Alcohol With Cold Drinks Side Effects: भारतात सर्वसाधारणपणे दारू पिण्याची एक पद्धत पाहायला मिळते. व्हिस्की, रम किंवा व्होडका सारख्या हार्ड ड्रिंक्समध्ये सोडा, कोल्ड ड्रिंक किंवा एनर्जी ड्रिंक घालून पिण्याची पद्धत आहे. काहीजण हार्ड ड्रिंकमध्ये पाणी घालून पितात. हार्ड ड्रिंक्समध्ये कोल्ड ड्रिंक्स घालून प्यायल्याने चव वाढते आणि यामुळे कमी नुकसान होतं असं मानलं जातं. मात्र हार्ड ड्रिंकमध्ये कोल्ड ड्रिंक्स घालून पिणं चांगलं नाही. असं करणं आरोग्यासाठी अधिक त्रासदायक ठरू शकतं. कोल्ड ड्रिंक्समध्ये कॅफीन, कॅलरी आणि साखरेसह अनेक घटक असतात, जे अॅल्कोहोलध्ये एकत्र करून प्यायल्याने आजारांचा धोका वाढवू शकतं.
काय आहे सत्य?
क्लीवलँड क्लिनिकच्या रिपोर्टनुसार, कोल्ड ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स आणि सोड्यात कॅफीनचं प्रमाण जास्त असतं. हार्ड ड्रिंक्समध्ये वरील द्रव्य एकत्र केल्याने मर्यादेपेक्षा जास्त प्यायलं जातं. कॅफीन स्टिम्युलेंटप्रमाणे काम करतं आणि तुम्हाला अत्युच्च अनुभव देतं. मात्र नॉर्मल कंडिशनमध्ये आल्यानंतर पुन्हा पिण्याची इच्छा होते. कॅफिनचं व्यसन लागतं आणि त्यामुळे हार्ड ड्रिंक्समध्ये एकत्र करून प्यायल्याने तुम्हाला दारूचं व्यसन लागतं. आणि यादरम्यान अनेक लोक प्रमाणाबाहेर पितात.
नक्की वाचा - बिअर कधी प्यावी, रात्री की सकाळी? बिअर पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? जाणून घेऊया
या मिश्रणाचा शरीरावर कसा होतो परिणाम?
हार्ड ड्रिंक्समध्ये कोल्ड ड्रिंक्स किंवा एनर्जी ड्रिंक्स एकत्र करून पिणं हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत नुकसादायी आहे. कॅफिन आणि अॅल्कोहोल दोन्हीचा रक्तदाबावर परिणाम होता. दोन्ही गोष्टी एकत्र करून प्यायल्याने रक्तदाब वाढू शकतो, याचा हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो. ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे, त्यांच्यासाठी हार्ड डिंक्समध्ये कोल्ड ड्रिंक्स घालून पिणं धोकादायक ठरू शकतं. या दोन्ही गोष्टी एकत्र प्यायल्याने रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे रक्तवाहिन्यांच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. हे मिश्रण हृदयरोग्यांसाठी घातक ठरू शकतं., न्यूज १८ हिंदीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
कोल्ड ड्रिंक्समध्ये कॅलरी आणि साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं. हे द्रव्य हार्ड डिंकमध्ये घातल्यानंतर कॅलरी काऊंट अधिक वाढतो. तज्ज्ञांनुसार, अॅल्कोहोलच्या एका ड्रिंकमध्ये तब्बल १०० ते ५०० कॅलरीज असतात. यामध्ये कोल्ड ड्रिंक्स मिक्स केल्यानंतर कॅलरीजचं प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त वाढतं. दोन ते तीन पॅगमध्येच कॅलरीजचं प्रमाण ९०० पर्यंत पोहोचू शकतं. अधिक कॅलरी आणि साखरेमुळे स्थुलत्व, मधुमेह आणि पचनासंबंधित त्रास उद्भवतात. मधुमेहींनी अॅल्कोहोलमध्ये कोल्ड ड्रिंक्स घालून पिऊ नये.
Disclaimer: दारू शरीरासाठी घातक आहे. NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.