचा रिमोट ॲक्सेस मिळतो.

सायबर क्राइम, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकदा रिमोट ॲक्सेस मिळाल्यावर, सायबर ठग दूर बसून तुमच्या मोबाइलमधील प्रत्येक हालचाल पाहू शकतात. विशेष म्हणजे, यासाठी त्यांना तुमचा ओटीपी किंवा अन्य कोणतीही माहिती सामायिक करण्याची गरज नसते आणि ते मिनिटांत बँक खाते रिकामा करतात.

अनोळखी APK फाईल धोकादायक का आहे?

गुगल प्ले स्टोर किंवा ॲपल स्टोअर व्यतिरिक्त इतर ठिकाणांहून डाउनलोड केलेल्या अनोळखी APK फाईल्स अत्यंत धोकादायक असतात. या फाईल्समध्ये अनेकदा मालवेअर किंवा व्हायरस दडलेले असतात, जे डेटा चोरी करू शकतात. या फाईल्स तुमची गॅलरी, डॉक्युमेंट्स, कॉन्टॅक्ट्स आणि बँकिंग ॲप्स हे संवेदनशील माहिती हॅकरपर्यंत पोहोचवतात. या फसवणुकीत वापरले जाणारे काही खतरनाक ॲप्स तुमच्या फोनवर पूर्ण नियंत्रण मिळवतात.

(नक्की वाचा- Nagpur News: धक्कादायक! गांजा तस्करीप्रकरणी भाजपच्या युवा नेत्यासह 6 जणांना अटक)

धोका टाळण्यासाठी पोलिसांचे आवाहन

  • अँड्रॉइड वापरकर्त्यांनी (Android Users) कोणतेही ॲप्लिकेशन केवळ गुगल प्ले स्टोअरमधूनच इन्स्टॉल करावे.
  • कोणतीही '.apk' फाईल पूर्णपणे व्हेरिफाय केल्याशिवाय डाउनलोड किंवा इन्स्टॉल करू नका.
  • अनोळखी नंबरवरून आलेल्या डिजिटल निमंत्रण कार्डावर किंवा संशयास्पद लिंकवर क्लिक करणे टाळा आणि त्वरित त्या डिलीट करा.
  • कोणत्याही प्रकारच्या सायबर फसवणुकीचा सामना झाल्यास त्वरित सायबर क्राइम हेल्पलाईन 1930 वर तक्रार नोंदवा.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com