Better Sleep Tips: तुम्हीही कामाच्या धावपळीत झोप पूर्ण न करणाऱ्यांपैकी असाल तर वेळीच सावध व्हा. अपूर्ण झोपेमुळे केवळ थकवा येत नाही तर आरोग्याशी संबंधित गंभीर समस्याही निर्माण होऊ शकतात. प्रसिद्ध न्युट्रिशनिस्ट पूजा मखीजा आणि आयुर्वेद तज्ज्ञांच्या मते जेव्हा तुम्ही झोपत नाही तेव्हा शरीराची जैविक यंत्रणा सर्व गोष्टींवर नियंत्रण मिळवते.
पूर्ण झोप न झाल्यास शरीरामध्ये कोणते बदल होतात?
मायक्रो स्लीप : मेंदू इतका थकतो की आपल्या सुरक्षेसाठी तीन ते 15 सेकंदांसाठी मायक्रो स्लीप घेऊ लागतो. या प्रक्रियेत डोळे उघडे असतात, पण मेंदू झोपी जातो.
ताण आणि भूक वाढणे: फक्त एक रात्र कमी झोपल्याने शरीरातील कोर्टिसोल हार्मोन (ताण निर्माण करणारे हार्मोन) सुमारे 37 टक्क्यांपर्यंत वाढते. यामुळे चिंता वाढते, भूक जास्त प्रमाणात लागते आणि पोटावरील चरबी (Belly Fat) वाढू लागते.
फॅट बर्न थांबते: जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर शरीरासाठी झोप अत्यंत गरजेची आहे. झोपेच्या कमतरतेमुळे शरीराची फॅट बर्न करण्याची क्षमता 55 टक्क्यांपर्यंत घटते.
शरीराची रोगप्रतिकारकशक्ती कमी होते: अपुर्या झोपेमुळे तुमच्या शरीराच्या रोगप्रतिकारकशक्तीच्या ‘नॅचरल किलर सेल्स'ची ताकद 50 टक्क्यांपर्यंत कमी होते, त्यामुळे तुम्ही लवकर आजारी पडता.
भावनांवर ताबा राहत नाही: झोप पूर्ण न झाल्यास मेंदूचा लॉजिकचा भाग कमकुवत होतो आणि भावना (Emotions) सुमारे 60 टक्क्यांपर्यंत अधिक तीव्र होतात.
पचनप्रक्रियेवर वाईट परिणाम: झोप कमी झाल्याने आतड्यांमधील रक्तप्रवाह कमी होतो. यामुळे पचनाची गती 40 टक्क्यांपर्यंत मंदावते आणि आतड्यांमध्ये लीकी गट यासारख्या समस्या सुरू होऊ शकतात
(नक्की वाचा: Irregular Periods: पीरियड्स वेळेवर येत नाही? चिमूटभर उपाय ठरेल प्रभावी, जाणून घ्या योग्य पद्धत आणि फायदे)
गाढ झोपेसाठी आयुर्वेदिक चे उपाय | Gadh Zopesathi Upay
आयुर्वेदानुसार झोप न येणे म्हणजे शरीरातील वात आणि पित्त दोष बिघडल्याचे लक्षण आहे. ते संतुलित करण्यासाठी खालील उपाय करून पाहू शकता:
जायफळयुक्त दूध
रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधात चिमूटभर जायफळ किंवा हळद मिक्स करून प्यावे. यामुळे मन शांत होते आणि गाढ झोप लागते.
पायांचा मसाज
झोपण्यापूर्वी पायांच्या तळव्यांवर तिळाचे तेल लावा आणि मसाज करावा.
हर्बल मदत
अश्वगंधा, ब्राह्मी किंवा जटामांसीचे चूर्ण दुधासोबत घेतल्यास तणाव कमी होण्यास खूप मदत होते.
पचनास हलके जेवण
संध्याकाळच्या वेळेस पचनास हलक्या असणाऱ्या जेवणाचे सेवन करावे. झोपण्याच्या कमीत कमी एक तासापूर्वी मोबाइल/स्क्रीनपासून दूर राहावे.
शरीराला जबरदस्तीने विश्रांती (Rest) देऊ नका, तर स्वतः वेळ काढून सात-आठ तासांची झोप घ्यावी. झोप म्हणजे शरीराचा मेंटेनन्स टाइम असते, त्याकडे दुर्लक्ष करू नका.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)