जाहिरात

Instagram Video: ट्यूशनला न पाठवताच मुलांना कसं शिकवाल? या 5 गोष्टी रोजच करा, क्लासमध्ये मुलं नेहमीच करतील टॉप

Study Tips For Children : आपल्या मुलांना उच्च दर्जाचं शिक्षण मिळावं, यासाठी अनेक पालक त्यांना ट्यूशनला पाठवतात. पण काही वेळेला योग्य टिचर किंवा ट्यूशन उपलब्ध नसतं. यामुळे मुलांची शैक्षणिक प्रगती खुंटते. मुलांना हुशार बनवण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पाहा..

Instagram Video: ट्यूशनला न पाठवताच मुलांना कसं शिकवाल? या 5 गोष्टी रोजच करा, क्लासमध्ये मुलं नेहमीच करतील टॉप
Best Study Tips For Children
मुंबई:

Study Tips For Children : आपल्या मुलांना उच्च दर्जाचं शिक्षण मिळावं, यासाठी अनेक पालक त्यांना ट्यूशनला पाठवतात. पण काही वेळेला योग्य टिचर किंवा ट्यूशन उपलब्ध नसतं. यामुळे मुलांची शैक्षणिक प्रगती खुंटते. तर काही ट्यूशन टीचरची फी खूपच जास्त असते. यामुळे पालकांच्या अडचणी वाढतात. जर तुमच्यासोबतही असं काही घडत असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. इथे आम्ही तुम्हाला खूप सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत. यामुळे तुम्ही ट्यूशनच्या मदतीशिवाय मुलांना चांगल्या प्रकारे शिकवू शकता. ही पद्धत डिजिटल क्रिएटर माया यादव यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

ट्यूशनशिवाय मुलांना घरीच कसं शिकवाल?

1) टाईम फिक्स करा

डिजिटल क्रिएटर माया सांगतात की, सर्वात आधी मुलांसाठी अभ्यासाचं फिक्स टाईम निश्चित करा. ट्यूशन क्लासमध्ये जसं टाईम फिक्स असतं, तशाच प्रकारे घरातही एक रुटिन बनवा. यामुळे मुलं अॅक्टिव्ह राहतील आणि त्या वेळी ते अभ्यास सुरु करतील.

2) छोटे छोटे ब्रेक्स द्या

अभ्यासादरम्यान मुलांना छोटे छोटे ब्रेक्स देणं खूप महत्त्वाचं असतं. सतत अभ्यास केल्यानं मुलं थकतात आणि त्यांचं लक्ष विचलीत होतं. अधून मधून पाच-दहा मिनिटांचा ब्रेक घ्या, जेणेकरून त्यांच्या बुद्धीला चालना मिळेल आणि ते पुन्हा अभ्यास करायला सुरुवात करतील.

नक्की वाचा >> ट्रेनमध्ये चढली बँकॉकची परदेशी महिला,गर्दीत आला सर्वात घाणेरडा अनुभव, थेट रेल्वेमंत्र्यांना Video टॅग केला अन्

3) आऊटडोअर अॅक्टिव्हिटीज

फक्त अभ्यासच नाही, मुलांसाठी आऊटडोअर अॅक्टिव्हिटीजही तितक्याच आवश्यक आहेत. खेळणं किंवा बाहेरच्या कामांमुळे मुलांची उर्जा वाढते आणि त्यांचा मानसिक विकासही होतो. खेळल्यानंतर जेव्हा मुलं अभ्यास करतात, तेव्हा मुलं खूपच क्रिएटीव्ह होतात.

4) रिव्हिजन करणं खूप गरजेचं

शाळेतून घरी आल्यावर मुलांचं रिव्हिजन घेणं खूप आवश्यक आहे. दिवसभर शाळेत जे काही शिकवलं जातं, त्याची रिव्हिजन केल्यावर शिकवलेल्या गोष्टी त्यांच्या लक्षात राहतात. पालकांनी मुलांना फक्त अभ्यास करण्यासाठी सांगायचं नाही, तर शिकवलेल्या गोष्टी त्यांच्याकडून लिहूनही घ्यायच्या. लिहिल्यामुळे वाचलेलं लक्षात राहण्याची क्षमता वाढते.

नक्की वाचा >> DDLJ ची 'चुटकी' आठवतेय? 30 वर्षानंतर झाली खूप सुंदर, फेमस अभिनेत्रीही फिक्या पडतील, एका क्लिकवर पाहा सर्व फोटो

5) मुलांची टेस्ट घ्या

आठवड्यातून एकदा मुलांची छोटी टेस्ट घ्या. यामुळे मुलांची ग्रोथच कळत नाही, तर त्यांना कोणत्या विषयात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, हे सुद्धा समजतं.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com