Soap Tips : साबण हा आपल्या दैनंदिन जीवनातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. तो केवळ शरीर स्वच्छ ठेवण्यासाठीच नव्हे, तर त्वचेच्या आरोग्यासाठीही महत्त्वाचा आहे. बाजारात विविध प्रकारचे साबण उपलब्ध आहेत. मात्र त्यातून आपल्या त्वचेसाठी फायदेशीर ठरेल असा साबण निवडणे देखील महत्त्वाचे असते. मॉइश्चरायझिंग, अँटीबॅक्टेरियल, सुगंधी, आयुर्वेदिक, आणि औषधी साबण असे विविध प्रकारचे साबदण बाजारात उपलब्ध आहेत. मात्र यातून कोणता साबण निवडायचा हे जाणून घेऊया.
साबण त्वचेवर थेट परिणाम करतो, त्यामुळे चुकीचा साबण वापरल्याने त्वचा कोरडी, खरखरीत, किंवा खराब होऊ शकते. मॉइश्चरायझिंग किंवा औषधी साबण त्वचेला पोषण देतात आणि त्वचेचे विकार टाळतात. सुगंधी साबण त्वचेला ताजेपणा आणि सुखद वास देतात.
(नक्की वाचा- Disadvantage of Eating litchi: या लोकांनी चुकूनही लिची फळ खाऊ नये, भयंकर परिणाम होतील)
त्वेचनुसार साबण कसा निवडाल?
ऑईली त्वचेवर तेलकटपणा, मुरुम (पिंपल्स), आणि ब्लॅकहेड्स येण्याची शक्यता असते. त्यामुळे अँटीबॅक्टेरियल साबण फायदेशीर ठरु शकतो. जो तेलकटपणा आणि बॅक्टेरिया कमी करतो. मुलतानी माती किंवा पेपरमिंटयुक्त साबण तेल नियंत्रित करतात आणि थंडावा देतात. तर कडुलिंब (Neem) किंवा टी ट्री ऑइल असलेले साबण मुरुमांवर प्रभावी ठरतात.
कोरडी त्वचा खरखरीत, ताठरलेली, आणि कधीकधी खाज सुटते. त्यामुळे मॉइश्चरायझिंग साबण वापरणे फायदेशीर ठरुन शकते. ग्लिसरीन, शिया बटर, कोको बटर, किंवा मध युक्त साबण त्वचेला मऊ ठेवतात. कोरफड (Aloe Vera) किंवा बादाम तेल असलेले साबण त्वचेला पोषण देतात. तर हर्बल साबण जसे चंदन किंवा गुलाब युक्त साबण त्वचेला थंडावा देतात.
(नक्की वाचा - शक्ती वाढवण्यासाठी एक प्रभावी आयुर्वेदिक उपाय, पुरुष आणि महिलांसाठी फायदेशीर)
सेन्सिटिव्ह त्वचेवर लवकर रॅशेस, जळजळ, किंवा खाज सुटण्याची शक्यता असते. अशावेळी सौम्य साबण वापरावा. लव्हेंडर किंवा कॅमोमाइल असलेले साबण त्वचेला शांत करतात. आयुर्वेदिक साबण जसे कडुलिंब, हळद, किंवा चंदन युक्त साबण त्वचेला हानी पोहोचवत नाहीत.
हवामानानुसार साबण कसा निवडाल?
उन्हाळ्यात घाम आणि धूळ जमा होते, त्यामुळे अँटीबॅक्टेरियल किंवा थंड गुणधर्माचे साबण वापरा. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते, त्यामुळे मॉइश्चरायझिंग साबण वापरा. तर पावसाळ्यात ओलसर वातावरणामुळे बॅक्टेरिया आणि बुरशी वाढण्याची शक्यता असते. अशावेळी कडुलिंब, हळद, किंवा टी ट्री ऑइल युक्त साबण वापरा.
(नक्की वाचा- मधुमेहासह या आजारांसाठी औषधीय हिरवी पानं; सकाळी रिकाम्या पोटी खा आणि पाहा कमाल)
साबण वापरण्याच्या टिप्स
साबणाचा जास्त वापर टाळावा. दिवसातून 1-2 वेळा साबण वापरणे पुरेसे आहे. जास्त वापराने त्वचेची नैसर्गिक तेलं निघून जाऊ शकते. त्वेचेवर लागलेला साबण पूर्णपणे धुऊन टाकावा, अन्यथा त्वचेवर राहिलेला साबण त्रास देऊ शकतो. वैयक्तिक स्वच्छतेसाठी साबण इतरांसोबत शेअर करू नये.