Ashadhi Ekadashi 2024 Date : आषाढी एकादशीचे हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. यंदाच्या एकादशी तिथीपासून चातुर्मासही सुरू होत आहे, जो देवउठनी एकादशीपर्यंत असणार आहे. आषाढी एकादशीला विठुरायासह भगवान विष्णुचीही पूजा केली जाते. यंदा आषाढी एकादशी कधी आहे? शुभ मुहूर्त काय आहे? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...
(नक्की वाचा: Vastu Tips: महालक्ष्मीचा आशीर्वाद हवाय? हे उपाय ठरतील फलदायी)
आषाढी एकादशी 2024 कधी आहे?
यंदा 17 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. एकादशी तिथीचा प्रारंभ 16 जुलै रात्री 8.33 वाजता सुरू होणार असून तिथीची समाप्ती 17 जुलै रात्री 9.02 वाजता होईल.
(नक्की वाचा: हनुमान चालीसाचे पठण करताना अजिबात करू नका या चुका, जाणून घ्या नियम)
आषाढी एकादशीला पूजा करताना या गोष्टी ठेवा लक्षात
- पहाटे उठून स्नान करावे. सूर्यदेवतेला जल अर्पण करावे.
- आषाढी एकादशीचे व्रत करावे.
- घरातील देवाचे मंदिर स्वच्छ करावे.
- विठ्ठलाच्या मूर्तीला स्नान घालावे. दुधाचा अभिषेक करावा. यानंतर प्रतिमेस पिवळ्या रंगाचे वस्त्र, तुळशीची माळ, पिवळी फुले आणि चंदन अर्पण करा.
- यानंतर हळद-कुंकू, चंदन, अबीर, गुलाल, विडा, धूप अगरबत्ती, फुले अर्पण करून देवाची आरती करावी.
- देवाला उपवासाचा नैवेद्य अर्पण करावे.
- विठ्ठलाचे नामस्मरण करावे.
- आरती संपन्न झाल्यानंतर तीर्थ-प्रसादाचे वाटप करावे.
(नक्की वाचा: प्रभू श्रीरामाच्या नावावरून तुमच्या मुलाचे ठेवा सुंदर आणि अर्थपूर्ण नाव)
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.