Beauty Care Tips: स्पर्धेच्या युगामध्ये हल्ली सर्वजण आरोग्यासह त्वचा आणि केसांची देखील पुरेपूर काळजी घेतात. कारण निरोगी आरोग्यासह व्यवस्थित दिसणे देखील तितकेच महत्त्वाचे झाले आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार महिला तसेच पुरुष त्यांच्या स्किन केअर रुटीनमध्ये वेगवेगळ्या तेलांचा समावेश करतात. यापैकीच एक तेल म्हणजे नारळाचे तेल. नारळाच्या तेलामध्ये कित्येक गुणधर्मांचा साठा आहे. त्वचेसह केसांसाठीही नारळाचे तेल वापरले जाते. नारळाच्या तेलामध्ये लॉरिक अॅसिड, फॅटी अॅसिड आणि अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म देखील आहेत. या तेलामुळे त्वचेला ओलावाही मिळतो. पण तेलकट त्वचेची समस्या असणाऱ्यांना नारळाचे तेल न वापरण्याचा सल्ला दिला जातो. नारळाचे तेल त्वचेवर लावण्याचे फायदे-नुकसान आणि चेहऱ्यावर तेल लावण्याची योग्य पद्धत जाणून घेऊया...
(नक्की वाचा : Navratri Diet: नवरात्रौत्सवादरम्यान वजन कमी करण्यासाठी खा हे पदार्थ, जाणून घ्या वेट लॉस डाएट प्लान)
चेहऱ्यावर नारळाचे तेल लावण्याची योग्य पद्धत | Right Way Of Applying Coconut Oil On Face
- चेहऱ्यावर मुरुम तसेच पुरळांची समस्या असल्यास, त्वचा तेलकट असल्यास नारळाचे तेल वापरू नये. कारण मुरुमांची समस्या वाढू शकते.
- साधारणतः रात्री झोपताना खोबरेल तेल चेहऱ्यावर लावण्याचा सल्ला दिला जातो.
- नारळाचे तेल चेहऱ्यावर सनस्क्रीनप्रमाणेही लावले जाते, जे मुळीच योग्य नाही.
- नारयल तेल आणि सनस्क्रीन या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत, ज्यामुळे त्वचेला वेगवेगळे फायदे मिळतात.
- आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात नारळाच्या तेलाचा वापर केल्यास त्वचेचे नुकसान होऊ शकते.
- कोरडी त्वचा, चेहऱ्याची त्वचा पांढरी पडत असल्यास नारळाचे तेल त्वचेवर लावून मसाज करा आणि रात्रभर तेल चेहऱ्यावर लावून ठेवावे.
(नक्की वाचा: Hair Growth Tips: केस होतील लांबसडक, घनदाट आणि जाड! घरच्या घरी तयार करा हे 3 तेल)
नारळाचे तेल चेहऱ्यावर लावण्याची योग्य पद्धत
- तळहातावर नारळाच्या तेलाचे दोन ते तीन थेंब घ्या आणि चेहऱ्यावर लावा.
- हलक्या हाताने चेहऱ्याचा मसाज करावा.
- त्वचा रगडू नये.
- नारळाचे तेल चेहऱ्यावर अर्ध्या तासाकरिता लावा आणि त्यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा.
- नारळाच्या तेलामध्ये चिमूटभर हळद मिक्स करून लावल्यास त्वचेला अधिक फायदे मिळू शकतील.
(नक्की वाचा: Beauty Tips: केसांसाठी केमिकल ट्रिटमेंट करताय? नुकसान टाळण्यासाठी फॉलो करा तज्ज्ञांच्या टिप्स)
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.