
White Hair Home Remedies: पांढऱ्या केसांच्या समस्येमुळे तुम्ही देखील त्रस्त आहात का? आणि पांढऱ्या केसांवर उपाय म्हणून तुम्हालाही केमिकलयुक्त कलर किंवा ट्रीटमेंट करायची नाहीय का? तर मग ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. केस काळे करण्यासाठी बहुतांश लोक केमिकलयुक्त डायचा वापर करतात. यामुळे केसांना काळा रंग प्राप्त होतो पण केसांचे नुकसान देखील प्रचंड होते. काही प्रकरणांत केसांना डाय लावल्यानंतर केस अधिक प्रमाणात पांढरे होत असल्याचंही निदर्शनास आले आहे. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी केसांसाठी नैसर्गिक उपाय करुन पाहा. यामुळे अधिकचा खर्चही होणार नाही आणि केसांना पोषणतत्त्वांचा पुरवठा देखील होईल.
प्रत्येकाच्या किचनमध्ये असणाऱ्या तुरटीचा केस काळे करण्यासाठी वापर केला जाऊ शकतो. कसा? जाणून घेऊया योग्य पद्धत...
(नक्की वाचा: Hair Care Tips: केसांचे तुटणे होईल कमी, जाणून घ्या सोप्या टिप्स)
तुरटीमुळे केसांना होणारे फायदे (Fitkari/ Alum Benefits for Hair)
नॅचरल हेअर डाय तयार करण्यापूर्वी तुरटीमुळे केसांना कोणते लाभ मिळतील, हे जाणून घेऊया. तुरटीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत. ज्यामुळे स्कॅल्पची त्वचा स्वच्छ होण्यास, कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत मिळते. केसांचे तुटणे देखील कमी होऊ शकते.
नॅचरल हेअर डाय तयार करण्यासाठी तुरटीचा वापर कसा करावा? (How To Use Alum For White Hairs)
पांढरे केस काळे करण्यासाठी नैसर्गिक उपाय
सामग्री
- दोन ते तीन चमचे तुरटीची पावडर
- दोन चमचे सुकवलेला आवळा
- 10-15 कढीपत्त्याची पाने
- एक चमचा लिंबाचा रस
(नक्की वाचा : Long Hair Tips: केस कमरेपर्यंत लांबसडक आणि जाड होतील, या जादुई तेलात मिक्स करा 5 गोष्टी)
नॅचरल हेअर डाय कसे तयार करावे?
- एका पॅनमध्ये दोन ग्लास पाणी गरम करत ठेवा.
- सुकवलेला आवळा आणि कढीपत्ता पाण्यात उकळा.
- थोड्या वेळाने लिंबाचा रस आणि तुरटीची पावडर मिक्स करा.
- सर्व सामग्री व्यवस्थित उकळून पाण्याचा रंग गडद होऊ द्यावा.
- गॅस बंद करा आणि मिश्रण थंड होऊ द्यावे.
- एका भांड्यामध्ये पाणी गाळावे.
- केस धुताना या पाण्याचा वापर करावा.
- महिन्याभरात तीन ते चार वेळा हा उपाय करावा.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world