जाहिरात

Pune News: तिच स्टाईल, तोच धाक, तोच रुबाब! सुनेत्रा पवारांच्या रुद्रावताराने अजित पवारांची आठवण, Video Viral

त्यामुळे सर्वच जण हादरून गेले. जणू अजितदादाच समोर आहेत की काय असं काही क्षण सर्वांना वाटलं.

Pune News: तिच स्टाईल, तोच धाक, तोच रुबाब! सुनेत्रा पवारांच्या रुद्रावताराने अजित पवारांची आठवण, Video Viral
  • सुनेत्रा पवार यांनी बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालयाची अचानक भेट दिली
  • रुग्णालयातील स्वच्छतेच्या अभावामुळे त्यांनी कर्मचाऱ्यांना कठोर स्वरूपात प्रश्न विचारले
  • सुनेत्रा पवार यांनी रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचारी दिवसभर काय करतात याबाबतही विचारणा केली
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
पुणे:

देवा राखुंडे 

अजित पवारांची प्रशासनावर प्रचंड पकड होती. अधिकाऱ्यांना ते छापायला मागे पुढे पाहायचे नाहीत. मग ते कार्यालय असो की त्यांचा जनता दरबार. सकाळीच ते कामाला ही लागत होते. त्यांचा प्रचंड धाक होता. त्यामुळे अधिकारी कर्मचारी त्यांना टरकून होते. जे काय असेल ते समोरा समोर असा अजित पवारांचा स्वभाव होता. त्यांच्या या स्वभावाची आठवण आज चक्क सुनेत्रा पवारांच्या रुपाने दिसून आली. त्यांनी ही बारामतीच्या एका रुग्णालयात भेट दिली. त्यावेळी त्यांनी तिथल्या अधिकारी कर्मचाऱ्यांची चांगलीच शाळा घेतली. त्यांचा अवतार पाहून सर्वांनाच अजित पवारांची आठवण झाली. सुनेत्रा पवारांचा अधिकाऱ्यांना झापतानाचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. 

राज्याचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामतीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालयाला अचानक भेट दिली आहे. या वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सेवा मिळण्यात सातत्याने अडचणींचा सामना करावा लागत होता. या संदर्भात सतत तक्रार येत होत्या. याची गंभीर दाखल घेत सुनेत्रा पवार यांनी अचानक या मेडिकल कॉलेजला भेट दिली. सुनेत्रा पवार येणार याची काहीच कल्पना रुग्णालय प्रशासनाला नव्हती. 

नक्की वाचा - Purandar Airport: आता फक्त २ दिवस उरले... पुरंदर विमानतळाबाबत मोठी अपडेट; शेतकऱ्यांना करावं लागणार 'हे' काम

रुग्णालयाला भेट दिल्यानंतर रुग्णालय प्रशासनाची एकच धावपळ उडाली. आधी सुनेत्रा पवार यांनी स्वच्छतेचा आढवा घेतला. त्यावेळी त्यांना रुग्णालयात अस्वच्छता दिसून आली. त्यावर त्यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांना त्याची विचारणा केली. इथं अस्वच्छता का? ही तुमची स्वच्छता आहे का? स्वच्छता कशाला म्हणतात सांगा? असे एका पाठोपाठ एक प्रश्नांची सरबत्ती केली. त्यामुळे सर्वच जण हादरून गेले. जणू अजितदादाच समोर आहेत की काय असं काही क्षण सर्वांना वाटलं.    

नक्की वाचा - Ashadhi Wari 2026: यंदा तुकोबांच्या पालखीसाठी असणार आहे काही तरी खास, राजस्थानशी आहे थेट कनेक्शन

रुग्णालयातील अस्वच्छता पाहून सुनेत्रा पवार यांनी यंत्रणेला चांगलेच धारेवर धरले.आताच्या आता कामाला लागा. मला काही चुकीचं दिसलं नाही पाहीजे. तुम्हाला इथं जास्त काम आहे का? तुम्ही दिवसभर काय करता असे ही त्यांनी विचारले.  मोबाईलवर का? फक्त मोबाईलवर असता का अशा शब्दात त्यांनी फटकारले. येवढेच नाही तर त्यांनी जे लोक या अस्वच्छतेला जबाबदार आहेत त्यांची नावं लिहून घ्या असं ही यावेळी सुनेत्रा पवार म्हणाल्या. त्यांची स्टाईल, त्यांचा रुबाब आणि त्यांचा धाक हा अजित पवारांची आठवण करून देणारा होता. या वेळी काही लोकांनी हा व्हिडीओ शुट केला आहे. तो सध्या बारामती आणि परिसरात जोरदार व्हायरल होत आहे.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com