Hair Growth Faster Tips: केस लांबसडक आणि जाड होतील, सहा महिने फॉलो करा या 5 टिप्स

Hair Growth Faster Tips: प्रसिद्ध योगगुरु हंसा योगेंद्र यांनी केसांच्या आरोग्याशी संबंधित समस्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी काही खास टिप्स सांगितल्या आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...

जाहिरात
Read Time: 3 mins
"Hair Growth Faster Tips: केसांच्या वाढीसाठी रामबाण घरगुती उपाय"

Hair Growth Faster Tips: लांबसडक, घनदाट आणि जाड केस मिळवण्यासाठी महिलावर्ग कित्येक उपाय करतात. पण अयोग्य लाइफस्टाइल, ताणतणाव आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे केस गळणे, केस कोरडे होणे, केस पातळ होणे यासारख्या समस्यांमुळे कित्येक जण त्रस्त आहेत. केसांची योग्य पद्धतीने काळजी घेतली तर केस घनदाट आणि मजबूत होऊ शकतात. केसांच्या वाढीसाठी योगगुरू हंसा योगेंद्र यांनी सांगितलेल्या पाच टिप्स जाणून घेऊया...  

1. हर्बल हेअर ऑइल | Herbal Oil For Hair Growth

योगगुरू हंसा योगेंद्र यांनी यु-ट्यूबवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलंय की, केस मुळासकट मजबूत करण्यासाठी तेलाने मसाज करणे अतिशय आवश्यक आहे. मसाज केल्यास स्कॅल्पच्या भागातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारेल, यामुळे केसांवर खोलवर पोषणतत्त्वांचा पुरवठा होईल आणि केसांची वाढ जलदगतीने होईल. तुम्ही घरच्या घरीही तेल तयार करू शकता. नारळाच्या तेलामध्ये कढीपत्ता आणि जास्वंदाचे फुल गरम करा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा केसांना या तेलाने मसाज करावा आणि कमीत कमी तासभरानंतर केस सौम्य शॅम्पूने स्वच्छ धुऊन घ्या.   

2. प्रोटीन हेअर मास्क | Protein Hair Mask 

हंसा योगेंद्र यांनी सांगितले की, केस मुळासकट मजबूत होण्यासाठी प्रोटीन अतिशय आवश्यक आहे. यासाठी मोड आलेले कडधान्य, मेथीच्या बिया दह्यामध्ये मिक्स करुन हेअरमास्क तयार करा. 30-40 मिनिटांनंतर केस सौम्य शॅम्पूने स्वच्छ धुऊन घ्या. आठवड्यातून एकदा हे मास्क लावल्यास केसांना खोलवर पोषणतत्त्वांचा पुरवठा होईल. यासह डाएटमध्येही प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करावा. 

3. आवळा-रीठा शॅम्पू | Amla Reetha Shampoo For Hair 

केमिकलयुक्त शॅम्पूचा वापर केल्यास केस कमकुवत होतात. याऐवजी घरगुती नैसर्गिक शॅम्पूचा वापर करण्याचा सल्ला हंसा योगेंद्र यांनी दिलाय. आवळा आणि रीठा पावडर समसमान प्रमाणात पाण्यामध्ये मिक्स करा आणि पाणी उकळा. तयार झालेले पाणी गाळून त्याचा नैसर्गिक शॅम्पूप्रमाणे वापर करावा. यामुळे स्कॅल्पची त्वचा स्वच्छ होईल आणि केसगळतीही कमी होईल. महिनाभर या नैसर्गिक शॅम्पूचा वापर केल्यासही केसांमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील.  

Advertisement

4. तांदळाचे पाणी

केसांच्या वाढीसाठी तांदळाचे पाणी देखील फायदेशीर मानले जाते. तांदूळ स्वच्छ धुऊन रात्रभर ते पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी पाणी गाळून घ्या केसांसाठी त्याचा वापर करा. तांदळाच्या पाण्यामुळे केस मऊ, चमकदार आणि मजबूत होतील.  

(नक्की वाचा : Hair Growth Tips: केसांच्या वाढीसाठी सर्वात चांगले तेल कोणते? )

5. तेजपत्ता

हेअर केअर रुटीनमध्ये योगगुरू हंसा योगेंद्र यांनी तेजपत्त्याचाही समावेश करण्याचा सल्ला दिलाय. तेजपत्ता पाण्यामध्ये उकळावे आणि पाणी गाळून स्प्रे बॉटलमध्ये भरावे. रात्री झोपण्यापूर्वी केसांना तेजपत्त्याचे पाणी लावावे. यामुळे केसांच्या मुळांना पोषणतत्त्वांचा पुरवठा होईल आणि केसांची जलदगतीने वाढ होईल.

Advertisement

(नक्की वाचा: White Hair Remedy: नारळ तेलात मिक्स करा या 3 गोष्टी, मुळासकट काळे होतील पांढरे केस आणि केसांची होईल भराभर वाढ)

Advertisement

याव्यतिरिक्त डाएटमध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. सुंदर केसांसाठी पौष्टिक-संतुलित आहार आणि चांगली लाइफस्टाइल फॉलो करणे आवश्यक आहे. डाएटमध्ये बदाम, पालक, अळशी यासारख्या गोष्टींचा समावेश करावा. पुरेशा प्रमाणात झोप घ्यावी आणि मानसिक तणाव कमी करण्याचा प्रयत्न करावा. 
 
हंसा योगेंद्र यांनी सांगितले की, केसांच्या वाढीसाठी तुम्ही सलग सहा महिने या पाच पद्धती फॉलो केल्यास तर सहा महिन्यांमध्ये केसांमध्ये चांगले बदल दिसतील. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )