
Skin Care Tips: स्किन केअर रुटीनचा सर्वात पहिला आणि आवश्यक भाग म्हणजे त्वचा स्वच्छ करणे. चेहऱ्याची त्वचा योग्य पद्धतीने स्वच्छ न केल्यास डेड स्किनची समस्या निर्माण होऊ शकते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी त्वचेचे क्लीझिंग योग्य पद्धतीने होणे आवश्यक आहे. हल्ली बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्लींझर आणि फेसवॉश सहजरित्या मिळतात. पण महागडे आणि केमिकलयुक्त फेशवॉश वापरण्याऐवजी घरच्या घरी तयार केलेल फेसवॉश वापरल्यास त्वचेस अधिक लाभ मिळू शकतात. एक्सपर्टने सांगितलेली घरगुती फेसवॉश तयार करण्याची पद्धत जाणून घेऊया...
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
घरच्या घरी फेसवॉश कसे तयार करावे?| How To Make Face At Home
स्वयंपाकघरातील दोन गोष्टींपासून होममेड फेसवॉश तयार करू शकता. रणवीर अलाहबादियाच्या पॉडकास्टमध्ये डर्मेटोलॉजिस्ट डॉ. रश्मी शेट्टी यांनी स्वयंपाकघरातील दोन गोष्टींपासून फेसवॉश तयार करण्याची पद्धत सांगितली. डर्मेटोलॉजिस्टच्या माहितीनुसार बेसन आणि दह्यापासून घरच्या घरी फेसवॉश तयार करू शकतो. दह्यामध्ये बेसन मिक्स करा आणि चेहऱ्यावर लावा, त्वचा थोडी स्क्रब करा, त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा.
कच्चे दूधही फायदेशीर
चेहरा स्वच्छ करण्यासाठी कच्च्या दुधाचाही क्लींझर म्हणून वापर करू शकता. त्वचेवर जमा झालेली घाण आणि अतिरिक्त तेलाची समस्या कच्च्या दुधामुळे कमी होऊ शकते. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस कच्चे दूध चेहऱ्यावर लावू शकता. कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर दूध लावा आणि थोड्या वेळाने थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा.
(नक्की वाचा: Oiling Belly Button: झोपण्यापूर्वी नाभीवर लावा हे तेल, त्वचेसह पोटावर काय होतील परिणाम? न्युट्रिशनिस्टने सांगितले अद्भुत फायदे)
दही-काकडीचा रस
दह्यामध्ये काकडीचा रस मिक्स करा आणि हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. याद्वारे चेहऱ्याला पोषणतत्त्वांचा पुरवठा होईल, त्वचा हायड्रेट राहील.
टोमॅटोचा रस
फेसवॉशऐवजी टोमॅटोचा रस चेहऱ्यासाठी वापरावा. टोमॅटो पल्प तयार केल्यास चेहऱ्याची त्वचा हलक्या हाताने स्क्रब करावी. पाच मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने धुऊन घ्यावा. यामुळे डेड स्किनची समस्या दूर होऊ शकते आणि चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येईल.
(नक्की वाचा: Hair Care Tips: केस होतील घनदाट आणि लांबसडक, असा करा तुपाचा वापर)
मध आणि कोरफड
चेहरा स्वच्छ करण्यासाठी मध आणि अॅलोव्हेरो जेलचे मिश्रण देखील फायदेशीर ठरू शकते. दोन्ही गोष्टी समप्रमाणात घ्या आणि चेहऱ्यावर लावा. हलक्या हाताने चेहरा स्क्रब केल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्यावा. मध आणि कोरफडमुळे चेहऱ्याची त्वचा मऊ तसेच सुंदर होईल.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world