Angaraki Sankashti Chaturthi 2026: नववर्षातील पहिली अंगारकी संकष्टी चतुर्थी 6 जानेवारी रोजी आहे. यानिमित्ताने मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी दाखल होतील. या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने विशेष आयोजन केलंय. अंगारक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची महापूजा, नैवैद्य, आरती आणि दर्शनाच्या वेळा इत्यादी गोष्टींचा दिनक्रम सविस्तर जाणून घेऊया.
श्री गणेशाचं दर्शन घेण्याचे वेळापत्रक | Shree Siddhivinayak Ganapati Darshan Time
मध्यरात्री 1.30 वाजेपासून ते पहाटे 3.15 वाजेपर्यंत दर्शन घेता येईल.
पहाटे 3.50 ते दुपारी 12 वाजेपर्यंत दर्शन घेता येईल.
दुपारी 12.30 वाजेपासून ते रात्री 8 वाजेपर्यंत दर्शन घेता येईल.
रात्री 9.45 वाजेपासून ते रात्री 11.30 वाजेपर्यंत दर्शन घेता येईल.
श्री गणेशाची महापूजा, नैवेद्य आणि आरती | Shree Siddhivinayak Ganapati Mahapuja Time
पहाटेची आरती पहाटे 3.15 वाजेपासून ते पहाटे 3.50 वाजेपर्यंत असेल.
दुपारचा नैवेद्य 12 वाजेपासून ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत अर्पण केला जाईल.
धूप आरती संध्याकाळी 7 वाजेपासून ते संध्याकाळी 7.10 वाजेपर्यंत करण्यात येईल.
महापूजा नैवेद्य आणि आरती रात्री 8 वाजेपासून ते 9.45 वाजेपर्यंत संपन्न होईल.
गर्दी संपल्यानंतर शेजारती संपन्न होईल
रात्री 11.30 वाजता रिद्धि प्रवेशद्वार आणि सिद्धि प्रवेशद्वार बंद करण्यात येईल आणि शेजारती नंतर मंदिर बंद करण्यात येईल.
अंगारकी संकष्टी चतुर्थी 2026 चंद्रोदय कधी आहे? | Angaraki Sankashti Chaturthi 2026 Chandroday Time
6 जानेवारी 2026, मंगळवार, चंद्रोदय रात्री 9.22 वाजता
भाविकांना न्यासातर्फे देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा
- सिद्धिविनायक फेसबुक प्रणालीद्वारे श्रींच्या दर्शनाचे प्रक्षेपण करण्यात येईल.
- पुरूषांच्या आणि स्त्रियांच्या रांगेसाठी मंडप उभारण्यात येईल. तसेच भाविकांच्या सोयीकरिता मोफत चप्पल स्टँडची व्यवस्था मंडपातच करण्यात येणार आहे.
- मुखदर्शन चप्पल स्टेंड व्यवस्था सिद्धि प्रवेशव्दार बाहेरील पार्किंगजवळ करण्यात येणार आहे.
- मुख दर्शन/दूरून दर्शनाची व्यवस्था एस. के. बोले मार्गावरील मंदिर प्रवेशद्वार क्रमांक 1 मधून करण्यात येईल.
- मंदिरातर्फे रूग्णवाहिका, पाणपोई तसेच महापालिकेतर्फे फिरती नैसर्गिक विधीची व्यवस्था करण्यात येणार आहे.
- भाविकांकरिता मंदिरातर्फे विनामूल्य दूध/चहाची व्यवस्था करण्यात येणार आहेत.
भाविकांना सूचना
- भाविकांच्या मार्गदर्शनासाठी मंदिरातर्फे विविध सूचना फलक, बॅनर्स, मार्गदर्शिका पोस्टर लावण्यात येणार आहेत.
- भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी येताना कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू (कॅमेरा, लॅपटॉप, इत्यादी गोष्टी) आणू नये.
आशीर्वचन पूजा रांग
सिद्धिप्रवेशद्वार येथील सुरक्षा भिंत साने गुरुजी उद्यान येथील मंडप प्रवेशव्दार क्रमांक तीन गाभारा
बाहेर पडण्याचा मार्ग :
मंदिर प्रवेशद्वार क्रमांक 3 रिद्धी प्रवेशद्वार (काकासाहेब गाडगीळ मार्ग) विनामूल्य पादत्राणे ठेवण्याची जागा मंदिर प्रवेशद्वार क्रमांक 5 जवळ
गाभाऱ्यातून दर्शनासाठी महिलांची स्वतंत्र रांग:
राजे संभाजी उद्यान प्रवेशद्वार (रविंद्र नाट्य मंदिर शेजारी) मंडप - प्रवेशद्वार क्रमांक 6 प्रतीक्षालय इमारत प्रांगणातील रेलींग प्रवेशव्दार क्रमांक 7 गाभारा
बाहेर पडण्याचा मार्ग :
मंदिर प्रवेशद्वार क्रमांक 3 रिद्धी प्रवेशद्वार (काकासाहेब गाडगीळ मार्ग) विनामूल्य पादत्राणे ठेवण्याची जागा राजे संभाजी मैदानातील मंडप
राजे संभाजी उद्यान प्रवेशद्वार (रविंद्र नाट्य मंदिर शेजारी) मंडप पत्रा गेट प्रवेशक क्रमांक 4 गाभारा
बाहेर पडण्याचा मार्ग :
मंदिर प्रवेशद्वार क्रमांक 3 रिद्धी प्रवेशद्वार (काकासाहेब गाडगीळ मार्ग) विनामूल्य पादत्राणे ठेवण्याची जागा - राजे संभाजी मैदानातील मंडप
एस. के बोले मार्ग आगर बाजार हरदेव क्या दुकान सिद्धि प्रवेशद्वार मंदिर प्रवेशद्वार क्रमांक 7
बाहेर पडण्याचा मार्ग :
मंदिर प्रवेशद्वार क्रमांक 1 सिद्धी प्रवेशद्वार (एस. के. बोले मार्ग) विनामुल्य पादत्राणे ठेवण्याची जागा मोदकम हॉटेलसमोर
ज्येष्ठ नागरीक/नवजात बालक/दिव्यांग व्यक्ती/गरोदर स्त्रिया यांचे करिता रांग रिद्धी प्रवेशद्वारातून (काकासाहेब गाडगीळ मार्ग) प्रवेशद्वार क्रमांक 5 गाभारा
बाहेर पडण्याचा मार्ग :
मंदिर प्रवेशद्वार क्रमांक 3 रिद्धी प्रवेशद्वार (काकासाहेब गाडगीळ मार्ग) विनामुल्य पादत्राणे ठेवण्याची जागा रिध्दी प्रवेशव्दाराजवळ
- मंदिर गाभारा परिसरात वैद्यकीय पथक ठेवण्यात येणार आहे. कोणत्याही भाविकांस शारीरिक त्रास झाल्यास त्यांच्यासाठी दोन रुग्णवाहिकाची व्यवस्था करण्यात येणार आहे, यामध्ये एका कार्डिअॅक रुग्णवाहिकेचा समावेश आहे.
- मंडपामध्ये लाइट, पंखा, पिण्याचे पाणी, चहा, मोबाइल टॉयलेट इत्यादी व्यवस्था.
- महिला आणि पुरूष भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये विनामूल्य दुध चहाची व्यवस्था तसेच लाइट, पंखा, पिण्याचे पाण्याची व्यवस्था करण्यात आलीय.
लाडू / नारळवडी प्रसाद विक्री
प्रसादाचे काउंटर सिद्धि चेकपोस्ट आणि रिद्धि चेकपोस्टच्या बाहेरील बाजूस करण्यात आली आहे.
भाविकांना सूचना देण्यासाठी ध्वनीक्षेपक यंत्रणा आणि मेगा फोन
मंडपातील, रांगेतील आणि मंदिराच्या आतील रांगेतून दर्शन घेणाऱ्या भाविकांसाठी सूचना देण्यासाठी ध्वनीक्षेपक यंत्रणेची व्यवस्था करण्यात येणार आहे.
श्रीसिद्धिविनायक पोलीस चौकीमध्ये ध्वनीक्षेपक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे. तसेच मेगा फोनची व्यवस्था करण्यात येणार आहे.
फायर इंजिनची व्यवस्था, फायर एक्स्टिंग्विशर, फायर बकेट आणि फायर मार्शल
सुरक्षिततेचा उपाय म्हणून फायर इंजिन/अग्निशामक वाहन छत्रपती राजेसंभाजी उद्यान येथे ठेवण्यात येणार आहे. याशिवाय फायर एक्स्टिंग्विशर, फायर बकेट आणि फायर मार्शल व्यवस्था करण्यात येणार आहे.
अखंडित विद्युत पुरवठा
- बेस्टचा अखंडित विद्युत पुरवठा राहण्यासाठी बेस्ट प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी मंदिर परिसरात नियुक्त करण्यात येणार आहेत.
- त्याचप्रमाणे जनरेटरचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.
- भाविकांना मंडपात श्रींच्या दर्शनासाठी प्लाझ्मा / LED टीव्ही व्यवस्था.
- मंडपातील भाविकांना श्रींचे दर्शन थेट व्हावे यासाठी प्लाइमा / LED टीव्हीची व्यवस्था करण्यात येणार आहे.
मेट्रो सुविधा
मेट्रो LINE - 3 (AQUA LINE) ची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे मेट्रो सेवेचा भाविकांना लाभ घेता येणार आहे.
विनामूल्य बससेवा
- न्यासातर्फे भाविकांना दादर ते रविंद्रनाटय मंदिर या मार्गावर विनामूल्य बससेवा उपलब्ध करुन देण्यासाठी एकूण 20 खासगी वातानुकूलित बस
- दादर स्थानक रविंद्र नाट्य मंदिर
- सुरूवातीचा बस थांबा कबुतरखाना, दादर
- जय भारत सोसायटी दादर स्थानक
- परतीचा बस थांबा जय भारत सोसायटी, प्रभादेवी
भाविकांच्या सुरक्षेच्या उपाययोजना
बॅगेज स्कॅनर, सीसीटीव्ही कॅमेरे, डीएफएमडी, एचएचएमडी आणि वॉकी-टॉकी
भाविकांची प्रचंड गर्दी विचारात घेता भाविकांना लॅपटॉप आणि कॅमेरा न आणण्याबाबत प्रसिध्दी माध्यमांद्वारे सूचना देण्यात येणार आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

