Constipation Remedy: जुनाट बद्धकोष्ठतेमुळे पोट स्वच्छ होत नाही? आयुर्वेदिक डॉक्टरांचा 1 घरगुती उपाय करेल कमाल

Constipation Remedy: बदलत्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी आयुर्वेदिक डॉक्टर उपासना वोहरा यांनी सांगितलेला हा रामबाण घरगुती उपाय नक्की ट्राय करा. जाणून घ्या साहित्य आणि सेवन पद्धत.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Constipation Remedy: बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी रामबाण उपाय"
Gemini AI

Constipation Remedy: बदलत्या लाइफस्टाइलनुसार बहुतांश लोक बद्धकोष्ठतेच्या समस्येमुळे हैराण झाले आहेत. पोट स्वच्छ न होणे ही बाब अनेक अडचणींचे कारण ठरू शकते. अनेकदा लोक या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी असंख्य उपाय करतात, पण काही केल्या आराम मिळत नाही. नुकतेच आयुर्वेदिक डॉक्टर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर उपासना वोहरा यांनी बद्धकोष्ठतेच्या उपायाबाबत व्हिडीओ शेअर केला आहे.  

येथे व्हिडीओ पाहा

Advertisement

बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी रामबाण उपाय| Constipation Remedy

सामग्री:
दोन अंजीर 
चार खजूर  
दोन मनुके  

कसे तयार करावे मिश्रण?

  • सर्वात आधी 2 अंजीर, 2 मनुका आणि 4 खजूर पाण्यात भिजवून ठेवा.
  • आता भिजवलेल्या सुक्या मेव्याची एक पेस्ट बनवून घ्या.
  • बडीशेपची पूड (पावडर) करून या मिश्रणात मिक्स करा.
  • बद्धकोष्ठतेपासून आराम देणारी पावडर तयार आहे.

(नक्की वाचा: Monsoon Diet: पावसाळ्यात आजारी पडणे कायमचे विसरा, वैद्य उर्मिला पिटकर यांनी सांगितला आरोग्याचा महामंत्र)

सुकामेव्याच्या पेस्टचे सेवन कसे करावे?
 
डॉक्टर उपासना यांनी सांगितले की, तुम्ही ही पावडर रोज दुधासोबत घेऊ शकता, पण ज्या दुधाची अ‍ॅलर्जी आहे किंवा पचनसंस्था कमकुवत आहे, त्यांनी दुधाचा पर्याय टाळावा. दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही एक ग्लास गरम पाण्यात पेस्ट मिक्स करून ते पाणी पिऊ शकता.  

(नक्की वाचा: High Protein Dhokla: वेटलॉस करायचंय? नेहमीचा ढोकळा खाणे सोडा, सकाळी नाश्त्याला खा 'हा' हाय प्रोटीन ढोकळा)

बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होण्यामागील कारणे| What Causes Constipation

  • फायबरची कमतरता 
  • पाण्याची कमतरता 
  • खाण्यापिण्याच्या वाईट सवयी 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)