​Ayurveda: आंघोळी करण्याआधी नाभीमध्ये पाणी टाकले तर काय होतं? 99% लोकांना माहितच नाही

विशेषतः हाय बीपी असलेल्या रुग्णांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी या पद्धतीचा आवर्जून वापर केला पाहिजे.

जाहिरात
Read Time: 2 mins

दिवसाची सुरुवात ताजीतवाणी व्हावी यासाठी सर्व जण आंघोळ करतात. हे एक दिनक्रम आहे. आंघोळीमुळे शरीराची स्वच्छता तर होतेच, पण थकवा दूर होऊन मनालाही प्रसन्नता मिळते. मात्र, बहुतांश लोक बाथरूममध्ये गेल्यावर थेट डोक्यावर किंवा शरीरावर पाणी ओततात. आयुर्वेदानुसार आंघोळ करण्याची ही पद्धत चुकीची आहे. आयुर्वेदाचार्य आणि योगगुरू डॉ. राम अवतार (Prof. Dr. Ram Avtar) यांच्या मते, आंघोळ करण्यापूर्वी नाभीवर पाणी टाकणे, तसेत योग्य क्रमाने पाणी घेणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते.

​नाभी हा मानवी शरीराचा केंद्रबिंदू मानला जातो. असं डॉ. राम अवतार यांनी सांगितलं. त्यांच्या मते, शरीरातील अनेक महत्त्वाच्या मज्जासंस्था (Nerves) नाभीशी जोडलेल्या असतात. आंघोळ करण्यापूर्वी नाभीवर थोडे पाणी टाकल्यास काही फायदे हे नक्कीच होतात.  ​शरीराचे तापमान संतुलित राहते. नाभीवर पाणी टाकल्याने अचानक होणाऱ्या गरम किंवा थंड पाण्याच्या त्रासापासून शरीराचा बचाव होतो असा दावा त्यांनी केला आहे. 

Advertisement

नक्की वाचा - शरीराचा सर्वात घाण भाग कोणता? नाव ऐकून बसेल मोठा धक्का; दुर्लक्ष केल्यास उद्भवू शकतात 'या' गंभीर समस्या

या शिवाय ​मज्जासंस्था सक्रिय होते. यामुळे नाभीशी जोडलेल्या नस एक्टिव्ह होतात. तसेच चेतासंस्था (Nervous system) शांत होण्यास मदत होते. ऐवढेच नाही तर नाभीवर पाणी टाकल्याने नाभीची स्वच्छता सोपी होते. नाभीतील साचलेली घाण मऊ पडते. ज्यामुळे आंघोळ करताना ती सहज साफ करता येते. असं ही त्यांनी सांगितलं आहे. आयुर्वेदात आंघोळी करण्याची ही एक पद्धत आहे. पण अनेक लोकांना ती माहित नाही. त्यामुळे बरेच जण आंघोळी करताना थेट डोक्यावर पाणी घेतात. 

नक्की वाचा - Oil on Navel: नाभीवर तेल लावण्याचे फायदे! योग गुरुंनी सांगितले कोणते तेल उपयुक्त

​थेट डोक्यावर पाणी ओतणे का धोकादायक आहे ही ही त्यांनी स्पष्ट केलं आहे. ​अनेकदा लोक बाथरूममध्ये गेल्यावर थेट डोक्यावर पाणी घेतात. मात्र, यामुळे डोक्यातील रक्तवाहिन्यांवर (Blood vessels) अचानक दाब निर्माण होतो. परिणामी, रक्तदाब (Blood Pressure) अचानक वाढू शकतो आणि चक्कर येणे किंवा डोके दुखीसारखा त्रास उद्भवू शकतो.

​शरीराचे तापमान आणि रक्ताभिसरण संतुलित ठेवण्यासाठी आंघोळ करताना खालील क्रमाचे पालन करावे.

  • ​1. पायांपासून सुरुवात: सर्वात आधी पाय आणि गुडघ्यांवर पाणी टाकावे.
  • ​2. हात आणि खांदे: त्यानंतर हात, मांड्या आणि खांद्यावर पाणी घालावे.
  • ​3. पोटाचा भाग: आता पोटावर आणि नाभीवर थोडे पाणी टाकावे.
  • ​4. डोक्यावर पाणी: संपूर्ण शरीर पाण्याच्या तापमानाशी जुळवून घेतल्यानंतर सर्वात शेवटी डोक्यावर पाणी घ्यावे.

​तज्ज्ञांचा सल्ला- पायांवर आधी पाणी टाकल्याने शरीरातील उष्णता हळूहळू वरच्या दिशेने जाऊन बाहेर पडते. त्यामुळे हृदयावर किंवा मेंदूवर अतिरिक्त ताण येत नाही. विशेषतः हाय बीपी असलेल्या रुग्णांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी या पद्धतीचा आवर्जून वापर केला पाहिजे.
 

Advertisement