Improve Sleeping Quality: बदलत्या काळानुसार प्रत्येकाच्या जीवनात आहारापासून ते जीवनशैलीपर्यंत असंख्य बदल होत आहेत. यामुळे झोपेच्या कमतरतेच्या समस्येचा बहुतांश लोक सामना करतायेत. अपुऱ्या झोपेमुळे असंख्य आजारांचा धोका वाढू शकतो. चांगली झोप येण्यासाठी जीवनशैलीमध्ये काही योग्य बदल करणं आणि पौष्टिक आहाराचे सेवन करणं आवश्यक आहे. हेल्थ एक्स्पर्ट्सनुसार, आहारात ओट्सचा समावेश केल्यास चांगली झोप येण्यास मदत मिळू शकते. ओट्समध्ये फायबर, प्रोटीन आणि पोषक घटकांचा समावेश आहे. याचा वापर दलिया, कुकीज आणि ग्रॅनोला स्वरूपात केला जातो. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असून पचनप्रक्रिया सुधारण्यास, वजन कमी होण्यास आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
ओट्सचे फायदे
ओट्स हे मिश्र कार्बोहायड्रेट आहे, ज्यामुळे रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. जॉन्स हॉपकिन्स यांनी केलेल्या संशोधनातील माहितीनुसार, झोपण्यापूर्वी ओट्स खाणे चांगले मानले जाते, कारण हे कार्बोहायड्रेट असून ते पचनासाठी जास्त वेळ घेत नाही. व्हिटॅमिन्स आणि खनिजांनीयुक्त ओट्स खाल्ल्यानंतर भूक नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. ओट्स खाल्ल्याने शरीरातील कॅलरीचे प्रमाण कमी राहते. ओट्समध्ये प्रोटीन, कॅल्शिअम, कार्बोहायड्रेट्स, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, झिंक, पोटॅशियम आणि नियासिन यासारख्या असंख्य पोषक घटकांचा समावेश आहे. ओट्समध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी12 आणि व्हिटॅमिन डीचे प्रमाण जास्त आहे. रात्रीच्या जेवणात ओट्सचे सेवन केल्यास पचनप्रक्रिया सुधारेल आणि पचनाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळेल.
वजन कमी करण्यास प्रभावी उपाय
ओट्ससह शिजवलेल्या भाज्या खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत मिळू शकते. भाज्यांमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. भाज्या शिजवून त्यावर थोडेसे मीठ आणि काळी मिरी पावडर मिक्स करावी, ओट्ससोबत किंवा ओट्सशिवायही तुम्ही हा उपाय करू शकता, हा आरोग्यदायी आणि चविष्ट पर्याय आहे. रात्रीच्या जेवणात स्मूदीच्या स्वरूपात ओट्सचे सेवन केलं वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
(नक्की वाचा: Sunlight Benefits: रोज 10 मिनिट उन्हात बसल्यास काय होईल? Doctor Hansa Yogendra यांनी सांगितले मोठे फायदे)
रोगप्रतिकारकशक्तीओट्समध्ये बीटा-ग्लुकन फायबरचे प्रमाण जास्त आहे, जे शरीराच्या रोगप्रतिकारकशक्तीच्या पेशी सक्रिय ठेवण्याचे काम करतात परिणामी आतड्यांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. ओट्समध्ये पॉलीफेनॉलसारखे अँटी-ऑक्सिडंट्स, झिंक आणि सेलेनियम आणि अमिनो अॅसिड आहे, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होईल. यासह फायबरमुळे पचनप्रक्रिया सुधारण्यास मदत मिळेल.
(नक्की वाचा: Weight Loss ChatGPT 7 Prompts: तरुणाने ChatGPTच्या मदतीने 12 आठवड्यांत 27 Kg वजन घटवलं, वेटलॉससाठी शेअर केले 7 प्रॉम्ट)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

