चालताना अजिबात करू नका 'या' 5 चूका, Walk करण्याची योग्य वेळ कोणती? 99 टक्के लोकांना माहितच नाही

Walking Mistakes : चालणं हे खूप सोपं आणि प्रभावी व्यायाम मानलं जातं. दररोज चालल्याने तुमच्या आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. त्यामुळेच हेल्थ एक्स्पर्टही रोज चालण्याचा सल्ला लोकांना देत असतात.

जाहिरात
Read Time: 2 mins
Walking Mistakes
मुंबई:

Walking Mistakes : चालणं हे खूप सोपं आणि प्रभावी व्यायाम मानलं जातं. दररोज चालल्याने तुमच्या आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. त्यामुळेच हेल्थ एक्स्पर्टही रोज चालण्याचा सल्ला लोकांना देत असतात. चालण्याने हृदयाचं आजार, वजन कमी करणे आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. पण यासाठी योग्य पद्धतीने चालणं खूप आवश्यक असतं. लोक चालताना नेहमीच छोट्या मोठ्या चूका करतात. ज्यामुळे आरोग्यास फायद्या मिळण्याऐवजी नुकसानच होतं. प्रसिद्ध योग गुरु हंसा योगेन्द्र यांनी चालताना कोणत्या चूका होतात? याबाबत सांगितलं आहे. 

योग्य जागा आणि वेळ न निवडणे

हंसा योगेन्द्र सांगतात, चालणं नेहमी साफ आणि सुरक्षित जागेवर केलं पाहिजे. हायवे किंवा खूप जास्त ट्रॅफिक असणाऱ्या ठिकाणी चालल्याने आरोग्यास नुकसान होऊ शकतं. कारण तिथे प्रदुषण मोठ्या प्रमाणात असतं. याचसोबत योग्य वेळ निवडणे तितकच महत्त्वाचं असतं. अनेक लोक दिवसभरात कोणत्याही वेळी चालतात, त्यामुळे त्यांना आरोग्याचे फायदे मिळत नाहीत.चालण्याची योग्य वेळ सकाळी 7 ते 10 दरम्यान आणि संध्याकाळी 4 वाजेपासून सूर्यास्तापर्यंत मानली जाते. यावेळी हवा शुद्ध असते आणि प्रदुषण नसल्याने तुमचं नुकसान होत नाही.

चुकीचे कपडे आणि बूट घालणे

चालताना हलक्या वजनाचे आणि लवचीक असणारे शूज घाला. कडक सोल असणारे शूज चालण्यासाठी योग्य नसतात. तसच चालण्याचा व्यायाम करताना स्पोर्ट्स आऊटफीट्स घालणे गरजेचे असते. तुम्ही कॉटनचे कपडे घालू शकता, जेणेकरून घाम आल्यावर तुम्हाला योग्य मूव्हमेंट करणं सोपं होतं.   

नक्की वाचा >> Apple Health Benefits : फक्त 30 दिवस रिकाम्या पोटी सफरचंद खा..आरोग्याच्या 'या' समस्यांपासून कायमची होईल सुटका

पाणी पिण्याची चूक

अनेक लोक चालताना अधूनमधून पाणी पितात. पण अशा लोकांनी ही चूक अजिबात करू नये. चालण्याच्या 15-20 मिनिटे आधी पाणी पिणं चांगलं असतं. पण चालताना पाणी प्यायल्याने आरोग्यास नुकसान होऊ शकतं. यामुळे शरीरातील वॉटर-सॉल्ट बॅलेन्स बिघडतं.

Advertisement

डोकं खाली करू चालू नका

वाकून किंवा डोकं खाली करून चालल्याने श्वास घेण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो.चालताना शरीर सरळ ठेवा. हातांना खूप जोरात हलवू नका. नाहीतर खांदे आणि नसांवर परिणाम होईल. छोटी पावले टाका आणि ती वेगवान असली पाहिजेत. जोराजोरात पाऊल टाकल्याने गुडघेदुखी होऊ शकते.

नक्की वाचा >> गरबा खेळली अन् मध्यरात्री घरी निघाली, रस्त्यात एकटीला पाहून Rapido ड्रायव्हरने जे केलं..तरुणीनं व्हिडीओच बनवला

चालण्याचा वेग किती असावा?

जेवण केल्यानंतर लगेच वेगाने चालू नका. काही खाल्ल्यानंतर चालायचं असेल, तर दहा-पंधरा मिनिटांनी स्लो जॉग करा.जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल, तर खाण्याआधी वेगानं चाला.स्लो जॉग केल्याने हृदयाचं आरोग्य उत्तम राहतं आणि तुमचा फिटनेसही चांगला राहतो. 

Advertisement