कोणत्या आजारावर स्ट्रॉबेरी पॉवरपॅक? हिवाळ्यात स्ट्रॉबेरी खाण्याचे जबरदस्त फायदे तुम्हाला माहीत आहे का?

Strawberry Benefits in Marathi: थंडीच्या दिवसात रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे खोकला-सर्दीसारखा त्रास सतत उद्भवतो. परिणामी डाएटमध्ये बदल करणं गरजेचं असतं.

जाहिरात
Read Time: 2 mins
हिवाळ्यात स्ट्रॉबेरी खाण्याचे फायदे
Freepik

हिवाळा सुरू झाला आहे आणि या काळात आरोग्याची काळजी घेणं आवश्यक असतं. थंडीच्या दिवसात रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे खोकला-सर्दीसारखा त्रास सतत उद्भवतो. परिणामी डाएटमध्ये बदल करणं गरजेचं असतं. हिवाळ्यातही सुदृढ राहण्यासाठी नियमित फळांचं सेवन करावं. या दिवसात स्ट्रॉबेरीचं उत्पन्न मुबलक प्रमाणात होतं. स्ट्रॉबेरी जितकी चवदार असते तितकी आरोग्यासाठीही फायदेशीर असते. काहीजण स्ट्रॉबेरी नुसतीच खाणं पसंत करतात तर काही जण त्याची स्मूदी, ज्यूसमधून पितात. चवदार असलेल्या या स्ट्रॉबेरीचे अनेक फायदेही आहेत, जाणून घेऊया. 

स्ट्रॉबेरीमधील पोषक तत्व...

स्ट्रॉबेरीची चव गोड-आंबट असते. त्यामुळे अनेकांना स्ट्रॉबेरी आवडते. यामध्ये विटॅमिन सी, मँगेनिज, फोलेट, पोटॅशियम, फायबर, आयरन, कॉपर, मॅग्नेशियम, फॉस्फरस, विटॅमिन के आणि ई सारखे आवश्यक पोषक तत्व असतात. जे शरीराला आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात. 

स्ट्रॉबेरी खाण्याचे फायदे...

रोगप्रतिकारक शक्ती सुधारते....

हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती मंदावते. ज्यामुळे आजारी पडण्याचं प्रमाण वाढतं. अशात तुम्ही हिवाळ्यात स्ट्रॉबेरीचं सेवन करू शकता. यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असतं, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करायला मदत करते. 

Advertisement

नक्की वाचा - Smriti Irani : स्मृती इराणींनी 6 महिन्यात 27 किलो वजन केलं कमी, कोणता डाएट फॉलो केला?

हृदयाचं आरोग्य...

स्ट्रॉबेरीमध्ये असे अनेक अँटिऑक्सिडेंट असतात ज्यामुळे शरीरातील वाईट कॉलेस्ट्रेरॉलची पातळी कमी करीत हृदयाचं आरोग्य सुधारण्यास मदत करते. थंडीत नियमितपणे स्ट्रॉबेरी खाल्ल्याने हृदयाच्या आरोग्याचा धोका कमी होतो. 


रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे

मधुमेहींसाठी स्ट्रॉबेरी खाणं फायदेशीर ठरू शकते. यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतं, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. स्ट्रॉबेरी खाल्ल्याने टाइप २ मधुमेहाचा धोका कमी होतो. 

Advertisement

बद्धकोष्ठता...

हिवाळ्यात तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर तुम्हाला स्ट्रॉबेरी फायदेशीर ठरू शकते. त्यामध्ये भरपूर फायबर असतं, जे निरोगी पचनसंस्था राखण्यास मदत करते. यामुळे अपचन, गॅस आणि आम्लता यासारख्या आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. 


 

Topics mentioned in this article