Ashadhi Ekadashi 2026: वर्षभरातील 24 एकादशांमध्ये आषाढी एकादशीचे विशेष महत्त्व आहे. या एकादशीचे व्रत केल्यास 24 एकादशींचे पुण्य लाभते, असे म्हणतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी (देवांच्या निद्रेची) एकादशी आणि वद्य पक्षातील एकादशीला 'कामिका एकादशी' (Kamika Ekadashi 2026) असे म्हणतात. यंदा आषाढी एकादशी कधी आहे? आषाढी एकादशी तिथी, व्रतामागील इतिहास, धार्मिक महत्त्व याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...
आषाढी एकादशी तिथी | Ashadhi Ekadashi 2026 Tithi Time
पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची एकादशी तिथी 24 जुलै रोजी सकाळी 9.13 वाजता सुरू होणार असून 25 जुलै रोजी सकाळी 11.35 वाजता तिथी समाप्त होईल. तर उदय तिथीनुसार 25 जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी केली जाईल.
(नक्की वाचा: Devshayani Ekadashi 2026: देवशयनी एकादशीला भगवान विष्णूंची पूजा कशी करावी? काय करावे आणि काय टाळावे? वाचा नियम)
आषाढी एकादशी व्रत पारण | Ashadhi Ekadashi 2026 Vrat Paran Time
26 जुलै रोजी पहाटे 5.29 वाजेपासून ते सकाळी 8.22 वाजेपर्यंत आषाढी एकादशी व्रताचे पारण करावे.
(नक्की वाचा: Ashadhi Ekadashi 2026: आषाढी एकादशीला करा फक्त 'हे' एक काम, मिळेल वर्षभराच्या 24 एकादशींचे पुण्य!)
आषाढी एकादशीचे व्रत कसे करावे? | Ashadhi Ekadashi 2026 Vrat Puja
- आषाढी एकादशीच्या एक दिवस आधीच व्रताचे पालन करण्यास सुरुवात करावी.
- एकादशीच्या दिवशी पहाटे उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे परिधान करावे आणि व्रताचा संकल्प करावा.
- श्री विठ्ठल रुक्मिणी आणि भगवान विष्णूची विधीवत पूजा करावी.
- आषाढी एकादशीला संपूर्ण दिवस उपवास करावा.
- मनोभावे पूजा करून नैवेद्य अर्पण करावा.
- दुसऱ्या दिवशी व्रताचे पारण करावे.
एकादशीचे अद्वितीय महत्त्व | Ekadashi Importance
धर्मशास्त्रांमध्ये सर्व व्रतांमध्ये एकादशी व्रत सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. जसे सर्व मंत्रांमध्ये गायत्री मंत्र, सर्व देवांमध्ये भगवान श्रीविष्णू, सर्व तीर्थांमध्ये गंगामाता, सर्व नद्यांमध्ये गंगा नदी, सर्व वृक्षांमध्ये कल्पवृक्ष, सर्व पर्वतांमध्ये मेरू पर्वत, सर्व पक्ष्यांमध्ये गरुड तसेच सर्व व्रतांमध्ये एकादशी व्रत सर्वोच्च मानले गेले आहे. काही धर्मग्रंथांतील पारंपरिक वर्णनानुसार सर्व वर्णांमध्ये ब्राह्मण वर्ण श्रेष्ठ मानला गेला आहे. वर्षातील 24 एकादशींमध्ये आषाढी एकादशी अत्यंत श्रेष्ठ मानली जाते. या दिवशी श्रद्धेने व्रत, उपवास, जप, नामस्मरण आणि पूजन केल्यास वर्षभरातील सर्व एकादशांचे पुण्य प्राप्त होते. या दिवशी माहेरच्या आणि सासरच्या पितरांच्या सद्गतीसाठी तसेच पितृदोष निवारणासाठी संक्षिप्त भागवताचे वाचन, श्री वेंकटेश स्तोत्र, विष्णुसहस्रनाम तसेच भगवद्गीतेच्या नवव्या अध्यायाचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते.
आषाढी एकादशीच्या व्रताच्या दिवशी कोणता नैवेद्य अर्पण करावा? ऐका
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)