Irregular Periods Home Remedies: मानसिक-शारीरिक ताण, शरीरातील हार्मोन्स असंतुलित होणे इत्यादी कारणांमुळे बहुतांश महिलांना अनियमित मासिक पाळीच्या समस्येचा सामना करावा लागतो. पीरियड्स वेळेवर येत नसल्याने तुम्ही देखील त्रस्त आहात का? तर यावर रामबाण उपाय जाणून घेऊया. याबाबत डॉक्टर रुचा पै यांनी सोशल मीडियावर माहिती शेअर केलीय.
अनियमित पाळीची समस्या दूर करण्यासाठी उपाय | Irregular Periods Home Remedies
डॉक्टर रुचा पै यांनी ओली हळद आणि आल्याचे एकत्रित सेवन करण्याचा सल्ला दिलाय.
ओली हळद आणि आल्याचे पाणी | Turmeric And Ginger Water Benefits
कसा करावा उपाय?
डॉक्टर रुचा पै यांनी दिलेल्या माहितीनुसार योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने ओली हळद तसेच आल्याचे एकत्रित सेवन केले तरच फायदा होईल.
विशेषतः अनियमित पाळीच्या समस्येसाठी ओली हळद आणि आल्याचे सेवन उपयोगी ठरू शकते.आयुर्वेदानुसार हळद रक्तशुद्धी करते आणि आल्यामुळे पचनप्रक्रिया सुधारते, शरीरातील वात दोष कमी होतो. जेव्हा पचनप्रक्रिया सुधारते, तेव्हा शरीरातील हार्मोन्सही हळूहळू संतुलित होतात.
ओली हळद आणि आल्याचे प्रमाण किती असावे?
- चिमूटभर ओली हळद
- चिमूटभर आले
- एक कप कोमट पाणी
- दोन्ही गोष्टी किसून किंवा वाटून पाण्यात मिक्स करा.
- पाणी दोन मिनिटांसाठी उकळा आणि सकाळी उपाशीपोटी हे पाणी प्यावे.
(नक्की वाचा: Smelly Urine Causes: लघवीला घाणेरडा वास का येतो? मिठाच्या अति सेवनाव्यतिरिक्त या 3 गोष्टीही असू शकतात कारणीभूत)
हळद आणि आल्याचे पाणी पिण्याचे फायदे- पचन प्रक्रिया सुधारते
- शरीरातील दाह कमी होतो
- हार्मोन्स संतुलित होण्यास मदत मिळू शकते
- पाळी नियमित होण्यास मदत मिळू शकते
(नक्की वाचा: Alcohol Overdose Levels: फुलटाइट होण्यासाठी दारू पिणं विषसमान, मृत्यूही होऊ शकतो; या 4 लोकांना सर्वाधिक धोका)
हे देखील लक्षात ठेवा- ओली हळद आणि आल्याचे पाणी रोज पिऊ नये, आठवड्यातून तीन-चार वेळा पिणे योग्य ठरेल.
- ओली हळद आणि आल्याचे पाणी जास्त प्रमाणात पिऊ नये, यामुळे पित्तदोष वाढेल.
- पाळीमध्ये जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्यास हा उपाय करणे टाळावे.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

