Sleep Mistakes: निरोगी आरोग्यासाठी चांगली झोप मिळणं अतिशय आवश्यक आहे. झोपण्याची प्रक्रिया ही केवळ आरामासाठी नसून शरीराची झालेली झीज भरून काढण्याची ही वेळ असते. त्यामुळे पुरेशा प्रमाणात झोप घेणे अतिशय आवश्यक असते. पण अनेकदा आपल्याकडून कळत-नकळत काही चुका होतात, ज्यामुळे केवळ झोपच खराब होत नाही तर आरोग्यासही हानी पोहोचते. प्रसिद्ध आयुर्वेदिक न्युट्रिशनिस्ट श्वेता शाह यांनी अशाच 5 चुका सांगितल्या आहेत. झोपताना या 5 चुका टाळणे अत्यंत गरजेचे असल्याची माहिती श्वेता शाह यांनी इन्स्टाग्राम हँडलद्वारे दिलीय.
पहिली चूक - पोटावर झोपणे
काही लोकांना पोटावर झोपण्याची सवय असते, पण ही पद्धत योग्य मानली जात नाही. न्युट्रिशनिस्टच्या मते, पोटावर झोपल्याने श्वसनलिकेवर दाब येतो, ज्यामुळे श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊ शकतात आणि शरीराला योग्य प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. त्यामुळे पोटावर झोपणे टाळावे. डाव्या कुशीवर झोपणे सर्वात चांगले मानले जाते. यामुळे श्वसन आणि हृदयावर कमी दाब पडतो, झोपही चांगली लागते.
दुसरी चूक - वारंवार झोपेच्या गोळ्या घेणे
झोपेची समस्या निर्माण झाली की अनेक लोक स्वतःहून औषधे घेण्यास सुरुवात करतात. ही सवय अतिशय चुकीची आहे. श्वेता शाह यांच्या मते, अशा प्रकारची औषधे श्वसन प्रणालीवर परिणाम करू शकतात आणि चुकीच्या वापरामुळे इतरही गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे कधीही स्वतःहून झोपेची औषधे घेऊ नये; गरज भासल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
तिसरी चूक - पचनास जड खाद्यपदार्थ आणि उशीरा जेवणरात्री उशीरा जेवणे तसेच आहारामध्ये पचनास जड खाद्यपदार्थांचा समावेश करणे, यामुळेही झोपेवर परिणाम होतो. जड खाद्यपदार्थांमुळे शरीराला अन्न पचवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते, ज्याचा परिणाम झोपेवर होतो. पचन नीट न झाल्यास गाढ झोप लागत नाही. त्यामुळे पचनास हलक्या स्वरुपाचे जेवण करण्याचा प्रयत्न करावा आणि झोपण्याच्या दोन तीन तास आधीच जेवण करावे.
(नक्की वाचा: Sleep Quality: चांगल्या झोपेसाठी डाएटमध्ये 1 गोष्ट खाण्यास करा सुरुवात, गाढ आणि चांगली झोप येईल)
चौथी चूक - डोक्याजवळ मोबाइल ठेवून झोपणेहल्ली बहुतांश लोक मोबाइल पाहता पाहता झोपतात किंवा उशीजवळच फोन ठेवून झोपतात. ही सवय देखील खूप हानिकारक ठरू शकते. श्वेता शाह यांनी सांगितलं की, डोक्याजवळ फोन ठेवून झोपल्याने रेडिएशन आणि ब्लू लाइटमुळे झोप मोड होऊ शकते तसेच तणावही वाढू शकतो. तसेच सतत येणाऱ्या नोटिफिकेशनमुळे गाढ झोप लागत नाही. त्यामुळे मोबाइल नेहमी दूर ठेवून झोपावे आणि शक्य असल्यास सायलेंट मोडवर ठेवावा.
काही लोक रात्री टीव्ही पाहत झोपतात आणि अनेकदा टीव्ही सुरूच राहतो. या सवयमुळेही झोपेवर वाईट परिणाम होतात. स्क्रीनचा प्रकाश आणि आवाजामुळे मेंदूला पूर्णपणे आराम मिळत नाही. यामुळे हृदयाचे ठोके, श्वसन प्रणाली आणि झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. त्यामुळे झोपण्यापूर्वी टीव्ही नेहमी बंद करा आणि खोलीत शांतता तसेच पूर्ण अंधार ठेवा.
(नक्की वाचा: Sunlight Benefits: रोज 10 मिनिटं उन्हात बसल्यास काय होईल? Doctor Hansa Yogendra यांनी सांगितले मोठे फायदे)
आयुर्वेदिक न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, झोप ही आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. जर आपण या छोट्या-छोट्या सवयी सुधारल्या तर तुम्हाला चांगली झोप येईल. शरीर निरोगी राहील आणि शरीराला ऊर्जा देखील मिळेल.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )