जाहिरात

Angaraki Sankashti Chaturthi 2026: अंगारक संकष्ट चतुर्थीची तिथी, चंद्रोदय वेळ, लाभ, पूजा सामग्रीसह सर्व माहिती

Angaraki Sankashti Chaturthi 2026 Date And Shubh Muhurat: नववर्षातील अंगारक संकष्ट चतुर्थीची तिथी, चंद्रोदयाची वेळ, पूजेसह संपूर्ण माहिती जाणून घेऊया...

Angaraki Sankashti Chaturthi 2026: अंगारक संकष्ट चतुर्थीची तिथी, चंद्रोदय वेळ, लाभ, पूजा सामग्रीसह सर्व माहिती
"When Is Angaraki Sankashti Chaturthi 2026 On 6th Or 7th January: अंगारकी संकष्टी चतुर्थी कधी आहे?"
Canva

Angaraki Sankashti Chaturthi 2026 Date And Shubh Muhurat: हिंदू धर्मात संकष्ट चतुर्थी हे अतिशय महत्त्वाचे व्रत मानले जाते. दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थी (Sankashta Chaturthi 2026) साजरी केली जाते. नववर्षातील पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी कधी आहे, 6 जानेवारी की 7 जानेवारी? (When Is Angaraki Sankashti Chaturthi 2026) अंगारकी संकष्टी चतुर्थीची योग्य तारीख, तिथी कालावधी, चंद्रोदयाची वेळ, पूजा सामग्री, पूजा कशी करावी यासह संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेऊया... 

When Is Angaraki Sankashti Chaturthi 2026 On 6th Or 7th January 2026

नववर्षातील अंगारक संकष्ट चतुर्थी 2026 तिथी (Angaraki Sankashti Chaturthi 2026 Time| New Year 2026

  • मंगळवार 6 जानेवारी 2026 सकाळी 8.01 वाजता चतुर्थी तिथी सुरू होईल.
  • बुधवार 7 जानेवारी 2026 सकाळी 6.52 वाजता चतुर्थी तिथी समाप्त होईल. 
  • पंचागानुसार 6 जानेवारी 2026 रोजी अंगारक संकष्ट चतुर्थी (Angarki Sankashti Chaturthi 2026) साजरी केली जाईल.

श्री गणेश पूजनाचे साहित्य | Shri Ganesh Pujan Sahitya | Angaraki Sankashti Chaturthi 2026 Puja Samagri 

  • श्रीफळ, चौरंग
  • हळद-कुंकू, गुलाल
  • दुर्वा- जास्वंदाची फुले
  • शेंदूर-चंदन, रक्तचंदन
  • कापूर, अष्टगंध, अक्षता, पंचामृत
  • उदबत्ती, धूप, समई-निरांजने
  • फुले, फळे, प्रसाद, नैवेद्य इत्यादी आवश्यक गोष्टींचा समावेश करावा. 

अंगारक संकष्ट चतुर्थी 2026 श्री गणेश पूजन कसे करावे? | Angaraki Sankashti Chaturthi 2026 Ganesh Puja Rituals 

  • पहाटे उठून स्नान करावे. 
  • स्वच्छ वस्त्र परिधान करून दिवसभर व्रताचे पालन करावे, संकल्प देखील करावा.
  • चौरंगावर स्वच्छ वस्त्र अंथरावे. त्यावर श्रीगणेशाची धातूची मूर्ती आणि प्रतिमा स्थापित करावी.
  • श्रीगणेशाच्या धातूच्या मूर्तीचा स्वच्छ पाण्याने आणि त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा.
  • अभिषेक करताना गणपती मंत्राचा 108 वेळा जप करावा. 
  • श्रीगणपतीस्तोत्र, अथर्वशीर्ष किंवा संकष्टनाशन स्तोत्र पठण करावे.
  • चंद्रोदयाच्या वेळेनुसार धूप, दीप, फुलेफळे अर्पण करुन पूजा करावी.
  •  बाप्पाला नैवेद्य अर्पण करावा.
  • चंद्राचे दर्शन करून अर्घ्य अर्पण करावे. चंद्राचे दर्शन घेऊन व्रत सोडावा.

शहरांनुसार चंद्रोदयाची वेळ | Angaraki Sankashti Chaturthi 2026 Chandrodaya Time | Maharashtra | Mumbai | Pune | Thane

  • मुंबई रात्री 9.22 वाजता
  • ठाणे रात्री 9.20 वाजता 
  • पुणे रात्री 9.17 वाजता 
  • सोलापूर रात्री 9.10 वाजता
  • नागपूर रात्री 8.53 वाजता
  • अमरावती रात्री 8.58 वाजता
  • रत्नागिरी रात्री 9.21 वाजता
  • अकोला रात्री 9.02 वाजता
  • कोल्हापूर रात्री 9.18 वाजता 
  • छत्रपती संभाजीनगर रात्री 9.10 वाजता
  • सातारा रात्री 9.18 वाजता
  • भुसावळ रात्री 9.07 वाजता
  • नाशिक रात्री 9.16 वाजता
  • परभणी रात्री 9.04 वाजता
  • अहिल्यानगर रात्री 9.13 वाजता
  • नांदेड रात्री 9.02 वाजता
  • पणजी रात्री 9.21 वाजता 
  • धाराशिव रात्री 9.09 वाजता
  • धुळे रात्री 9.11 वाजता
  • भंडारा रात्री 8.50 वाजता
  • जळगाव रात्री 9.08 वाजता
  • वर्ध रात्री 8.55 PM वाजता
  • चंद्रपूर रात्री 8.53 वाजता
  • वर्धा रात्री 8.55 वाजता
  • बुलढाणा रात्री 9.06 वाजता
  • यवतमाळ रात्री 8.58 वाजता
  • बीड रात्री 9.09 वाजता
  • सांगली रात्री 9.16 वाजता
  • सावंतवाडी रात्री 9.20 वाजता
  • मालवण रात्री 9.22 वाजता

Angarki Sankashti Chaturthi 2026 Upay: अंगारकी संकष्टी चतुर्थीला करा दुर्वांचे 6 प्रभावी उपाय, आर्थिक संकटांपासून या समस्यांपासून मिळेल मुक्तता

(नक्की वाचा: Angarki Sankashti Chaturthi 2026 Upay: अंगारकी संकष्टी चतुर्थीला करा दुर्वांचे 6 प्रभावी उपाय, आर्थिक संकटांपासून या समस्यांपासून मिळेल मुक्तता)

अंगारक संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्यास कोणते लाभ मिळतील? | Angaraki Sankashti Chaturthi 2026 Vrat Benefits
  • मंगळदोषापासून मुक्तता मिळते.
  • 12 महिन्यातील संकष्टी चतुर्थीचे पुण्यफळ लाभते, असे म्हणतात.
  • गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळतो.
  • जीवनातील अडथळे दूर होण्यास मदत मिळते. 
  • इच्छा पूर्ण होते.
  • पापदोष मुक्त होतात. 

 अंगारक संकष्ट चतुर्थीदिवशी कोणता उपाय करावा, पाहा व्हिडीओ

अंगारक संकष्ट चतुर्थीची पौराणिक कथा | Angarak Sankasht Chaturthi Katha | Angaraki Sankashti Chaturthi 2026 

अवंती नगरीमध्ये क्षिप्रा नदीच्या तीरावर भारद्वाज मुनी राहत होते. त्यांनी कठोर तपश्चर्या केली होती. ते श्री गणेशाचे मोठे भक्त होते. आश्रमात येणाऱ्या मुलांना ते श्री गणेशाची आराधना शिकवत असत. त्यांना मूलबाळ नव्हते. एकेदिवशी भारद्वाज मुनी नदीमध्ये स्नान करून काठावर ध्यान करत बसले. त्यावेळेस नारदांची स्वारी तेथे आली. नारदांनी त्यांना ध्यानातून बाहेर काढले आणि म्हणाले, "हे पाहा, गणेशदेव तुम्हाला प्रसन्न झाले आहेत. तुमच्यासमोर जे तान्हे बाळ आहे, तो श्री गणेश यांनीच तुम्हाला प्रसाद म्हणून दिलंय". भारद्वाजमुनींना आश्चर्य वाटले. मुनींनी बाळाला मांडीवर घेतले. ते अतिशय लाल लाल जणू अंगारच वाटत होते. मुनींनी बाळाचे नाव अंगारक पुत्र असे ठेवले.  

Angaraki Sankashti Chaturthi 2026: सिद्धिविनायक मंदिराचे दर्शन, नैवेद्य, महापूजेच्या वेळेसह सोयीसुविधांची माहिती वाचा एका क्लिकवर

(नक्की वाचा: Angaraki Sankashti Chaturthi 2026: सिद्धिविनायक मंदिराचे दर्शन, नैवेद्य, महापूजेच्या वेळेसह सोयीसुविधांची माहिती वाचा एका क्लिकवर)

मुनींनी बाळाला आपल्या आश्रमात आणले. त्याचे पालनपोषण केले. बालपणापासूनच त्याला वेदविद्या शिकविली. तो देखील गणेशाची आराधना करू लागला. एकेदिवशी तो आश्रमातून निघून गेला. त्याने नर्मदेची परिक्रमा केली. तेथील एका निवांत जागी त्याने  श्री गणेशाची कठोर आराधना केली. संकष्टी चतुर्थीच्या रात्री चंद्रोदयाच्या वेळी अंगारक गणपती बाप्पाच्या ध्यानामध्ये मग्न झाला. त्याची कठोर साधना फळास आली. गणपती बाप्पा प्रगट झाले. ते म्हणाले, "वत्सा,तुला काय हवंय ते माग."

Angaraki Sankashti Chaturthi 2026 Wishes, Greetings, Messages: बाप्पाच्या कृपेने स्वप्न होतील पूर्ण, अंगारक संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा

(नक्की वाचा: Angaraki Sankashti Chaturthi 2026 Wishes, Greetings, Messages: बाप्पाच्या कृपेने स्वप्न होतील पूर्ण, अंगारक संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा)

"मला धन, मान काहीच नको. तुमच्या रूपामध्ये मला विलीन करा. मुक्त करा." बाळाची मागणी ऐकून श्री गणेश म्हणाले, "तथास्तु ! अंगारका, तू भूमिपुत्र मंगळ आहेस. आज मंगळवार आहे. संकष्टी चतुर्थी देखील आहे. ही माझी आवडती तिथी आहे. आज तू माझ्यामध्ये एकरुपता प्राप्त केली आहेस. आजच्या मंगळवारी संकष्टी चतुर्थीला 'अंगारक चतुर्थी' हे नाव दिले जाईल. अशा या अंगारक चतुर्थीचे व्रत करणाऱ्यांना एकवीस संकष्ट चतुर्थी केल्याचे पुण्य लाभते." तेव्हापासून अंगारक संकष्ट चतुर्थीचे व्रत निष्ठेने साजरे होऊ लागले.  

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com