जाहिरात

Hair Growth Tips: केस होतील लांबसडक, घनदाट आणि जाड! घरच्या घरी तयार करा हे 3 तेल

Homemade Hair Oil: कोणते तेल वापरल्यास केसांची चांगली वाढ होईल आणि केसांशी संबंधित सर्व समस्या सुटतील?

Hair Growth Tips: केस होतील लांबसडक, घनदाट आणि जाड! घरच्या घरी तयार करा हे 3 तेल

Hair Growth Tips:  केसांशी संबंधित सर्व समस्यांपासून मुक्तता हवी असेल तर तेलाने केसांचा मसाज करणं आवश्यक आहे. कारण तेलातील पोषक घटकांमुळे केसांचे आरोग्य सुधारते. पूर्वी केसांसाठी घरच्या घरीच तेल तयार केले जात असे. पण हल्ली धकाधकीच्या लाइफस्टाइलमुळे लोक बाजारात उपलब्ध असणारे तेल विकत घेऊ लागले आहेत. बाजारात मिळणाऱ्या तेलामध्ये कृत्रिम रंग, सुगंध आणि केमिकल्सचा समावेश असतो, ज्यामुळे केसांचे नुकसान होते. केसगळतीच्या समस्येपासून सुटका हवी असल्यास घरच्या घरीच तेल तयार करा. नैसर्गिक तेलामुळे केसांची चांगली वाढ होईल आणि केसांचे तुटणे देखील कमी होण्यास मदत मिळेल. घरच्या घरी केसांसाठी तेल कसे तयार करावे? जाणून घेऊया सविस्तर माहिती...

केसांची चांगली वाढ होण्यासाठी घरच्या घरी तयार करा तेल | Homemade Hair Oil For Hair Growth 

कढीपत्त्याचे तेल

कढीपत्त्यामुळे केसांशी संबंधित सर्व समस्या कमी होऊ शकतात. कढीपत्त्यामध्ये प्रोटीन आणि बीटा केरेटीनचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे केसगळतीची समस्या कमी होण्यास मदत मिळते. कढीपत्ता म्हणजे (Curry Leaves) अँटी-ऑक्सिडंट्सचा उत्तम स्त्रोत आहे, यामुळे केसांचे फ्री-रॅडिकल्सपासून संरक्षण होते. नारळाच्या तेलामध्ये कढीपत्ता मिक्स करून तेल गरम करा. एक मोठी वाटी नारळाच्या तेलामध्ये मूठभर कढीपत्ता टाकावा. कढीपत्त्याचा रंग बदलल्यानंतर गॅस बंद करावा. यानंतर तेल गाळून एका बाटलीमध्ये भरावे. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा तेलाने केसांचा मसाज करावा.  

Beauty Tips: केसांसाठी केमिकल ट्रिटमेंट करताय? नुकसान टाळण्यासाठी फॉलो करा तज्ज्ञांच्या टिप्स

(नक्की वाचा: Beauty Tips: केसांसाठी केमिकल ट्रिटमेंट करताय? नुकसान टाळण्यासाठी फॉलो करा तज्ज्ञांच्या टिप्स)

जास्वंदाच्या फुलाचे तेल

जास्वंदाच्या फुलामध्ये व्हिटॅमिन सी, फ्लेव्हेनॉइड्स, अमिनो अ‍ॅसिडसह फायबरसह अँटी-ऑक्सिडंट्सचे गुणधर्म असतात. जास्वंदाच्या फुलातील गुणधर्मामुळे केसांना मॉइश्चराइझर मिळते आणि केसांचे गळणे कमी होण्यास मदत मिळेल. एक मोठी वाटी नारळाच्या तेलामध्ये जवळपास 10 जास्वंदाची फुले-पाने मिक्स करून तेल गरम करावे. जास्वंदाची फुले आणि पाने स्वच्छ करून मिक्सरमध्ये वाटून घ्या आणि नारळाचे तेल गरम करा, त्यामध्ये पेस्ट मिक्स करा. तेल गॅसच्या मध्यम आचेवर गरम करा. तेल तयार झाल्यानंतर गॅस बंद करा. तेल थंड झाल्यानंतर गाळा आणि एका बाटलीमध्ये भरा. केस धुण्यापूर्वी अर्धा तासाकरिता तेल लावा आणि स्कॅल्पचा मसाज करावा. 

वारंवार हेअर डाय केल्याने होतात हे 6 तोटे, पैसे वाया जातात शिवाय केसांचे होते मोठे नुकसान

(नक्की वाचा: वारंवार हेअर डाय केल्याने होतात हे 6 तोटे, पैसे वाया जातात शिवाय केसांचे होते मोठे नुकसान)

मेथीचे तेल 

मेथीच्या दाण्यातील पोषकघटक केसांसाठी फायदेशीर आहेत. मेथीमध्ये अँटी फंगल, अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म आहेत. या घटकांमुळे केसांची वाढ होते आणि केसांमधील कोंडा देखील कमी होतो. मेथीचे तेल तयार करण्यासाठी नारळाचे तेल किंवा ऑलिव्ह ऑइल वापरू शकता. तेलामध्ये मेथीचे दाणे मिक्स करा आणि तेल गॅसच्या मध्यम आचेवर गरम करा. तेल तयार झाल्यानंतर गॅस बंद करा आणि तेल थंड होऊ द्यावे. तेल थंड झाल्यानंतर गाळा आणि एका बाटलीमध्ये भरा. आठवड्यातून तीनदा या तेलाचा वापर करावा.  

घरच्या घरी हे तेल तयार केल्यास केसांशी संबंधित सर्व समस्या सुटण्यास मदत मिळेल.

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com