जाहिरात

Better Sleep Tips: रात्री झोप लागत नाही? फॉलो करा तज्ज्ञांनी सांगितलेला हा '3-3-3' नियम, येईल शांत आणि गाढ झोप

Better Sleep Tips: शांत आणि गाढ झोप घेण्यासाठी प्राध्यापक राम अवतार यांनी सांगितलेले प्रभावी उपाय. जाणून घ्या महाप्राण ध्वनीचे महत्त्व, '3-3-3' नियम आणि झोप न येण्याच्या समस्येवर काही सोप्या टिप्स.

Better Sleep Tips: रात्री झोप लागत नाही? फॉलो करा तज्ज्ञांनी सांगितलेला हा '3-3-3' नियम, येईल शांत आणि गाढ झोप
"Better Sleep Tips : गाढ आणि शांत झोप येण्यासाठी उपाय"
Canva

Better Sleep Tips: निरोगी आयुष्यासाठी उत्तम झोप घेणे अतिशय आवश्यक मानले जाते. पण आजच्या धावपळीच्या युगात बिघडलेल्या जीवनशैलीमुळे लोकांच्या झोपण्याच्या वेळा बदलल्या आहेत. याचा थेट परिणाम झोपेच्या गुणवत्तेवर होत असून अनेकांना शांत झोप लागत नाही, तर काहींना रात्रीची भीती वाटते किंवा वाईट स्वप्ने पडतात. अशा परिस्थितीत गाढ झोप मिळवण्यासाठी काय करावे, याबाबत 'सीपीयू-पीएसआय सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसिन, योग आणि संस्कार'चे संचालक प्राध्यापक राम अवतार यांनी सविस्तर दिलेली माहिती जाणून घेऊया...

झोपण्यापूर्वी महाप्राण ध्वनीचे उच्चारण करणं कसे फायदेशीर ठरले?

प्राध्यापक राम अवतार यांनी म्हटलं की, जर तुम्हाला रात्री शांत झोप हवी असेल तर झोपण्यापूर्वी 'डीप ब्रीदिंग' (दीर्घ श्वसन) सुरू करा. त्यानंतर अंथरुणावर बसून नऊ वेळा 'महाप्राण ध्वनी'चा उच्चार करावा. हा उच्चार करण्यासाठी तोंड बंद ठेवून आधी दीर्घ श्वास घ्यावा आणि मग गुंजन करावे. यामुळे केवळ चांगली झोपच लागत नाही, तर रात्री वाईट स्वप्ने पडणे किंवा भीती वाटणे देखील बंद होते

झोप पूर्ण होण्याचे फायदे

चांगली तसेच झोप पूर्ण होणे यामुळे मेंदू तसेच शारीरिक आरोग्यावर चांगले परिणाम होतात. यामुळे स्मरणशक्ती देखील चांगली राहते, विचार सकारात्मक होऊ लागतात, हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका कमी होतो. नियमित सात ते आठ तास झोपल्यास शारीरिक तसेच मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत मिळते.  

(नक्की वाचा: How To Use AC In Summer: AC बंद करताच रूम गरम होते? जाणून घ्या उन्हाळ्यात रूम थंड ठेवण्यासाठी 8 टिप्स)

गाढ झोपेसाठी '3-3-3' नियम काय आहे?

रात्री गाढ झोप लागण्यासाठी '3-3-3' नियम अतिशय प्रभावी ठरतो.  

  • झोपण्यापूर्वी 3 तास आधी जड व्यायाम (Heavy Exercise) करणे टाळावे.
  • झोपण्यापूर्वी किमान 3 तास आधी रात्रीचे जेवण करावे.
  • दुपारी 3 वाजेनंतर कॅफिनयुक्त पेय- पदार्थांचे (चहा, कॉफी) सेवन करू नये. 
Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: NDTV Marathi

गाढ झोप येण्यासाठी काही खास टिप्स

गॅजेट्सपासून दूर राहा: झोपताना फोन, टॅबलेट किंवा कम्प्युटर वापरू नका. या उपकरणांमधून निघणारा प्रकाश मेलाटोनिन हार्मोन तयार होण्यास अडथळा आणतो, जो झोप येण्यासाठी आवश्यक असतो.
अंथरुणाचा वापर: अंथरुणाचा वापर फक्त झोपण्यासाठीच करा. यामुळे बेडवर जाताच मेंदूला झोपेचे संकेत मिळतात.
20 मिनिटांचा नियम: जर अंथरुणावर पडल्यानंतर 20 मिनिटांत झोप आली नाही, तर खोलीबाहेर पडा आणि काहीतरी शांत काम करा (उदा. वाचन), जोपर्यंत पुन्हा झोप येत नाही.
नियमित व्यायाम आणि सूर्यप्रकाश: दिवसा नियमित व्यायाम करा आणि थोडा वेळ सूर्यप्रकाशात घालवा, यामुळे रात्री लवकर झोप येण्यास मदत होते.

(नक्की वाचा: Blanched Almonds: उकडलेले बदाम खाल्ल्यास काय होते? ब्लँच्ड बदामाचे फायदे आणि तयार करण्याची योग्य पद्धत वाचा)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com