Belkin UltraCharge Pro Laptop Power Bank 25K Price : Belkin ने नवीन पॉवर बँक लॉन्च केलं आहे. जे विशेषत: लॅपटॉप चार्जिंगसाठी बनवण्यात आलं आहे.कंपनीचं हे नवं चार्जर मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आलं आहे. या नावाने (UltraCharge Pro Laptop Power Bank 25K) हे चार्जर बाजारात उपलब्ध करण्यात आलं आहे. या पॉवर बँक चार्जरमध्ये 25000mAh बॅटरी देण्यात आली आहे. पॉवर बँकमध्ये बिल्ट-इन यूएसबी-सी केबलही आहे. यामध्ये 140W पर्यंत हाय व्हिल्टेज आऊटपूट देण्यात आलं आहे. UltraCharge Pro पॉवर बँकमध्ये USB-C पोर्टवर 140W आऊटपूट मिळतं. USB-A पोर्टवर ही 18W आऊटपूट देऊ शकतं. हे मल्टिपल डिव्हायसेसलाही चार्ज करू शकतं. याची किंमत आणि फिचर्सबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती. (Belkin UltraCharge Pro Laptop Power Bank 25K Features)
Belkin UltraCharge Pro पॉवर बँकची किंमत 529 युआन (जवळपास 7500 रुपये) आहे. याला JD.com वरून खरेदी केलं जाऊ शकतं.कंपनीने पॉवर बँकला ब्लॅक, व्हाईट आणि सैंड कलर्समध्ये लॉन्च केलं आहे. हे कंपनीचं लेटेस्ट पॉवर बँक (Belkin UltraCharge Pro 25K ) आहे. यामध्ये 25000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.पॉवर बँकमध्ये बिल्ट-इन LED डिस्प्लेही देण्यात आला आहे.डिस्प्लेमध्ये रिअर टाईम बॅटरी आणि चार्जिंग स्टेटस दिसतं.
नक्की वाचा >> Trending News : ओमान किनारपट्टीजवळ जहाजावर हल्ला,24 भारतीय खलाशी अडकले, समुद्रातील Video आला समोर
तुम्हाला वेगळी चार्जिंग केबल सोबत नेण्याची आवश्यकता नाही
पॉवर बँकजवळच यूएसबी-सी केबल अटॅच असते. तुम्हाला वेगळी चार्जिंग केबल सोबत नेण्याची आवश्यकता नाही. याशिवाय चार्जिंग डिव्हाईसमध्ये यूएसबी-सी पोर्ट आणि यूएसबी-ए पोर्ट वेगळ्या पद्धतीने उपलब्ध आहे. म्हणजेच तीन आऊटपूट तुम्हाला यामध्ये मिळतात.UltraCharge Pro पॉवर बँकमध्ये USB-C पोर्टवर 140W आऊटपूट मिळतं. USB-A पोर्टवर हे 18W चं आऊटपूट देऊ शकतं.
हे मल्टिपल डिव्हायसेसलाही चार्ज करू शकतं. चार्जिंगसाठी हे 90W यूएसबी-सी इनपूटसोबत येतं. कंपनीने दावा केला आहे की, हे 14 इंच MacBook Pro ला 28 मिनिटांत 50 टक्के चार्ज करू शकतं.पॉवर बँकमध्ये अनेक प्रकारचे सेफ्टी प्रोटोकॉलही आहेत.यामध्ये ड्युअल स्मार्ट प्रोटेक्शन चिप लागते. हे रिअल टाईममध्ये टेम्परेचर मॉनिटर करू शकतं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world