Apara Ekadashi 2024: अपरा एकादशी कधी आहे? जाणून घ्या तारीख, पूजा विधी व शुभ मुहूर्त

Apara Ekadashi 2024: एकादशी भगवान विष्णू यांना समर्पित असते. एकादशीचा उपवास आणि भगवान विष्णुंची पूजा-अर्चना केल्यास सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्ती होते, असे मानले जाते. यंदा अपरा एकादशी कधी आहे? या दिवशी व्रत केल्यास कोणते लाभ मिळतात? जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Advertisement
Read Time: 3 mins
अपरा एकादशी दिवशी अशा पद्धतीने करा पूजा

Apara Ekadashi 2024: प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष या दोन एकादशी तिथी असतात. एकादशीच्या दिवशी उपवास केल्यास भाविकांच्या आयुष्यातील सर्व दुःख दूर होऊन सुखप्राप्ती होते, असे मानतात. पण अपरा एकादशी ही हिंदू धर्मातील अतिशय विशेष एकादशी मानली जाते, जी ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या 11व्या तिथिला साजरी केली जाते. ही एकादशी भगवान विष्णू (Lord Vishnu) यांना समर्पित असते. या दिवशी उपवास आणि भगवान विष्णुंची पूजा केल्यास सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्ती होते, असे मानतात. यंदा अपरा एकादशी (Apara Ekadashi 2024) कधी आहे? काय आहे या एकादशीचे महत्त्व आहे? जाणून घेऊया सविस्तर माहिती... 

(नक्की वाचा: Vastu Tips: महालक्ष्मीचा आशीर्वाद हवाय? हे उपाय ठरतील फलदायी)

अपरा एकादशी 2024 तिथी

हिंदू दिनदर्शिकेनुसार, यंदा अपरा एकादशी 2 जूनला साजरी करण्यात येणार आहे. अपरा एकादशी ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या 11व्या तिथिला पहाटे 5 वाजून 04 मिनिटांनी सुरू होणार असून 3 जून 2024 रोजी उशीरा रात्री 2 वाजून 41 मिनिटापर्यंत समाप्त होईल. त्यामुळे 2 जूनला तुम्ही उपवास करू शकता. उपवास सोडण्याची वेळ 3 जून 2024 रोजी 8.05 वाजेपासून ते 8.10वाजेदरम्यान आहे.

(नक्की वाचा: Tulsi Plant Rules: घरामध्ये तुळशीचे रोप असेल तर या गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा होईल मोठे नुकसान)

अपरा एकादशीचे महत्त्व 

धार्मिक मान्यतेनुसार अपरा आणि निर्जला एकादशी ज्येष्ठ महिन्यामध्ये येते. अपरा एकादशी ही सर्व पापांमधून मुक्ती देणारी एकादशी (Apara Ekadashi 2024) मानली जाते. 'अपार' या शब्दाचा अर्थ अमर्यादित, म्हणजेच अपरा एकादशीच्या दिवशी उपवास करणाऱ्यांना अमर्याद सुख आणि संपत्ती मिळते. म्हणूनच या तिथिला 'अपरा एकादशी' असे म्हणतात. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर अपरा एकादशी म्हणजे या दिवशी उपवास करणाऱ्या भाविकांना अमर्याद लाभ देणारी एकादशी असेही म्हटले जाते.

(नक्की वाचा: हनुमान चालीसाचे पठण करताना अजिबात करू नका या चुका, जाणून घ्या नियम)

असे म्हणतात की भगवान श्री कृष्णांनी राजा युधिष्ठिर यांना अपरा एकादशीचे महत्त्व सांगितले आणि या एकादशीच्या दिवशी उपवास (Ekadashi Vrat) करणाऱ्या व्यक्तीला स्वतःच्या पुण्य कर्मांमुळे खूप प्रसिद्धी मिळेल, असेही म्हटले होते.

Advertisement

अपरा एकादशीच्या दिवशी उपवास करण्याचे महत्त्व

अपरा एकादशीच्या (Apara Ekadashi 2024) दिवशी पहाटे ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करा. भगवान विष्णू आणि महालक्ष्मी मातेची पूजा-आराधना करा. एकादशी व्रताचा संकल्प करा. भगवान विष्णुंना पिवळ्या रंगाचे वस्त्र आणि नैवेद्य अर्पण करा. अपरा एकादशीचा व्रत केल्यास पापांचा अंत होईल.इतकेच नव्हे तर रोग, दोष आणि आर्थिक समस्यांपासूनही सुटका मिळते व अक्षय्य पुण्याची प्राप्ती होते, असे म्हणतात.

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Kanjivaram Saree | महिलांनो महत्त्वाची बातमी : सोन्याच्या किमती वाढल्याने कांजीवरम साड्या महागल्या

Topics mentioned in this article