जाहिरात

प्रायव्हेट पार्टवरील केस काढायचे की नाही? 99% लोकांना सत्य माहीत नाही, डॉक्‍टर म्हणाल्या...

Guptangache kes kadhayche ki nahi : खासगी भागावरील केस काढणं योग्य आहे की नाही. सर्वसामान्यांचा गोंधळ होऊ शकतो. तज्ज्ञांकडून जाणून घेऊया..

प्रायव्हेट पार्टवरील केस काढायचे की नाही? 99% लोकांना सत्य माहीत नाही, डॉक्‍टर म्हणाल्या...
Guptang che kes kase kadhal :  :गुप्तांगाचे केस कसे काढाला

Guptang che kes kase kadhal : सद्यस्थितीत वैयक्तिक स्वच्छतेबाबत लोक अधिक जागरुक झाले आहेत. जेव्हा प्रायव्हेट पार्टच्या स्वच्छतेची बाब समोर येते, त्यामुळे स्वच्छतेबाबत अनेक चुकीची माहिती पसरवली जाते. प्यूबिक हेअर (Pubic Hair kadhayche ki nahi) म्हणजेच गुप्तांगांवरील केस अस्वच्छ असतात आणि हे केस काढायला हवेत, असं म्हटलं जातं. मात्र हे खरं आहे का? खासगी भागावरील केस शरीरासाठी हानिकारक (Pubic Hair Kase kadhal) आहेत की फायदेशीर? हे केस काढल्याने इन्फेक्शन कमी होतं की वाढतं? जाणून घेऊया.

प्रायव्हेट पार्टवरील केस काढायला हवेत की नको (Removing Hair Of Personal Parts Is Good Or Not)

खासगी भागावरील केस काढायला हवेत की नाही, डॉक्टर काय सांगतात? 

सोशल मीडियावर मोठमोठ्या कंपन्या तुम्हाला खासगी भागावरील केस अस्वच्छ असतात आणि हे काढायला हवेत असं सांगतात. अशात खरंच प्यूबिक हेअर काढणं आवश्यक असतं का, असा प्रश्न उभा राहतो. यामुळे इन्फेक्शन वाढतं की कमी होतं. यासर्वांची उत्तर प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. तन्वी राज यांनी दिली आहेत. 

खासगी भागांवर केस का असतात l Why do we have hair on our private parts?

डॉ. तन्वी सांगतात, शरीरावरील कोणतीही गोष्टी विनाकारण नसते. शरीरावर प्यूबिक हेअरचा खास हेतू आहे. हे केस आपले फर्स्ट लाइन ऑफ डिफेन्स असतात. म्हणजे प्राथमिक सुरक्षिततेसाठीचं दार. हे दार घाण, बॅक्टेरिया आणि धूळ आत जाण्यापासून रोखते. ज्यामुळे योनी आणि अन्य संवेदनशील भागांवर संसर्ग होत नाही. या केसांमुळे खासगी भागाचं तापमान संतुलित राहतं आणि स्किन फ्रिक्शनपासून बचाव होतो. तुम्ही घट्ट कपडे घालता किंवा शरीरसंबंधादरम्यान होणाऱ्या घर्षणावेळी केसांमुळे त्वचेचं रक्षण होतं. 

Latest and Breaking News on NDTV

गुप्तांगावरील केस काढण्याचे नुकसान| Disadvantages of cutting the hair below

डॉ. तन्वी स्पष्टपणे सांगतात की, प्यूबिक हेअर पूर्णपणे काढू नये. अनेक लोक रेजर, हेअर रिमूव्हल क्रीम्स किंवा केमिकल असलेल्या लोशनचा वापर करतात. ज्यामुळे त्वचेला धोका पोहोचू शकतो. यामुळे अॅलर्जी, व्रण, स्किन इन्फेक्शन आणि योनीमार्गातील संसर्गाचा धोका वाढतो. 
डॉक्टर तन्वी सांगतात की, गरज पडल्यास केस हलके ट्रिम करता येऊ शकतात. यासाठी तुम्ही सेफ्टी क्लिपर किंवा फेदर ट्रिमर वापरू शकता. परंतु केमिकल्स आणि रेझरने केस पूर्णपणे काढून टाकणे टाळा.

पर्सनल हायजीन किती आवश्यक? | How important is personal hygiene?

बरेच लोक असं मानतात की, केस असतील तर ते घाणेरडं दिसतं. परंतु खरं म्हणजे, केस स्वच्छतेचा एक भाग आहेत. स्वच्छता महत्वाची आहे, परंतु केस काढून टाकणे हा उपाय नाही. डॉ. तन्वी सांगतात की, ज्याप्रमाणे तुम्ही दररोज आंघोळ करता आणि शरीराचा इतर भाग स्वच्छ करता, त्याचप्रमाणे गुप्तांगाची स्वच्छता देखील महत्त्वाची आहे. पण याचा अर्थ असा नाही की, तुम्हाला काहीतरी आत घालून ते स्वच्छ करावं लागेल. योनी हा एक स्वयं-स्वच्छ अवयव आहे आणि तो आतून स्वच्छ करण्याची गरज नाही. तुम्ही सौम्य साबणाचा वापर करू शकता. मात्र डेटॉल, पावडर, डियोड्रंट आणि अन्य केमिकल्सचा वापर करू नये, हे नुकसानदायक असू शकतात.

सोशल मीडियावरील सत्य | Truth of social media

आजकाल, सोशल मीडियावर सर्वत्र जाहिराती आहेत. ज्या सूचित करतात की खासगी भागाजवळील केस घाणेरडे आहेत आणि ते काढणे म्हणजे स्वच्छता. परंतु डॉक्टरांचे मत पूर्णपणे उलट आहे. केस काढल्याने स्वच्छता होत नाही, परंतु चुकीच्या पद्धतीने काढल्याने निश्चितच नुकसान होऊ शकतं. अनेकांना वाटतं केसांमधून घाणेरडा वास येतो, मात्र प्रत्यक्षात दुर्गंध अस्वच्छता आणि घामामुळे येतो. जर तुम्ही नियमितपणे स्वच्छता केली तर काहीही त्रास होणार नाही. 

किती स्वच्छता पुरेशी आहे | How important is hygiene of personal parts

प्यूबिक हेअर काढणं तुमची वैयक्तिक निवड असू शकते. मात्र चुकीच्या माहितीमुळे किंवा अज्ञानामुळे तुम्ही आरोग्याचं नुकसान करू शकता. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार.... 
•    संपूर्ण केस काढणं योग्य नाही
•    केसांना हलकं ट्रिम करू शकता.
•    केमिकल प्रॉडक्ट आणि रेजर वापरू नका
•    दैनंदिन स्वच्छता आवश्यक आहे, मात्र केमिकलचा वापर टाळा

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com