जाहिरात

शक्ती वाढवण्यासाठी एक प्रभावी आयुर्वेदिक उपाय, पुरुष आणि महिलांसाठी फायदेशीर

विद्धाराला 'वृद्धदारु' असे म्हटले जाते. कारण ती वृद्धापकाळात येणारी शारीरिक कमजोरी आणि थकवा दूर करण्यास मदत करते.

शक्ती वाढवण्यासाठी एक प्रभावी आयुर्वेदिक उपाय, पुरुष आणि महिलांसाठी फायदेशीर

वाढत्या वयामुळे येणारी शारीरिक कमजोरी, थकवा आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी विद्धारा, ज्याला वृद्धदारु असेही म्हणतात. ही औषधी वनस्पती अत्यंत लाभदायक ठरू शकते. आयुर्वेदात याला एक महत्त्वाचे स्थान आहे. विद्धारा ही एक वेलवर्गीय वनस्पती असून तिच्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. ते नियमित सेवन केल्यास वृद्धापकाळात अनेक फायदे मिळतात. विद्धाराची फुले, पाने, मुळे आणि बिया विविध रोगांच्या उपचारात वापरल्या जातात.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी विद्धाराचे फायदे
विद्धाराला 'वृद्धदारु' असे म्हटले जाते. कारण ती वृद्धापकाळात येणारी शारीरिक कमजोरी आणि थकवा दूर करण्यास मदत करते. याच्या नियमित सेवनाने नसा आणि स्नायूंना शक्ती मिळते. ज्यामुळे वृद्ध व्यक्तींना नवचैतन्य जाणवते. विद्धाराचा सर्वात जास्त उपयोग लैंगिक कमजोरी दूर करण्यासाठी केला जातो. याच्या नियमित सेवनाने शुक्र धातूला पोषण मिळते. लैंगिक शक्ती वाढते. ही वनस्पती पुरुष आणि महिला दोघांमधील लैंगिक कमजोरी दूर करण्यासाठी उपयुक्त आहे.

ट्रेंडिंग बातमी - Panchkula Death Mystery: काचेवर टॉवेल, गाडीत 7 मृतदेह.. जीव सोडण्याआधी हादरवणारं कारण सांगितलं!

संधिवात आणि सांधेदुखीमध्ये आराम
विद्धाराच्या नियमित वापरामुळे संधिवात आणि सांधेदुखीमध्येही आराम मिळतो. संधिवात आणि सांधेदुखीमध्ये विद्धाराच्या पानांचा लेप बनवून लावल्यास खूप आराम मिळतो. विद्धाराच्या मुळांच्या चूर्णाचा वापर दूध किंवा पाण्यासोबत दिवसातून एक ते दोन वेळा गरजेनुसार करता येतो. याचा काढा बनवूनही सेवन करता येते.

ट्रेंडिंग बातमी - Cricket News: 427 धावांचा पाठलाग करताना फक्त 2 धावांवर संपूर्ण टीम ऑल आऊट, या मॅचची सगळीकडेच चर्चा

इतर आरोग्यदायी फायदे
विद्धाराचे सेवन पचनसंस्था मजबूत बनवते. विद्धाराची मूळ आणि पानांमध्ये वेदना कमी करणारे घटक असतात. ते शरीरातील जखमा बऱ्या करण्यास मदत करतात. या वनस्पतींच्या पानांचा लेप बनवून जखमेवर लावल्यास लवकर आराम मिळतो. शिवाय त्याच्या वापरामुळे चेहऱ्यावरील मुरुम आणि डाग कमी होतात. चेहरा चमकदार होतो. विद्धाराच्या पानांचे नियमित सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती (immunity) वाढते. व्यक्तीला नवीन ऊर्जा व उत्साह जाणवतो. विद्धाराचे अधिक प्रमाणात सेवन करू नये. सेवन करण्यापूर्वी आयुर्वेदिक चिकित्सकाचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com