Hair Care Tips : केसांची योग्य पद्धतीने काळजी घेतली नाही तर केस तुटणे, गळणे आणि केसांची वाढ थांबणे यासारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या महागड्या ट्रीटमेंट्स करतात. तर काही जण घरगुती-आयुर्वेदिक औषधोपचारांचाही पर्याय स्वीकारतात. पण शरीरामध्ये पोषणतत्त्वांची कमतरता असेल तर केस गळणे, केस तुटणे यासारख्या समस्या उद्भवतात. या समस्या टाळण्यासाठी आहारामध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. कोणकोणत्या पदार्थांचे सेवन केले तर केसगळतीची समस्या कमी होऊ शकते, जाणून घेऊया सविस्तर माहिती...
(नक्की वाचा: Hair Growth Tips: नाभीवर हे तेल लावून करा मसाज, केसांची होईल जबरदस्त वाढ)
केसगळती रोखण्यासाठी या पदार्थांचा डाएटमध्ये करा समावेश | Foods For Hair For Control
अंडे
अंड्यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, झिंक यासारख्या पोषकतत्त्वांचा समावेश आहे. तसेच अंड्यामध्ये बायोटीन देखील असते, ज्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत मिळते. अंड्यातील पोषणतत्त्वांमुळे केस मजबूतही होतात, ज्यामुळे केसगळतीची समस्या कमी होण्यास मदत मिळते.
बिया आणि सुकामेवा
केस मुळासकट मजबूत होण्यासाठी बिया आणि सुकामेव्यांचेही सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. बदाम, अक्रोड, भोपळ्याच्या बिया आणि अळशीच्या बियांचे सेवन केल्यास केसांना ओमेगा 3 फॅटी अॅसिड, लोह, सेलेनियम आणि कॉपरचा पुरवठा होईल. या बियांमध्ये झिंक देखील मोठ्या प्रमाणात असते, ज्यामुळे केसांच्या वाढीस उपयुक्त असणाऱ्या पेशींची उत्तमरित्या वाढ होते.
(नक्की वाचा: Hair Growth Tips: केस होतील लांबसडक, घनदाट आणि जाड! घरच्या घरी तयार करा हे 3 तेल)
'व्हिटॅमिन सी'युक्त पदार्थ
लिंबू, संत्री आणि आवळ्यामध्ये 'व्हिटॅमिन सी'चा मोठा साठा असतो. व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थांचा आहारात समावेश केल्यास शरीरामध्ये कोलेजनचे उत्पादन वाढते आणि स्कॅल्पच्या भागातील रक्ताभिसरणही सुधारते. व्हिटॅमिन सीमुळे केसांचे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण होते आणि केसांची वाढही होते.
(नक्की वाचा: Beauty Tips: केसांसाठी केमिकल ट्रिटमेंट करताय? नुकसान टाळण्यासाठी फॉलो करा तज्ज्ञांच्या टिप्स)
गाजर
व्हिटॅमिन ए देखील केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. गाजर खाल्ल्यास शरीराला व्हिटॅमिन एचा पुरवठा होण्यास मदत मिळते, ज्यामुळे केसांची चांगली वाढ होईल. शिवाय केसांमध्ये ओलावाही टिकून राहील आणि केसही मुळासकट मजबूत होतील. गाजराlतील पोषणतत्त्वांमुळे शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया देखील सुधारते.
सोयाबीन
सोयाबीनमध्ये व्हिटॅमिन बी 2, मॅग्नेशिअम, लोह आणि केल्शिअमचा साठा आहे. तसेच ओमेगा 3 फॅटी अॅसिडचे प्रमाण देखील जास्त असते. या पोषणतत्त्वांमुळे केसांचे नुकसान कमी प्रमाणात होते आणि केसांची चांगली वाढ होते, केस घनदाटही होण्यास मदत मिळेल.
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.