
Applying Oil Near Belly Button: धकाधकीचे जीवन, अयोग्य जीवनशैली आणि तणाव यासह अन्य कारणांमुळे पोटाशी संबंधित समस्या निर्माण होणे ही सामान्य बाब आहे. यामध्येही पोट स्वच्छ होत नसल्याने लोक प्रचंड त्रासलेले असतात. कालांतराने ही समस्या बद्धकोष्ठतेचे कारण बनते. बद्धकोष्ठतेमुळे पोटदुखी, शरीर जड होणे किंवा ओटीपोट दुखणे यासारख्या समस्या निर्माण होतातच पण चिडचिड होणे आणि आजारी असल्यासारखेही जाणवते. म्हणजेच पोट नीट स्वच्छ झाले नाही तर त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होऊ लागतो. तुम्ही देखील अशा समस्यांचा वारंवार सामना करत आहात का? तर या लेखामुळे तुम्हाला मोठी मदत मिळू शकते. पोटाच्या आजारांपासून मुक्तता मिळवण्यासाठी आपण एक अतिशय सोपा, नैसर्गिक आणि रामबाण उपाय जाणून घेणार आहोत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नेमका काय आहे हा उपाय?
प्रसिद्ध आयुर्वेदिक न्युट्रिशनिस्ट श्वेता शाह यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडीओ शेअर केलाय. व्हिडीओमध्ये शाह यांनी सांगितलंय की, रोज रात्री झोपण्यापूर्वी नाभीवर एक खास तेल लावल्यास पोटाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते. नाभीवर योग्य तेल लावल्यास पचनप्रक्रिया मजबूत होतेच शिवाय पोट स्वच्छ होण्यासही मदत मिळते. यासह संपूर्ण आरोग्यास असंख्य लाभ मिळू शकतात. जाणून घेऊया सविस्तर माहिती...
(नक्की वाचा: Ghee Cream Benefits: चेहऱ्यावर तूप लावण्याचे 8 चमत्कारी फायदे)
नाभीवर तेल लावल्यास कोणते लाभ मिळतील?
न्युट्रिशनिस्टच्या मते, नाभी आपल्या शरीराचा केंद्रबिंदू आहे, जेथून शेकडो नसा शरीराच्या वेगवेगळ्या भागांशी जोडलेल्या आहेत. म्हणून नाभीवर तेल लावल्यास याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. आयुर्वेदामध्ये हा उपाय गेल्या कित्येक वर्षांपासून केला जात आहे. पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी नाभीवर एरंडेल तेलाचे दोन ते तीन थेंब लावण्याचा सल्ला न्युट्रिशनिस्टने दिलाय. एरंडेल तेलामुळे पोटाला आराम मिळतो आणि पचनसंस्था देखील मजबूत होते. नाभीवर हे तेल लावल्यास दुसऱ्या दिवशी सकाळी शौचास त्रास होत नाही. यासह पोट फुगणे, बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांपासून मुक्तता मिळते.
(नक्की वाचा : Health Tips: मसाजसाठी कोणते तेल ठरेल फायदेशीर)
नाभीवर एरंडेल तेल लावण्याचे अन्य फायदे
- रात्री झोपण्यापूर्वी नाभीवर एरंडतेल तेल लावल्यास त्वचा हायड्रेट राहते, त्वचेवर तेज येण्यासही मदत मिळते.
- मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या पोटदुखीचा त्रास कमी होण्यासही मदत मिळते.
- एरंडेल तेलामुळे शरीरातील विषारी घटक देखील शरीराबाहेर फेकले जाण्यास मदत मिळते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world