
Auspicious Time To Buy Vehicle Property Griha Pravesh 2025: सध्या नवरात्रोत्सव सुरु आहे. शारदीय नवरात्रीपासून ते दसरा आणि दीपावलीपर्यंतचा काळ प्रॉपर्टी (Property) आणि वाहन खरेदीसाठी, तसेच नव्या घरात प्रवेशासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या काळात गृह प्रवेशासाठीही काही विशेष शुभ मुहूर्त असतात. या तारखांमधील ग्रहांची स्थिती आणि नक्षत्रांनुसार शुभ वेळ निश्चित केली जाते, ज्याचे पालन लोक असे महत्त्वाचे व्यवहार करताना करतात. दृक पंचांगानुसार, नवरात्र, दसरा ते दिवाळीपर्यंत वाहन खरेदीसाठी शुभ वेळ, प्रॉपर्टी खरेदीसाठी शुभ वेळ आणि गृह प्रवेशासाठीचे शुभ मुहूर्त कोणत आहेत? जाणून घ्या याबद्दल संपूर्ण माहिती. (Auspicious Time to Buy Vehicle, Property, Griha Pravesh Muhurat)
वाहन खरेदीसाठी शुभ मुहूर्त| Vehicles Purchase Muhurat 2025| What is Auspicious Time To Buy Vehicle?
सप्टेंबर २०२५ मधील शुभ मुहूर्त
- २६ सप्टेंबर २०२५ (शुक्रवार): सकाळी ६:४१ पासून संपूर्ण रात्रभर शुभ मुहूर्त
- २ ऑक्टोबर २०२५ (गुरुवार): सकाळी ०९:१३ पासून ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ०६:१५ पर्यंत शुभ मुहूर्त
- ३ ऑक्टोबर २०२५ (शुक्रवार): सकाळी ०६:१५ पासून संध्याकाळी ०६:३२ पर्यंत शुभ मुहूर्त. नक्षत्र: श्रवण, धनिष्ठा.
ऑक्टोबर २०२५ मधील शुभ मुहूर्त
५ ऑक्टोबर (रविवार): सकाळी ०६:१६ पासून सकाळी ०८:०१ पर्यंत शुभ मुहूर्त. नक्षत्र: शतभिषा.
- १० ऑक्टोबर (शुक्रवार): संध्याकाळी ०७:३८ पासून ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ०६:१९ पर्यंत शुभ मुहूर्त. नक्षत्र: रोहिणी.
- १२ ऑक्टोबर (रविवार): सकाळी ०६:२० पासून दुपारी ०१:३६ पर्यंत शुभ मुहूर्त. नक्षत्र: मृगशिरा.
- १३ ऑक्टोबर (सोमवार): दुपारी १२:२६ पासून १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ०६:२१ पर्यंत शुभ मुहूर्त. नक्षत्र: पुनर्वसू.
- १५ ऑक्टोबर (बुधवार): सकाळी १०:३३ पासून दुपारी १२:०० पर्यंत शुभ मुहूर्त.
- २४ ऑक्टोबर (शुक्रवार): सकाळी ०६:२८ पासून २५ ऑक्टोबर रोजी पहाटे ०१:१९ पर्यंत शुभ मुहूर्त. नक्षत्र: अनुराधा.
- २९ ऑक्टोबर (बुधवार): संध्याकाळी ०५:२९ पासून ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ०६:३२ पर्यंत शुभ मुहूर्त. नक्षत्र: श्रवण.
- ३० ऑक्टोबर (गुरुवार): सकाळी ०६:३२ पासून सकाळी १०:०६ पर्यंत शुभ मुहूर्त. नक्षत्र: श्रवण.
३१ ऑक्टोबर (शुक्रवार): सकाळी १०:०३ पासून १ नोव्हेंबर रोजी सकाळी ०६:३३ पर्यंत शुभ मुहूर्त. नक्षत्र: धनिष्ठा, शतभिषा.

गृह प्रवेशासाठी शुभ मुहूर्त| Griha Pravesh Muhurat 2025| What is Auspicious Time to Grih Pravesh
सप्टेंबरमध्ये चांद्रमास (चंद्राच्या स्थितीमुळे) असल्यामुळे गृह प्रवेशासाठी कोणताही शुभ मुहूर्त नाही. ऑक्टोबरमध्ये देखील २२ तारखेपर्यंत शुभ नक्षत्रांचे योग नाहीत.
- २३ ऑक्टोबर, २०२५ (गुरुवार): दुपारी ०४:५१ पासून २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ०६:२८ पर्यंत शुभ मुहूर्त. नक्षत्र: अनुराधा.
- २४ ऑक्टोबर, २०२५ (शुक्रवार): सकाळी ०६:२८ पासून २५ ऑक्टोबर रोजी पहाटे ०१:१९ पर्यंत शुभ मुहूर्त. नक्षत्र: अनुराधा.
- २९ ऑक्टोबर, २०२५ (बुधवार): सकाळी ०६:३१ पासून सकाळी ०९:२३ पर्यंत शुभ मुहूर्त. नक्षत्र: उत्तराषाढा.
प्रॉपर्टी खरेदीसाठी शुभ मुहूर्त| Property Khaderi Muhurt| What is Auspicious Time To Buy Property
- २५ सप्टेंबर (गुरुवार): संध्याकाळी ०७:०९ पासून २६ सप्टेंबर रोजी सकाळी ०६:११ पर्यंत शुभ मुहूर्त. नक्षत्र: विशाखा.
- २६ सप्टेंबर, २०२५ (शुक्रवार): सकाळी ०६:११ पासून २७ सप्टेंबर रोजी सकाळी ०६:१२ पर्यंत शुभ मुहूर्त. नक्षत्र: विशाखा, अनुराधा.
(१ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान कोणताही शुभ मुहूर्त नाही.)
- १६ ऑक्टोबर, २०२५ (गुरुवार): सकाळी ०६:२२ पासून १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ०६:२३ पर्यंत शुभ मुहूर्त. नक्षत्र: आश्लेषा, मघा.
- १७ ऑक्टोबर (शुक्रवार): सकाळी ०६:२३ पासून १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ०६:२४ पर्यंत शुभ मुहूर्त. नक्षत्र: मघा, पूर्वाफाल्गुनी.
- २३ ऑक्टोबर (गुरुवार): सकाळी ०६:२७ पासून २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ०६:२८ पर्यंत शुभ मुहूर्त. नक्षत्र: विशाखा, अनुराधा.
- २४ ऑक्टोबर (शुक्रवार): सकाळी ०६:२८ पासून २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ०६:२८ पर्यंत शुभ मुहूर्त. नक्षत्र: अनुराधा.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world