Yoga 10 Golden Rule: भारतीय संस्कृतीत योगचा इतिहास सुमारे 5000 वर्षे जुना आहे. योग हा शब्द संस्कृतमधील युज शब्दापासून तयार झालाय, या शब्दाचा अर्थ जोडणे किंवा एकत्र येणे असा होतो. ऋग्वेदासारख्या प्राचीन ग्रंथांमध्येही योगचा उल्लेख आढळतो. योग फक्त शरीर सुदृढ ठेवण्यासाठी नव्हे तर मनःशांती, एकाग्रता आणि स्वतःला ओळखण्याचा एक मार्ग आहे. पण योग्य नियमांशिवाय योग केल्यास त्याचे पूर्ण लाभ शरीराला मिळणार नाहीत. चला जाणून घेऊया योगचे 10 सोपे नियम, ज्याद्वारे तुमचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळेल.
योगचे 10 नियम | Yoga 10 Golden Rule
1. योगचा पहिला नियम
योग सुरू करण्यापूर्वी शरीर आणि मन स्वच्छता करणं अतिशय आवश्यक आहे. केवळ शरीरच नव्हे तर आजूबाजूचे वातावरणही स्वच्छ असावे. स्वच्छतेमुळे मन शांत राहते आणि लक्ष केंद्रित करणे सोपे जाते.
2. योगचा दुसरा नियम
योगासने रिकाम्या पोटी करावी. जेवणानंतर लगेच योग केल्यास पोटावर ताण येतो आणि आसनांचा योग्य फायदा मिळत नाही. अशक्तपणा जाणवत असल्यास कोमट पाण्यात थोडे मध मिक्स करून पिऊ शकता.
3. योगचा तिसरा नियम
मूत्राशय आणि आतड्या रिकाम्या असाव्या. यामुळे शरीराला आराम मिळतो आणि योग करताना अस्वस्थपणा जाणवत नाही.
4. योगचा चौथा नियम
योगची सुरुवात प्रार्थनेनं करावी. यामुळे मनात सकारात्मक विचार निर्माण होतात आणि मानसिकदृष्ट्या योगसाठी तयार होणे सोप जाते.
5. योगचा पाचवा नियम
योगासने हळूहळू आणि सतर्कतेनं करावी. घाईघाईत योगासनांचा सराव करू नये. संथपणे आसने केल्यास स्नायू आणि सांध्यांना इजा होण्याचा धोका कमी होतो तसेच शारीरिक लाभ अधिक मिळतात.
6. योगचा सहावा नियम
स्ट्रेचिंग आणि वॉर्म-अप करणे आवश्यक आहे. योगसने सुरू करण्यापूर्वी हलके स्ट्रेचिंग केल्यास स्नायू सैल होतात आणि दुखापतीची शक्यता कमी होते.
(नक्की वाचा:Jeera Watar Benefits: जिऱ्याचे पाणी कसे आणि कधी प्यावे? शरीरात कोणते बदल होतील? तज्ज्ञांनी दिली मोठी माहिती)
7. योगचा सातवा नियम
योगासने योग्य तंत्र आणि योग्य मुद्रेत करावी. नवीन आसन प्रथमच करताना ते नीट शिकणे महत्त्वाचे आहे. चुकीच्या पद्धतीने केलेल्या आसनांमुळे शरीराला नुकसान होऊ शकते.
8. योगचा आठवा नियम
योगसाठी योग्य कपडे घालावे. सैल आणि आरामदायी कपडे परिधान करणे आवश्यक आहे, जेणेकरून आसने करताना अडचणी निर्माण होणार नाहीत आणि रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत सुरू राहील.
9. योगचा नववा नियम
श्वासावर लक्ष केंद्रित करणे फार महत्त्वाचे आहे. योगामध्ये श्वसनाचे नियंत्रण आवश्यक असते. योग्य प्रकारे श्वास घेतल्यास शरीरातील ऊर्जा संतुलित राहते आणि मानसिक शांती मिळते.
(नक्की वाचा: Health News: नाश्त्यात अंडे खावे, अंडे खाल्ल्याने वजन वाढते की घटते? डॉक्टरांनी 9 प्रश्नांची दिली उत्तरं)
10. योगचा दहावा नियम
योगाभ्यासानंतर विश्रांती घेणे आवश्यक आहे. सर्व आसने पूर्ण झाल्यानंतर शरीर आणि मनाला आराम देणे गरजेचे आहे. यामुळे शरीरातील ताण कमी होतो आणि योगासनांचा पूर्ण लाभ मिळतो.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
(ही बातमी एनडीटीव्ही टीमने संपादित केलेली नाही. ही बातमी सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. )Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

