Protein Dhokla: तुम्ही सुद्धा वजन कमी करण्यासोबत मसल्स बनवू इच्छिता आणि अशा रेसिपीच्या शोधात आहात, जी ही दोन्ही कामे सोपी करेल? तर तुम्ही अगदी योग्य माहिती वाचत आहात. या लेखाद्वारे आपण एक सोपी आणि प्रोटीनयुक्त रेसिपी जाणून घेणार आहोत, जी अतिशय कमी वेळात तयार होते. तुम्ही आजवर बेसन किंवा रव्यापासून तयार केलेला ढोकळा खाल्ला असेल, ज्याद्वारे चव मिळते पण प्रोटीनचे प्रमाण खूपच कमी असते. पण आपण जी रेसिपी जाणून घेणार आहोत, त्याद्वारे तुम्हाला 25 ग्रॅम प्रोटीन सहज मिळतील.
प्रोटीनयुक्त ढोकळा खाण्याचे फायदे
- प्रोटीन- 25 ग्रॅम
- कॅलरीज- 320
- कार्ब्स- 19 ग्रॅम
- फॅट- 15 ग्रॅम
- फायबर- 2.8 ग्रॅम
पाहा पोस्ट
स्पेशल ढोकळा रेसिपी
हा ढोकळा नेहमीच्या ढोकळ्यापेक्षा खूप वेगळा आहे. कारण यामध्ये प्रोटीनचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. भिजवलेल्या डाळी आणि पनीर किंवा सत्तूच्या योग्य मिश्रणाने तयार केलेल्या ढोकळ्यामध्ये पोषणतत्त्वांचे प्रमाण जास्त असते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ढोकळा झटपट शिजतो.
(नक्की वाचा: Soak Raisins Benefits: रोज सकाळी 8-10 भिजवलेले मनुके खाल्ल्यास काय होते? त्याचे पाणी प्यावे की नाही? वाचा डॉ. अवतारांचा सल्ला)
हाय-प्रोटीन ढोकळा कसा तयार करावा? (How To Make Protein Rich Dhokla)
- सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यात बेसन, दही, पनीर एकत्रित करून पेस्ट तयार करून घ्या.
- यामध्ये साखर, मीठ, तेल आणि हळद देखील मिक्स करा.
- ढोकळ्याची पेस्ट एका भांड्यात काढा, त्यात बेकिंग सोडा मिक्स करा.
- ढोकळ्याचे बॅटर एका भांड्यात घेऊन दोन मिनिटांसाठी वाफवून घ्यावे.
- तयार आहे गरमागरम आणि मऊ ढोकळा.
- ढोकळ्यावर कढीपत्ता आणि मोहरीची फोडणी द्यावी आणि आवडत असल्यास लिंबाचा रसही पिळावा.
(नक्की वाचा: Clove Water Benefits: सकाळी रिकाम्या पोटी 21 दिवस लवंगचे पाणी प्यायल्यास काय होईल? जाणून घ्या 4 मोठे फायदे)
25 ग्रॅम प्रोटीन असलेला ढोकळा खाण्याचे फायदे
- 25 ग्रॅम प्रोटीनमुळे तुमच्या शरीराची दिवसभराची प्रोटीनची आवश्यकता पूर्ण होण्यास मदत मिळेल.
- जर तुम्ही वजन कमी करत असाल तर हा नाश्ता तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट आहे. हाय-प्रोटीन असल्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते आणि वारंवार भूक लागणार नाही.
- जे लोक वर्कआऊट करतात किंवा जिममध्ये जातात, त्यांच्यासाठी हा एक उत्तम पोस्ट-वर्कआऊट स्नॅक ठरू शकतो.
- सकाळी-सकाळी ऑफिस किंवा कॉलेजला जाण्याच्या घाईत जेव्हा स्वयंपाकासाठी वेळ नसतो तेव्हा फक्त दोन मिनिटांत हा पौष्टिक पदार्थ तयार होतो.
- तळलेला-भाजलेला नसल्यामुळे हा नाश्ता पोटासाठी खूप हलका असतो आणि हा खाल्ल्यानंतर जडपणा जाणवत नाही.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world