
White Hair Problem| Pandharya Kesancha Problem: वाढत्या वयोमानामुळे केस पांढरे होतात, असे अनेकांचा गैरसमज आहे. पण यामागील खरं कारण तुम्हाला माहितीय का? हल्ली लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्व वयोगटातील व्यक्ती केस पांढरे होण्याच्या समस्येचा सामना करतात. शाळकरी विद्यार्थी देखील पांढऱ्या केसांच्या समस्येने ग्रस्त आहेत. शरीरातील पोषणतत्त्वांच्या कमतरतेमुळे केस पांढरे होऊ लागतात. डाएटमध्ये पोषक पदार्थांचा समावेश केला तर केसांशी संबंधित समस्या उद्भवणार नाहीत आणि केस काळेभोर राहण्यासही मदत मिळेल.

कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे केस पांढरे होतात? | Kes Pandhare Honyamagil Karne
केस पांढरे होण्यामागील मोठे कारण म्हणजे व्हिटॅमिन B12ची कमतरता. लाल रक्तपेशीच्या निर्मितीसाठी आणि मज्जासंस्थेसाठी व्हिटॅमिन बी12 अतिशय आवश्यक असते. शरीरामध्ये व्हिटॅमिन बी12ची कमतरता निर्माण झाल्यास मेलेनिनचे उत्पादन कमी होऊ लागते. यामुळे केस पांढरे होऊ लागतात.

व्हिटॅमिन B12ची कमतरता कशी दूर करावी? (Vitamin B12 Deficiency)
शरीरामध्ये व्हिटॅमिन B12ची कमतरता निर्माण झाल्यास डॉक्टरांशी संपर्क साधून आवश्यकत रक्त तपासणी करून घ्यावी. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार सुरू करावे. यासह डाएटमध्ये अंडे, दूध, मांस, मासे, मशरुम यासारख्या व्हिटॅमिन B12 युक्त पदार्थांचा समावेश करावा.
(नक्की वाचा: White Hair Home Remedies: डायशिवायच पांढरे केस होतील काळेभोर, किचनमधील या गोष्टींपासून तयार करा नॅचरल हेअर कलर)

पांढऱ्या केसांसाठी नैसर्गिक उपाय (White Hair Causes)
पांढऱ्या केसांच्या समस्येवर उपाय म्हणून काही लोक डायचा वापर करतात, यामुळे केस निर्जीव आणि कोरडे होऊ लागतात. याऐवजी नैसर्गिक मेंदी किंवा हर्बल पेस्टचा वापरू शकता. मेंदीमुळे केसांना नैसर्गिक रंग मिळेल. योग्यरित्या काळजी घेतली तरी कोरड्या केसांची समस्या उद्भवणार नाही.
(नक्की वाचा: Black Hair Remedy: 5 रुपयांत पांढरे केस झटपट करा काळे)

पौष्टिक आहार आणि योग्य लाइफस्टाइल (White Hair problem)
केसांच्या आरोग्यासाठी केवळ व्हिटॅमिन B12च नव्हे तर पौष्टिक डाएट, पुरेशा प्रमाणात पाणी आणि तणावमुक्त जीवनशैली असणंही गरजेचे आहे. नियमित स्वरुपात हिरव्या भाज्या, फळे आणि प्रोटीनयुक्त आहाराचे सेवन केल्यास केस मजबूत होण्यास मदत मिळू शकते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world