वाढलेलं वजन कमी कसं कराल? डाएटमध्ये काय घ्याल, काय टाळाल? दिल्ली एम्सच्या संचालकांनीच सर्व शंका केल्या दूर

Control your weight :आहारातील काही छोट्या बदलामुळे लठ्ठपणा कमी करता येऊ शकतो.  

जाहिरात
Read Time: 2 mins

Obesity : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स) दिल्लीचे संचालक डॉ. एम श्रीनिवास यांनी रविवारी एक महत्त्वपूर्ण माहिती दिली. शहराबरोबरच ग्रामीण भागातही लठ्ठपणा ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. NDTV ला दिलेल्या मुलाखतीत श्रीनिवास यांनी लठ्ठपणा किंवा स्थूलपणा कमी करण्याचा फंडा सांगितला. ते म्हणाले की, लठ्ठपणा प्रत्येक आजारात धोक्याचं पहिलं कारण आहे. सर्वसाधारणपणे लठ्ठपणातून हृदयविकाराचा धोकाही उद्भवतो. त्यामुळे नियमित व्यायाम आणि आहारातील काही छोट्या बदलामुळे लठ्ठपणा कमी करता येऊ शकतो.  

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

प्रथिनांच्या सेवनाकडे लक्ष द्या...
एका चांगल्या लाइफस्टाइलचा अवलंब करण्याबरोबरच नियमित व्यायाम करणे, चांगला आहार आदी सवयी महत्त्वाच्या आहेत. आपल्याला समतोल आहार घ्यायला हवा. आहारातील प्रथिनांकडे लक्ष द्या. आहारात तेलकट पदार्थांचं प्रमाण कमी असावं. त्याऐवजी अळशी, बिया, काजू-बदाम याचा आहारात समावेश करा. दिवसभरात दोन ते चार चमचा तेलाचं सेवन करू शकता. त्याशिवाय डाएटमध्ये 20 टक्क्यांहून अधिक फॅट असू नये. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मन की बात या आपल्या कार्यक्रमादरम्यान स्थूलतेच्या वाढत्या प्रमाणावर चिंता व्यक्त केली. एका अभ्यासानुसार, प्रत्येक आठ व्यक्तीमागे एक व्यक्ती स्थूलत्वाशी लढा देत आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आहारात कमीत कमी तेलाचा वापर करावा असा सल्ला पंतप्रधान मोदींनी दिला आहे. प्रत्येकाने आपल्या आहारातील १० टक्के तेलाचं प्रमाण कमी करावं आणि आपल्या आजूबाजूच्या दहा जणांना हेच फॉलो करण्याचं आव्हान द्यावं.
 

नक्की वाचा - Health Tips : या खाद्यपदार्थांमुळे रोगप्रतिकार शक्तीवर होऊ शकतो परिणाम

कमी तेल वापरा...
आहारात कमीत कमी तेलाचा वापर करा. श्रीनिवास यांनी पुढे सांगितलं की, तेलाच्या सेवनावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. सर्वसाधारपणे तेलाचे दोन प्रकार असतात. एक दृश्य स्वरुपात दिसणारं आणि एक अदृश्य स्वरुपातील. अदृश्य तेलाचं उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा आपण दूध पितो त्यावेळी त्यातही तेल किंवा फॅट असतं. दृश्यमान तेल म्हणजे नियमितपणे आपण ज्याचा उपयोग फोडणीसाठी करतो.  

Advertisement

कंबरेवरुन लठ्ठपणाचा अंदाज...
एम्स दिल्लीचे संचालकांनी सांगितलं की, जर कोणत्या व्यक्तीची कंबर 80-90 सेमी असेल तर ती व्यक्ती स्थूलत्वाकडे जाण्याची शक्यता आहे. अशावेळी पोटाच्या आजूबाजूला बरीच चरबी जमा होते. पोटाचा वाढता घेर हे लठ्ठपणाचा इशारा आहे. त्यामुळे वेळीच आहारात बदल करून व्यायामातून तुम्ही त्यातून बाहेर पडू शकता.