जाहिरात

Apple Health Benefits : फक्त 30 दिवस रिकाम्या पोटी सफरचंद खा..आरोग्याच्या 'या' समस्यांपासून कायमची होईल सुटका

Apple Health Benefits In Marathi :  सकाळी उठल्यावर दिवसाची सुरुवात कशी करावी? असे प्रश्न अनेकांना पडतो. तर काहींचे दिवसभरातील प्लॅन आधीच ठरलेले असतात. पण काय खावे आणि काय खाऊ नये? असा प्रश्नही अनेकांना पडतो.

Apple Health Benefits : फक्त 30 दिवस रिकाम्या पोटी सफरचंद खा..आरोग्याच्या 'या' समस्यांपासून कायमची होईल सुटका
Apple Health Benefits

Apple Health Benefits In Marathi :  सकाळी उठल्यावर दिवसाची सुरुवात कशी करावी? असे प्रश्न अनेकांना पडतो. तर काहींचे दिवसभरातील प्लॅन आधीच ठरलेले असतात. पण काय खावे आणि काय खाऊ नये? असा प्रश्नही अनेकांना पडतो. सकाळी उठल्यावर काही जणांना चहाची तलप लागते. तर काही लोक कॉफी किंवा ग्रीन टी पिणं पसंत करतात. पण तुम्ही कधी विचार केलाय का..फक्त एक सफरचंद रिकाम्या पोटी खाल्ल्याने तुमचं संपूर्ण जीवन सकारात्मक होऊ शकतं? हे एक फळ तुमचं दैनंदिन जीवनात मोठी एनर्जी आणि फ्रेशनेस आणू शकतं. 

पचनक्रिया सुधारते आणि एनर्जी बुस्ट होते

सफरचंदमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतं. त्यामुळे पचनक्रीया अॅक्टिव्ह राहते. अनेक लोक म्हणतात की, जेव्हा त्यांनी सकाळी रिकाम्या पोटी सफरचंद खाणं सुरु केलं, तेव्हा त्यांची शारीरिक उर्जा वाढली.सफरचंदाच्या सेवनामुळे पोट साफ होतं आणि दिवसाची सुरुवात खूप चांगली होते. 

नक्की वाचा >> ऐश्वर्या-सलमानचा ब्रेकअप कसा झाला? 'सलमानने धमकी दिली, तेव्हा मला..', विवेक ओबेरॉयने सांगितली INSIDE स्टोरी

फिटनेस आणि लाईफस्टाईलचं बॅलेन्स

जर तुम्ही वर्कआऊट करत असाल किंवा वजन नियंत्रणात ठेवत असाल, तर तुम्ही रिकाम्या पोटी सफरचंद खावे. यामुळे तुमच्या आरोग्यास अनेक फायदे मिळू शकतात. यामध्ये नैसर्गिक साखर आणि फायबर मोठ्या प्रमाणात असतं. ज्यामुळे तुम्हाला भरपूर उर्जा मिळते आणि क्रेविंग्सही नियंत्रणात राहतं. महिनाभर सफरचंद खाल्ल्याने तुम्ही खूप एक्टीव्ह आणि फिट राहू शकता.

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

सफरचंदाचं सेवन केल्यानंतर तुमचा मूडही फ्रेश होतो. जर दिवसाची सुरुवात हेल्दी फूडचं सेवन करून केली, तर लंच आणि डीनरमध्येही कॅलरीजचा बॅलेन्स राहतो. म्हणून सकाळी सफरचंद खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. विशेषत: हृदयाचं आरोग्य चांगलं राहू शकतं. 

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

नक्की वाचा >> गरबा खेळली अन् मध्यरात्री घरी निघाली, रस्त्यात एकटीला पाहून Rapido ड्रायव्हरने जे केलं..तरुणीनं व्हिडीओच बनवला

त्वचा आणि केसांवर परिणाम

सकाळी सफरचंद खाल्ल्याने तुम्हाला फक्त एनर्जीच मिळत नाही.तर तुमची त्वचा निरोगी राहण्यासाठीही हे फळ उपयु्क्त आहे. सफरचंदमध्ये विटॅमीन्स आणि मोठ्या प्रमाणात एँटीऑक्सीडंट्स असतात.यामुळे त्वचेचा ग्लो वाढतो. तसच सफरचंद खाल्ल्याने केसांची ग्रोथही होते.अनेक लोक म्हणतात की, एक महिनाभर सफरचंद खाल्ल्याने त्यांची त्वचा फ्रेश आणि केस मजबूत होतात. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com