Tulsi Benefits: भारतीय घराघरांत आढळणारे तुळशीचे रोप केवळ एक वनस्पती नव्हे तर त्यामध्ये कित्येक औषधी गुणधर्मांचा साठा आहे. तुळशीच्या पानांचे सेवन केले तर असंख्य आरोग्यदायी लाभ मिळतील. विशेषतः त्वचेसाठी ही वनस्पती ठरते, असे म्हणतात. तुळशीतील गुणधर्मामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत मिळते. ज्यामुळे त्वचेवरील डाग-मुरुमांच्या समस्येपासून सुटका मिळले. भारत सरकारच्या आयुष मंत्रालय आणि राष्ट्रीय आयुर्वेद संस्थेच्या मते, तुळशीतील गुणधर्म त्वचेसाठी वरदान आहेत. तुळशीतील अँटी-बॅक्टेरिअल, अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म त्वचेला स्वच्छ, निरोगी आणि तेजस्वी ठेवण्यास मदत करतात.
तुळशीच्या पानांचे पाणी पिण्याचे फायदे
तज्ज्ञांच्या मते, तुळशीचे पाणी प्यायल्याने रक्त शुद्ध होते, त्यामुळे मुरुमांसह डागांचीही समस्या दूर होण्यास मदत मिळते. रोज तुळशीच्या पानांचे सेवन केल्यास त्वचेतील आतून होणारा संसर्ग मुळापासून कमी होईल आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येईल. हा घरगुती उपाय महागड्या क्रीम्स आणि उपचारांसाठी प्रभावी पर्याय ठरू शकतो, महत्त्वाचे म्हणजे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. राष्ट्रीय आयुर्वेद संस्था देखील तुळशीच्या औषधी गुणधर्मांची बरीच माहिती देण्यात आलीय.
तुळशीच्या पानांचा वापर कसा करावा?
तज्ज्ञांच्या मते, त्वचेसाठी तुळशीचे काही सोपे आणि प्रभावी उपाय आहेत. फेस पॅक म्हणून 8–10 ताजी तुळशीची पाने वाटून त्यात मुलतानी माती किंवा मध मिक्स करा. हा लेप चेहऱ्यावर 15–20 मिनिटे लावा आणि त्यानंतर चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा. यामुळे मुरुम, चेहऱ्यावरील डाग, तेलकट त्वचेची समस्या दूर होण्यास मदत मिळेल. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय करू शकता.
(नक्की वाचा: Yoga 10 Golden Rule: योगचे हे 10 सुवर्ण नियम माहिती आहेत का? तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलेल)
तुळशीचे पाणीतुळशीचे पाणी पिणे त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे. यासाठी रात्री 5–7 तुळशीची पाने स्वच्छ पाण्यात भिजत ठेवा. सकाळी उपाशीपोटी हे पाणी प्यायल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातील, रक्त शुद्ध होईल आणि त्वचेवर नैसर्गिक चमक येईल. मुरुमांच्या समस्येसाठी हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय मानला जातो.
(नक्की वाचा: Jeera Watar Benefits: जिऱ्याचे पाणी कसे आणि कधी प्यावे? शरीरात कोणते बदल होतील? तज्ज्ञांनी दिली मोठी माहिती)
तुळशीचा चहा
तुळशीचा चहा पिण्याचे असंख्य आरोग्यदायी फायदे आहेत. तुळशीचा चहा तयार करण्यासाठी 4–5 तुळशीची पाने पाण्यात उकळून चहा तयार करा. त्यामध्ये लिंबू किंवा मध मिक्स करावे. यामुळे ताणतणाव कमी होईल आणि चेहऱ्यावरील चमक वाढण्यास मदत मिळेल. तणावामुळेही चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात. तसेच सकाळी 2–3 ताजी तुळशीची पाने चावून खाल्ल्याने ताजेतवाने वाटते आणि त्वचेतील संसर्ग कमी होतो.
तुळशीचा योग्य पद्धतीने योग्य प्रमाणात नियमित वापर केल्यास त्वचा निरोगी राहण्यास मदत मिळेल शिवाय शरीराची रोगप्रतिकारकशक्तीही मजबूत होईल. हा स्वस्त आणि प्रभावी उपाय आहे.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
(ही बातमी एनडीटीव्ही टीमने संपादित केलेली नाही. ही बातमी सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. )