White Hair Remedy: धकाधकीच्या जीवनात हल्ली बहुतांश लोकांचे कमी वयातच केस पांढरे (White Hair Problem) होऊ लागले आहेत. पूर्वी 40-50 वयामध्ये लोकांचे केस पांढरे होत असत, आता 20-25 वर्षांचे तरुणमंडळी पांढऱ्या केसांच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. यामागील प्रमुख कारणे म्हणजे अयोग्य जीवनशैली, तणाव, प्रदूषण आणि शरीरातील पोषणतत्त्वांची कमतरता. तुम्ही देखील पांढऱ्या केसांच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर डॉ. सलीम जैदी यांनी केसांसाठी सांगितलेला नैसर्गिक उपाय जाणून घेऊया...
पांढरे कसे काळे कसे करावे? | Pandhare Kes Kale Karanyasathi Upay
डॉक्टर जैदी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पांढऱ्या केसांसाठी नैसर्गिक उपाय सांगितलाय. नारळ तेलामध्ये काही ठराविक गोष्टी मिक्स करुन केसांना लावल्यास पांढऱ्या केसांची समस्या मुळासकट दूर होऊ शकते. विशेष म्हणजे हे उपाय केल्यास केसांची वाढ होईल आणि केस घनदाट देखील होतील.
केसांसाठी तेल कसे तयार करावे?
- लोखंडाच्या कढईमध्ये नारळाचे तेल गॅसच्या मध्यम आचेवर गरम करा.
- तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये दीड कप कढीपत्त्याची पाने, चार चमचे मेथीचे दाणे पाच ते 10 मिनिटांसाठी गरम करावे.
- कढीपत्ता, मेथीचे दाणे शिजल्यानंतर त्यामध्ये पाच चमचे आवळ्याची पावडर मिक्स करा आणि दोन मिनिटे मिश्रण शिजू द्यावे.
- तेलाचा रंग काळा झाल्यानंतर गॅस बंद करावा.
- तेल थंड झाल्यानंतर गाळून काचेच्या बाटलीमध्ये भरावे.
(नक्की वाचा: White Hair Home Remedies: डायशिवायच पांढरे केस होतील काळेभोर, किचनमधील या गोष्टींपासून तयार करा नॅचरल हेअर कलर)
तेलाचा केसांसाठी कसा करावा वापर?
आठवड्यातून दोनदा रात्री झोपण्यापूर्वी केसांना तेल लावा आणि हलक्या हाताने मसाज करण्याचा सल्ला डॉक्टर जैदी यांनी दिलाय. सौम्य शॅम्पूने केस स्वच्छ धुवावे.
(नक्की वाचा: White Hair Problem: कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे केस पांढरे होतात? करा है नैसर्गिक उपाय)
केसांना कोणते फायदे मिळतील?
- डॉक्टर जैदींनी दिलेल्या माहितीनुसार, नारळाच्या तेलामुळे केसांना मुळासकट पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो आणि यातील पोषणतत्त्व केसांचे नुकसान होण्यापासून रोखण्याचे काम करतात.
- कढीपत्त्यातील बीटा कॅरेटीन आणि प्रोटीनमुळे केसांचा नैसर्गिक रंग टिकून राहण्यास मदत मिळते.
- मेथीच्या दाण्यातील फॉलिक अॅसिड, व्हिटॅमिन A, K, C आणि खनिजांमुळे केसांची चांगली वाढ होते.
- आवळ्यातील व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्समुळे केस काळे आणि मजबूत होण्यास मदत मिळते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )