Benefits of eating pomegranate : दररोज एक डाळिंब खाल्ल्याने काय होईल? महागड्या क्रीमही करू शकणार नाही अशी जादू

अमेरिकेतील प्रसिद्ध आरोग्य तज्ज्ञ डॉ. एरिक बर्ग यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये डॉक्टर दररोज एक डाळिंब खाण्याचा सल्ला देतात.

जाहिरात
Read Time: 2 mins

Can pomegranate improve skin: हेल्दी, डागविरहित आणि चमकदार त्वचा सर्वांना हवीहवीशी वाटते. यासाठी कित्येक लोक दररोज हजारो रुपयांचे प्रोडक्ट वापरतात. मात्र अनेकदा या प्रोडक्टमधील केमिकलचा उलट परिणाम दिसतो. अशात तुम्हाला अशी एक पद्धत दाखविणार आहोत, ज्यातून कोणत्याही साइडइफेक्टशिवाय तुमची त्वचा तजेलदार दिसू शकते. 

अमेरिकेतील प्रसिद्ध आरोग्य तज्ज्ञ डॉ. एरिक बर्ग यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये डॉक्टर दररोज एक डाळिंब खाण्याचा सल्ला देतात. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर जबरदस्त परिणाम दिसून येईल. (Benefits of eating pomegranate) 

डाळिंबाने त्वचेवर काय परिणाम होतो? 

डॉ. बर्ग म्हणाले, डाळिंबात 'Urolithin A' नावाचं मोलिक्यूल आढळून येतं. या मोलिक्यूलमुळे शरीरातील पेशींच्या मायटोकॉन्ड्रिया दुरुस्त आणि रिसायकल करण्यात मदत मिळते. मायटोकॉन्ड्रियाला शरीराचं पॉवरहाऊस देखील म्हटले जातंय. हे उर्जेचा स्रोत आहे. मायटोकॉन्ड्रियाल व्यवस्थित काम करतं तेव्हा वृद्ध होण्याची प्रक्रिया मंदावते. 

Advertisement

नक्की वाचा - प्रायव्हेट पार्टवरील केस काढायचे की नाही? 99% लोकांना सत्य माहीत नाही, डॉक्‍टर म्हणाल्या...

त्वचेवर होतो परिणाम...

डॉक्टरांनी सांगितलं की, तुम्ही दररोज एक डाळिंब खाल्लं तर महिनाभरात चेहऱ्यावर ग्लो पाहायला मिळेल. त्वचा आधीपेक्षा जास्त उजळ, स्वच्छ आणि तरुण दिसू लागले, याशिवाय त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात. याचा अर्थ डाळिंब त्वचेवर नैसर्गिकपणे अँटी-एजिंगचं काम करतं. 

हृदयासाठी फायदेशीर...

डाळिंबामुळे धमन्यांमधील अडथळा कमी होण्यास मदत होते. डाळिंब कोलेस्टेरॉल नियंत्रित करते आणि हृदयरोग्यांसाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे हृदयविकाराचा धोका देखील कमी होतो.

Advertisement

मेंदूसाठीही फायदेशीर...

डाळिंब खाल्ल्याने मेंदू तल्लख होतो. यामुळे एकाग्रता वाढते आणि दिवसभर तुम्हाला उत्साही वाटतं.

डाळिंब कसं खालं?

तुम्ही डाळिंब असचं खाऊ शकता किंवा याचा रस घेऊ शकता. मात्र ज्यूस फ्रेश असायला हवा आणि यात साखर घालू नका. दररोज एक डाळिंब किंवा एक ग्लास डाळिंबाचा ज्यूस घेणं पुरेसं आहे. 

(Disclaimer: प्रिय वाचक, बातमी वाचल्याबद्दल धन्यवाद. वरील लेखांसंदर्भातील अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. )