Akshya Tritiya 2025 : अक्षय्य तृतीयेला हिंदू धर्मात खास महत्त्व आहे. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. अक्षय्य तृतीयेला भगवान विष्णू आणि लक्ष्मीमातेची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी लोक हमखास सोने-चांदीची खरेदी करतात.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अक्षय्य या शब्दाचा अर्थ “कधीही क्षय न पावणारा, न संपणारा” असा आहे. हा शुभ दिवस नवीन सुरुवातीचे प्रतीक मानला जातो. या दिवशी भारतात अनेक लोक गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करतात, जे सतत समृद्धी आणि संपत्तीचे प्रतीक आहे.
हिंदू संस्कृतीत अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने आणि दागिने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. सोने हे शाश्वत संपत्ती, शुद्धता आणि शुभ मानले जाते. त्यामुळे अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी केल्याने घरात सुखसमृद्धी येते अशी धारणा आहे.
( नक्की वाचा : Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला सोन्याऐवजी खरेदी करा या 5 गोष्टी, कसा होईल फायदा? वाचा यादी )
हिंदू धर्मात सोनं देवी महालक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी केल्याने घरात धन-समृद्धी वाढते. या दिवशी ग्रहांची शुभ स्थिती देखील तयार होते, ज्यामुळे या शुभ मुहूर्तावर खरेदी केलेली मालमत्ता आणि नवीन सुरुवात दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरते.
(नक्की वाचा: Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीया कधी आहे? लक्ष्मीमातेला प्रसन्न करण्यासाठी जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत)
त्यामुळे या दिवशी केलेली कोणतीही नवीन गुंतवणूक किंवा खरेदीचा सकारात्मक परिणाम होतो असं मानलं जातं. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने किंवा सोन्याचे दागिने खरेदी करून घरी आणले तर देवी लक्ष्मी स्वतः त्या घरात प्रवेश करते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.