जाहिरात

Beauty Tips: चेहऱ्यावरील तीळ-चामखीळमुळे हैराण आहात? करा हे घरगुती उपाय, चेहऱ्यावरही येईल तेज

Beauty Tips: चेहऱ्यासह शरीरावरील तीळ आणि चामखीळमुळे हैराण झाले आहात का? या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी महागड्या ट्रीटमेंट करण्याची आवश्यकता नाही. घरगुती उपाय केल्यासही तीळ आणि चामखीळ हळूहळू गायब होतील.

Beauty Tips: चेहऱ्यावरील तीळ-चामखीळमुळे हैराण आहात? करा हे घरगुती उपाय, चेहऱ्यावरही येईल तेज
Beauty Tips: चेहऱ्यावरील तिळांची समस्या दूर करण्यासाठी घरगुती उपाय

Natural Treatment For Skin Moles: चेहऱ्यावर तीळ आणि चामखीळ येणे सामान्य बाब आहे. पण याचे प्रमाण वाढल्यास तीळ समस्येप्रमाणे वाटू लागतात. विशेषतः चेहरा आणि मानेवरील तीळ, चामखीळ डागांप्रमाणे दिसतात, यामुळे सौंदर्यामध्ये बाधा निर्माण होते.  या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी लोक महागड्या ट्रीटमेंट्सची मदत घेतात. पण कधीकधी हे उपाय घातकही ठरू शकतात. याऐवजी नैसर्गिक घरगुती उपाय परिणामकारक ठरू शकतील. महत्त्वाचे म्हणजे हे उपाय केल्यास चेहऱ्यावर तेजही येईल. जाणून घेऊया सविस्तर माहिती... 

नारळाचे तेल (Coconut Oil)

नारळाच्या तेलामध्ये अँटी-बॅक्टेरिअल आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्म आहेत. तीळ आणि चामखीळवर नियमित नारळाचे तेल लावून हलक्या हाताने मसाज केल्यास हळूहळू समस्येपासून सुटका होऊ शकते. ब्युटी एक्सपर्ट्सनुसार रात्री झोपण्यापूर्वी तीळ-चामखीळवर नारळाचे तेल लावून मसाज करून तेल रात्रभर तसेच राहू द्यावे. 

लसूण आणि कांद्याचा रस (Garlic and Onion Juice)

लसूण आणि कांद्याच्या रसामुळेही तिळांची समस्या दूर होऊ शकते. लसूणमधील सल्फर आणि कांद्यातील अँटी-सेप्टिक गुणधर्मामुळे तीळ-चामखीळांची समस्या कमी होऊ शकते. त्वचा संवेदनशील असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.   

बटाटा

बटाट्यातील एंझाइम्समुळे तीळ आणि चामखिळांची समस्या हळूहळू दूर होण्यास मदत मिळू शकते. बटाटा स्लाइसने तीळ असलेल्या ठिकाणावर स्क्रब करा. यामुळे त्वचेलाही फायदे मिळतील. 

Feet Massage Benefits: रात्री झोपण्यापूर्वी तळव्यांना नारळ तेल लावल्यास काय होईल? तज्ज्ञांनी सांगितली महत्त्वाची माहिती

(नक्की वाचा: Feet Massage Benefits: रात्री झोपण्यापूर्वी तळव्यांना नारळ तेल लावल्यास काय होईल? तज्ज्ञांनी सांगितली महत्त्वाची माहिती)

अळशीचे तेल आणि मध  

अळशीच्या बियांमुळे त्वचेचे झालेले नुकसान भरुन निघण्यास मदत मिळते. मधामध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचे गुणधर्म आहेत, ज्यामुळे चामखीळच्या समस्येतून सुटका मिळू शकते. अळशीचे तेल आणि मध एकत्रित करुन तीळ-चामखीळवर लावा. 20 मिनिटांवर त्वचा थंड पाण्याने स्वच्छ करा.

Benefits of Applying Ghee On Nabhi: रात्री झोपण्यापूर्वी नाभीवर तेल लावल्यास काय होईल?

(नक्की वाचा: Benefits of Applying Ghee On Nabhi: रात्री झोपण्यापूर्वी नाभीवर तेल लावल्यास काय होईल?)

हळद आणि मध (Turmeric and Honey)

त्वचेशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी प्राचीन काळापासून हळदीचा वापर केला जातो. मध आणि हळद एकत्र करुन त्वचेवर 15 मिनिटांसाठी लावून ठेवा. यामुळे त्वचेवर नॅचरल ग्लो देखील येईल.   

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com