- श्रीकेतन कुलकर्णी, ज्योतिषाचार्य
Angarki Sankashti Chaturthi 2026 Upay: अंगारक संकष्ट चतुर्थीचे व्रत आणि विधीवत पूजा तसेच प्रार्थना करणं अत्यंत फलदायी ठरते, असे म्हणतात. गणपती बाप्पाला प्रिय असलेल्या गोष्टी अर्पण केल्याने तो लवकर प्रसन्न होतो, अशी श्रद्धा आहे. या लेखाद्वारे आपण दुर्वांशी संबंधित करण्याचे सहा प्रभावी उपाय जाणून घेऊया...
अंगारक संकष्ट चतुर्थी 2026 कधी आहे? Angarki Sankashti Chaturthi 2026 Date | When Is Angarki Sankashti Chaturthi 2026
6 जानेवारी 2026 रोजी अंगारक संकष्ट चतुर्थी आहे.
दुर्वांचे महत्त्व | दुर्वांचे उपाय केल्यास कोणते लाभ मिळतात? | Durva Benefits In Marathi | Durva Upay On Sankashta Chaturthi 2026 Marathi
- गणेश पूजन दुर्वांशिवाय अपूर्ण मानले जाते.
- गृहप्रवेश, मुंज, विवाह, बुधवार आणि संकष्ट चतुर्थीसह सर्व शुभ कार्यांमध्ये दुर्वांचा उपयोग केला जातो.
- आपण गवताला दुर्वा म्हणत नाही तर त्रिदलयुक्त दुर्वा निवडून आपण ती गणेश देवतेला अर्पण करतो.
- यामागचा भावार्थ असा की, पूजेमध्ये मन पूर्ण एकाग्र व्हावे.
- मन शांत झाले की मार्ग आपोआप मोकळे होतात आणि चमत्कार घडतात.
1. आर्थिक संकट निवारणासाठी उपाय
पाच दुर्वा घेऊन दोऱ्याला 11 गाठी घालून छोटा हार तयार करा आणि बाप्पाला अर्पण करा.
लाभ: आर्थिक अडचणींमधून लवकर सुटका होते.
2. मनोकामना पूर्तीसाठी उपाय
गायीच्या दुधात दुर्वा मिसळून त्यापासून तयार झालेले गंध कपाळाला लावा.
लाभ: इच्छा लवकर पूर्ण होते.
3. घरातील संकट आणि कलह निवारणासाठी उपाय
दररोज गायीला चारा आणि दुर्वा खाऊ घाला.
लाभ: कौटुंबिक नात्यांत प्रेम, शांतता वाढते.
4. गणेशकृपा प्राप्तीसाठी उपाय
संकष्ट चतुर्थीला बाप्पाला 21 दुर्वांचे त्रिदल अर्पण करा.
सोबत अथर्वशीर्षाची 21 आवर्तने म्हणा किंवा ऐका.
लाभ: श्री गणेश देवतेची कृपा होईल.
5. धनवृद्धीसाठी उपाय
गणेश पूजेत नियमित दुर्वा अर्पण केल्याने आर्थिक कमतरता भासत नाही.
लाभ: उलट कामात यश आणि धनलाभ होतो, असे शास्त्र सांगते.
6. बुध दोष शांतीसाठी उपाय
बुधवारी किंवा चतुर्थीला गणेश मंदिरात 11 दुर्वांच्या जुडी अर्पण करा.
लाभ: बुध दोष कमी होतो आणि गणेश कृपा लाभते.
(नक्की वाचा: New Year 2026 Good Luck Tips: वर्ष 2026मध्ये आयुष्यात सुखसमृद्धीचा वर्षाव होईल, अडचणी होतील दूर; करा हे 9 उपाय)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
